अपंग

मला अपंग प्रमाणपत्र (certificate) काढायचे आहे, मला एक कान नाहीये आणि दुसऱ्या कानाने ऐकू येते मी औरगाबादमध्ये राहतो आहे तर अपंग प्रमाणपत्र कसे काढावे कुणी मदत करणारे आहे का?

1 उत्तर
1 answers

मला अपंग प्रमाणपत्र (certificate) काढायचे आहे, मला एक कान नाहीये आणि दुसऱ्या कानाने ऐकू येते मी औरगाबादमध्ये राहतो आहे तर अपंग प्रमाणपत्र कसे काढावे कुणी मदत करणारे आहे का?

3
शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतीचा लाभ अपंग (दिव्यांग) व्यक्तींना व्हावा यासाठी दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र Disability Certificate दिले जाते. 3 डिसेंबर 2012 पासून राज्यांमध्ये SADM या सॉफ्टवेअर असेसमेंट ऑफ डीस्याबिलिटी महाराष्ट्र Software for Assessment of Disability, Maharashtra(SADM)
या संगणक प्रणाली द्वारा दिले जात होते. मात्र आता 2 ऑक्टोबर 2018 पासून भारत सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे UDID card दिले जात आहे. आज आपण अपंग प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी (Disability Certificate Online UDID card Registration) कसे करायचे याबद्दल माहिती पाहूया.
अपंग प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी | Disability Certificate Online UDID CARD REGISTRAION
अपंग युनिक कार्ड ऑनलाईन नोंदणी (ONLINE REGISTRAION) प्रक्रिया कशी करावी याविषयीची माहिती पाहणार आहोत. 
RPWDAct 2016 नुसार २१ प्रकारापैकी दिव्यांग्त्व (अपंग) असणारी व्यक्ती
अपंगत्व प्रमाणपत्र (disability certificate) असणारी दिव्यांग व्यक्ती
अपंगत्व प्रमाणपत्र नसलेली परंतु नवीन काढायचे आहे. अशी अपंग व्यक्ती अर्ज करू शकेल.
अपंग प्रमाणपत्र (अपंग युनिक कार्ड) ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया | Disability Certificate Online Registration
Unique Disability ID card त्यालाच मराठीमध्ये वैश्विक दिव्यांग ओळख पत्र किंवा स्वावलंबन कार्ड (#swavlambancard) म्हणून देखील ओळखले जाते. UDID कार्डसाठी www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग माहितीची सत्यता पडताळून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या स्वाक्षरी करून पोस्टाद्वारे कार्ड पाठविण्यात येते. UDID CARD भारत सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे दिले जात आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2018 पासून लाभार्थींना वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे. 
> सर्वप्रथम www.swavlambancard.gov.in या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. यासाठी गुगल सर्च मध्ये (swavlambancard OR disability certificate) असे सर्च करा. आणि www.swavlambancard.gov.in या वेबसाईट ला भेट द्या. खाली लिंक दिली आहे.
>> swavlambancard या संकेत स्थळावर गेल्यानंतर वरच्या उजव्या बाजूस खालील ऑप्शन दिसतील.
Apply for disability certificate & UDID card
Apply for disability certificate & UDID card renewal
Apply for Lost UDID card
Track your application status
Download your e-Disability card & e-UDID card Update personal profile
यामधील Apply for disability certificate & UDID card या ऑप्शन ला क्लिक करा.
 Apply for disability certificate & UDID card वर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये एकूण ४ भाग दिसतील..
1.Personal Details 2. Disability Details 3. Employment Details 4. Identity Details
Personal Details , Address for Correspondence, Permanent Address, Educational Details वैयक्तिक तपशील, पत्रव्यवहारासाठी पत्ता, कायमचा पत्ता, शैक्षणिक तपशील इ. माहिती सेक्शन एक Personal Details या मध्ये काळजी पूर्वक भरावी. शक्यतो सर्वप्रथम ऑफलाईन फॉर्म ची प्रिंट काढून माहिती भरून घ्यावी. त्यानंतर ऑनलाईन भरावी.
जवळच्या जिल्हा रुग्णालयात भेट द्या तिथे अधिक  माहिती मिळेल.


उत्तर लिहिले · 9/8/2022
कर्म · 11785

Related Questions

मी अपंग आहे मला आधार सेंटर चालू करायचे आहे काय करावे लागेल ?
अपंग वृध्दाश्रम महाराष्ट्रात कुठे आहे किंवा संपर्क क्रमांक मिळेल का?
व्याख्या लिहा व्याख्यान या सापेक्ष आद्रता अपेक्षा?
अपंग प्रमाणपत्र कसे काढता येईल?
अपंगांसाठी पगार चालू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
अपंगांना दिव्यांग हा शब्द कोणी दिला?
अपंग सर्टिफिकेट साठी मला complant कंrachi आहे तर मी कशी करू आणि कोणी हेल्प करू शकता का ?