युद्ध
युद्ध म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
युद्ध म्हणजे काय?
0
Answer link
.
युद्ध म्हणजे काय? दोन राष्टांमधील,समाजामधील, टोळ्यांमध्ये झालेली लढाई जी शस्त्रांनिशी लढली जाते. ही फार ढोबळ मानाने केलेली व्याख्या आहे. जगाच्या सुरुवातीपासूनच ही लढाई सुरू आहे. फक्त देश किंवा माणसे एकमेकांशी लढतात असे नाही तर श्वापदे किंवा जनावरे सुद्धा एकमेकांशी लढत असतात. गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये जेंव्हा युद्ध होते त्याला टोळीयुद्ध म्हणतात.
युद्ध हे अनेक प्रकारे अणि पद्धतीने लढले जाते. शारीरिक जसे पूर्वी कुस्तीसारखे मल्लयुद्ध लढले जायचे ज्यात शस्त्रांचा वापर नसे फक्त शारिरीक सामर्थ्यावर लढाई होत असे. त्यात सुद्धा अनेक डावपेच आणि अचाट शारीरिक सामर्थ्य आवश्यक असते. पण हे दोन व्यक्ति पुरतेच मर्यादित असे. बाकी पूर्वीच्या काळी भाले तलवारी गदा धनुष्यबाण अशी अनेक शस्त्रे वापरून दोन देशांच्या किंवा साम्राज्यांच्या मध्ये युद्ध व्हायची. टोळी युद्धात तर पूर्वी तलवारी हॉकीस्टिक सोडावॉटरच्या बाटल्या टय़ूबलाईट इत्यादी वाटेलते वापरले जायचे.
हळु हळू तलवारी भाले गेले अणि त्यांची जागा बंदुकीने पिस्तुलीने घेतली. जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली आणि नवनवीन शोध लागत गेले तसे या शस्त्रांमध्येही फार मोठे परिवर्तन होत गेले त्यांची संहारक शक्ति प्रचंड प्रमाणात वाढत गेली. लढाऊ विमाने, मिसाईल रॉकेट लाँचर्स अणि सगळ्यात भयानक म्हणजे अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब जे समस्त सृष्टीचा झटक्यात नाश करू शकतील यांची निर्मिती झाली. थोडक्यात पूर्वी अनेक दिवस चालू शकणारे युद्ध आता काही मिनिटात संपू शकते.
युद्ध म्हणजे अपरिमित हानी प्रचंड संहार बर्याच वेळा अमानुषपणाचा कळस. युद्ध म्हणजे प्रचंड मनुष्यहानी आर्थिक हानी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान. सर्वांत महत्वाचे म्हणजे प्रजेच्या मनावर झालेले आघात आणि ह्यातच द्वेषाची अणि पर्यायाने पुढच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जेंव्हा युद्ध संपते तेव्हा जय विजय महत्वाचा रहात नाही कारण उरले असतात फक्त डोळ्यातील अश्रू सर्वत्र असलेली मृत्यूची चाहूल आसमंतात दाटलेली खिन्नता. परत घर उभे करण्याची चिंता. तेही होऊ शकते पण गेलेली माणसे परत येऊ शकत नाहीत आणि जे अपंग किंवा अधू होतात त्यांना मरण बरे असे वाटते