युद्ध

युद्धची राजकीय कारणे कोणती?

1 उत्तर
1 answers

युद्धची राजकीय कारणे कोणती?

0
युद्धाची राजकीय कारणे
युद्धसंस्थेच्या उद्‌गमासंबंधी काही दृष्टिकोन मांडण्यात येतात : मार्क्सवादी विचारप्रणालीनुसार राज्यसंस्थेच्या उदयाबरोबरच युद्धसंस्था निर्माण होते. संपत्तीचे किंवा मालमत्तेचे खाजगी उत्पादन व मालकी सुरू होताच शोषक व शोषित असे वर्ग समाजात निर्माण होतात. शोषक वर्ग युद्धाला न्यायाचे अधिष्ठान देतो. यातूनच पुढे वसाहतवाद व साम्राज्यवाद उदयास येतात आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणून क्रांतियुद्धे किंवा मुक्तियुद्धे निर्माण होतात. दुसऱ्या एका दृष्टिकोनानुसार संस्कृतीकरणाची किंवा नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली की, कृषिवलांचे शोषण वाढत जाते. म्हणजे नागरी सत्ता प्रबल होत जाते व तिच्यामार्फत कृषिवलांचे शोषण मोठ्या प्रमाणात होऊ लागते. त्यातून युद्धसंस्थेचा जन्म होतो. या दृष्टीने युद्धसंस्था ही संस्कृतीचे अपत्य होय, असे म्हटले जाते. प्राचीन काळातील ग्रीक व मेसोपोटेमियन नगरराज्यांतील सैनिकी वर्गाचे पोषण कृषिउत्पादनाच्या वाढाव्याद्वारे केले जाई. दुसऱ्या नगरराज्याची शेतजमीन व शेतकरी ताब्यात घेण्यासाठी नगरराज्यांचे एकमेकांत सशस्त्र संघर्ष होत. युद्धसंस्थेचा उद्‌गम सत्‌ आणि असत्‌ यांच्या संघर्षात आहे, असा अध्यात्मवादी दृष्टिकोनही मांडला जातो.

तथापि युद्धसंस्थेच्या निर्मितीची संपूर्ण समाधानकारक अशी उपपत्ती आढळत नाही. आधुनिक क्रमविकासवादी विचारसरणीत जीवमात्रांचा अस्तित्वासाठी चालणारा झगडा, असे एक तत्त्व आहे. युद्धाचा मूलभूत प्रकार आणि युद्धसंस्थेच्या उद्‌गमाची उपपत्ती म्हणून हे तत्त्व उल्लेखनीय वाटते.

युद्धाची प्रत्यक्ष कारणे मात्र अनेक आहेत, असे जागतिक इतिहासावरून दिसून येते. राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा, अन्नसंपादन, आत्मरक्षण, वर्चस्वाभिलाषा, धर्मप्रसार इ. कारणांमुळे इतिहास काळात युद्धे घडून आली आहेत. प्राचीन काळी भटक्या जमातींच्या स्थलांतरांमुळेही युद्धे झाल्याचे दिसून येते. लोकसंख्येतील वाढ व त्यामुळे निर्माण होणारा अन्नधान्याचा व निवासक्षेत्राचा तुटवडा हेही युद्धाचे एक कारण असू शकते. व्यापारविस्तारासाठी व अधिक बाजारपेठा काबीज करण्याच्या आकांक्षेमुळे युद्धे झाल्याचे दिसून येते. राजकीय-सामाजिक विचारप्रणालींच्या प्रसारासाठीही युद्धाचे साधन वापरण्यात आल्याचे दिसते.

युद्धाची कारणे विविध प्रकारची संभवतात, तथापि राज्यसंस्थेचा एक अंगभूत विभाग म्हणून युद्धसंस्था असते आणि युद्धाची कारणे त्या त्या राज्यसंस्थेच्या राजकीय नेतृत्वाच्या, ध्येयधोरणांच्या आणि ऐतिहासिक परिस्थितीच्या संदर्भात लक्षात घ्यावी लागतात.
उत्तर लिहिले · 19/2/2023
कर्म · 48465

Related Questions

दहा जनसमूहाचया प्रमुखामधये झालेले युद्ध?
भारत व बांगलादेश या देशात दोन देशात नुकताच कोणता युद्ध झाला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
युद्ध म्हणजे काय?
मर्यादित युद्ध म्हणजे काय?
पानिपतच्या युद्ध मराठ्यांचा पराभव कोणी केला?
नोव्हेंबर १९८९ मधील ..... या घटनेनंतर सोव्हिएट रशियाच्या विघटनाची सुरुवात झाली... (अ) युगोस्लाव्हियातील यादवी युद्ध (क) इराकचे कुवतेवर आक्रमण (ब) अरब इस्त्राईल संघर्ष (ड) बर्लिनची भिंत पडणे?