उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती?

2 उत्तरे
2 answers

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती?

0
  

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बोरीवली
कान्हेरी लेणी
चांदोली राष्ट्रीय उद्यान

मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव 'बोरीवली राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावात बदल परत एकदा बदल होऊन या उद्यानाला 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे नाव ठेवले..




संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

जैवविविधता
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात बिबट्या हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच मुंगूस, ऊदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर, निवडुंग असून बांबूची बेटेनी आहेत.


विशेष
वसई खाडीला लागून उद्यानाचे 25 चौरस किलोमीटर क्षेत्राचे खारफुटीचे जंगल आहे. त्याला मंगलवन / वेलावन असे म्हणतात. खडकात कोरलेल्या कान्हेरी लेणी पहावयास मिळतात. बौद्ध काळातील ही लेणी दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली असून याठिकाणी 109 विहार आहेत.




सुविधा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते. येथे प्रवेशासाठी प्रौढांना रु. २०/- तर लहान मुलांना रु. १०/- प्रवेशशुल्क आहे. पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी शुल्क आकारले जाते. सिंहविहार आणि वनराणी मिनी टॉय ट्रेन सफारींचे वेगळे शुल्क आकारतात. उद्यानात वननिवासाची सोय असून त्याकरिता विश्रामगृह आणि कुटिर पद्धतीची निवास व्यवस्था आहे.

उत्तर लिहिले · 15/2/2023
कर्म · 51830
0

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या उत्तरेकडील उपनगरात असलेले एक मोठे संरक्षित क्षेत्र आहे. हे उद्यान विविध वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी ओळखले जाते.

स्थापना:

या उद्यानाची स्थापना 1969 मध्ये झाली.

क्षेत्रफळ:

हे उद्यान 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे.

स्थान:

हे उद्यान बोरीवली येथे स्थित आहे.

वनस्पती आणि प्राणी:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. बिबट्या, वाघ, हरीण, विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरे येथे पाहायला मिळतात.

आकर्षण:

  • कान्हेरी लेणी: उद्यानात प्राचीन कान्हेरी लेणी आहेत, ज्या बौद्ध धर्माच्या इतिहासाचा भाग आहेत.
  • तलाव: उद्यानात विहार तलाव आणि तुळशी तलाव हे दोन मोठे तलाव आहेत.
  • ट्रेकिंग: येथे ट्रेकिंगसाठी अनेक मार्ग आहेत.

भेटीची वेळ:

हे उद्यान सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.

अधिक माहितीसाठी:

अधिक माहितीसाठी आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संकेतस्थळ([https://borivlinationalpark.maharashtra.gov.in/](https://borivlinationalpark.maharashtra.gov.in/)) पाहू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220

Related Questions

महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण माहिती, तेथील पशू, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगा.
भारतातील 106 व्या क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान कोणते?
हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयाला आली?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची माहिती मिळवून त्यांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण पशू, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सारणीबद्ध पद्धतीने मांडा.
महाराष्ट्रातील कोणत्याही पाच राष्ट्रीय उद्यानांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण पशू प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सारणीमध्ये लिहा.
महाराष्ट्रातील कोणतेही पाच राष्ट्रीय उद्याने, त्यांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हे, सर्वसाधारण पशू, प्राणी व फुले यांची माहिती मराठीत मिळवा.