राज्यशास्त्र

भारतीय घटनेतील मुलभुत तत्वे कोणती आहेत?

1 उत्तर
1 answers

भारतीय घटनेतील मुलभुत तत्वे कोणती आहेत?

0
भारतीय घटनेची मुलभूत तत्वे 

या मूलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार, असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो.

घटनाकारांनी नागरिकांच्या हक्कांच्या तरतूद करताना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे असा फरक केला आहे. घटनेतील कलम ३६ ते ५१ मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत.
* मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण तीन प्रकारात केले समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी या प्रकारात केले आहे.
समाजवादी तत्वे -
* कलम ३८[१] - सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्यायाने मुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करणे.
* कलम ३८[२] - उत्पन्न, दर्जा, सुविधा, संधी याबाबत विषमता कमी करणे.
* कलम ३९ - व्यक्तींना समान न्याय संधी,
* कलम ४१ - बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व, सार्वजनिक सहाय.
* कलम ४२ - कामगारांना न्याय मानवी वातावरण,
* कलम ४३ - सर्व कामगारांना वाजवी वेतन.
* कलम ४३ अ - कामगारांना व्यवस्थापनात सहभाग,
* कलम ४४ ब - राज्यसंस्था सहकारी संस्थांची निर्मिती.
* कलम ४६ - समाजातील अनुसूची जाती, जमाती, व इतर दुर्बल घटक शैक्षिणक आर्थिक विकासाला हातभार
* कलम ४७ - लोकांचा आहार व जीवनमान उंचावणे
गांधीवादी तत्वे
* कलम ४० - स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करता येईल अशारितीने संघटन अधिकार
* कलम ४३ - व्यक्तिगत अथवा सहकारी तत्वावर कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे.
* कलम ४७ - आरोग्यास अपायकारक अशा मादकद्रव्ये प्रतिबंध.
* कलम ४८ - गाई, वासरे, जनावरांच्या कत्तलीस बंदी
उदारमतवादी तत्वे
* कलम ४४ - देशातील सर्व नागरिकांना सामान कायदा
* कलम ४५ - सहा वर्षापर्यंत मोफत शिक्षण
* कलम ४८ - आधुनिक व वैज्ञानिक आधारावर कृषी क्षेत्राचा विकास
* कलम ४८[अ] - वने व वन्यजीव संवर्धन
* कलम ४९ - राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाची स्मारके स्थळे यांचे जतन
* कलम ५० - राज्याच्या न्याययंत्रणा कार्यकारणीपासून विलग
* कलम ५१ - आंतरराष्ट्रीय शांतता अबाधित सुरक्षितता अबाधित राखणे
उत्तर लिहिले · 22/12/2022
कर्म · 48555

Related Questions

मानवी हक्काची घोषणा म्हणजे काय?
राज्यशास्त्राचा अर्थ कसा विशद कराल?
भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे?
उपराष्ट्रपती कोण आहेत?
विषय इतिहास राज्यशास्त्र प्रश्न पहिला उगवत्या सूर्याचा टिंब टिंब या राज्याला संबोधण्यात येते?
तुलनात्मक राज्यशास्त्राचा अर्थ व व्याप्ती स्पष्ट करा?
संसदेचे कनिष्ठ व अस्थायी सभागृहात कोणते आहे?