क्रीडा खेळाडू

नागपूर जिल्ह्याचा उमेश यादव हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

2 उत्तरे
2 answers

नागपूर जिल्ह्याचा उमेश यादव हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?

2
क्रिकेट 

उत्तर लिहिले · 8/4/2023
कर्म · 200
1
 क्रिकेट
             या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे

 
संपुर्ण नाव- उमेशकुमार टिळक यादव

जन्मतारिख- 25 ऑक्टोबर, 1987

जन्मस्थळ- नागपूर, महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत
अन्य संघ -  मध्य विभाग, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोलकाता नाईट रायडर्स, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि विदर्भ

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 9 नोव्हेंबर, 2011, ठिकाण – दिल्ली

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 28 मे, 2010, ठिकाण – बुलवायो

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 7 ऑगस्ट, 2012, ठिकाण – पल्लेकल्ले

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 52, धावा- 4.8, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 52, विकेट्स- 158, सर्वोत्तम कामगिरी- 6/88

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 75, धावा- 79, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 75, विकेट्स- 106, सर्वोत्तम कामगिरी- 4/31

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 9, धावा- 22, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 12, सर्वोत्तम कामगिरी- 2/19

थोडक्यात माहिती-

-उमेश यादव हा नागपूरमधील वल्ली गावातील कुटुंबातील आहे. त्याचे वडील टिळक हे कोळश्याच्या खाणीत काम करत असायचे. त्याला 2 मोठे भाऊ आहेत.

-उमेशला अभ्यासात जास्त रस नसल्याने त्याने 12वी नंतर शिक्षण सोडले.

-शिक्षणाचा त्याग केल्यानंतर यादवचे पहिले स्वप्न होते की, आर्मी बनायचे आणि देशाची सेवा करायची. पण पुढे त्याने परत दुसरे काही करायचे ठरवले.

-आर्मीत भरती न झाल्याने यादवने पोलिस हवालदार बनायचे ठरवले. मात्र त्यातही त्याला यश आले नाही. अवघ्या 2 गुणांनी तो हवालदाराच्या परिक्षेत अपयशी ठरला.

-त्यामुळे यादव टेनिस बॉलने स्थानिक मुलांप्रमाणे क्रिकेट खेळायला लागला. त्याच्या वेगवान गोलंदाजीने त्याला 10000 रुपयेही मिळवून दिले. त्याने स्थानिक स्पर्धांद्वारे क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही त्याला अपयश आले.

-त्याच्या अथक प्रयत्नांनतर यादवने शेवटी विदर्भ जिमखानामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्याने त्याच्या स्पेलच्या मदतीने 10 षटकात 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्याने, त्याचे नाव विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडे गेले.

-लवकरच यादवची विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाली. अमरावती येथे आंतर-जिल्हा 3 दिवशीय स्पर्धेत त्याच्या संघाने विजय मिळवत, मुंबईतील टी20 स्पर्धेतील एअर इंडिया संघात प्रवेश मिळवला. तिथून त्याची विदर्भ रणजी ट्रॉफी संघातील 15मध्ये निवड झाली.

-2008-09च्या रणजी ट्रॉफी हंगामात विदर्भाचा कर्णधार प्रितम गंधे याने सुरुवातीला यादवला संघात स्थान दिले नाही. पण पुढे संघातील फलंदाजाच्या जागी त्याने यादवला संधी दिली आणि यावेळी त्याने 72 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 4 महिन्यांनी यादवला प्रथम श्रेणीत खेळण्याची संधी मिळाली.

-2010च्या आयपीएल हंगामात यादवची दिल्ली डेअरडेविल्स संघात निवड झाली. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात 7 सामन्यात अवघ्या 6 विकेट्स घेतल्या.

-नोव्हेंबर 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध यादवने कसोटीत पदार्पण केले. तो विदर्भाकडून कसोटीत खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. तर, गंधे याने प्रथम श्रेणीत 340 विकेट्स घेऊनही त्याला संधी मिळाली नाही.

-यादवने त्याची फलंदाजी शैली प्रथम नोव्हेंबर 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत दाखवली. यावेळी 7व्या क्रमांकावर खेळायला गेलेल्या यादवने वरून अरोरासोबत मिळून जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 7 धावा केल्या.

-यादवच्या वेगवान गोलंदाजी शैलीला अनेक माजी क्रिकेटपटू प्रभावित झाले. झहीर खानने त्याला भारतीय संघात घेण्याची शिफारस केली. तर, गॅरी सोबर्स आणि ग्लेन मॅकग्रथ यांनी त्याच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. शिवाय डेल स्टेन जे खुद्द जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आहेत, ते यादवचे खूप मोठे चाहते आहेत.

-2015च्या आयसीसी विश्वचषकात यादवने 8 सामन्यात 17.83च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या होत्या.

-यादवने 2017च्या ओडिसाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात 119 चेंडूत 128 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 7 चौकारांचा आणि 7 षटकारांचा समावेश होता.

-2013मध्ये तानयाशी यादवने लग्न केले. ती फॅशन डिझायनर आहे. दोघेही आयपीएल सामन्यादरम्यान पहिल्यांदा भेटले होते.
उत्तर लिहिले · 14/12/2022
कर्म · 7440

Related Questions

खेळाडूंच्या दुटीने किंवा खेलात प्राधान्य मिळविण्याची दुष्टीने खेळाच्या माणसाशास्त्राचे महत्व विशेद करा 13 वि सोसायटी 101?
खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळविण्याच्या दृष्टीने खेळाच्या मानसशास्त्राचे महत्व विशद करा soc101?
डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?
माझा आवडता खेळाडू?
कबड्डी खेळाचे मुलभूत नियम कोणते आहे?
विविध स्पर्धा अथवा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती संकलन?
फाशावरून शकुन पाहण्याची विद्या कशी शिकतात?