आहार

सकस आहार म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

सकस आहार म्हणजे काय?

1
संतुलित आहार म्हणजे सर्व आवश्यक आहार घटक पुरवणारा आहार .

आहारात कोणते घटक असावेत

लहान ,किशोर वयीन ,व तरुण मुलांचा आहार

प्रोटीन्स : जास्त असणारा आहार १) शाकाहारी प्रोटीन्स २) मांसाहारी प्रोटीन्स ,मांस ,मासे ,मटण ,चिकन ,दूध इ.मांसाहारी प्रोटीन्स तर डाळ , कडधान्य,उसळी, इ शाकाहारी पदार्थ

कार्बोहाइड्रेट्स : पोळी ,भात, बटाटे ,रताळी इ कर्बोदके

फॅटस: तेल , मांसाहारी पदार्थ तील चरबी , दुधावरची साय इ

फायबर :. म्हणजे तंतूमय पदार्थ जे भाज्यांमध्ये असतात ,हातसडीचे तांदूळ ,तसेच शाकाहारी पदार्थात पाच टक्के पर्यंत असतात

व्हिटामिन्स ,मिनरल्स म्हणजे खनीज पदार्थ यात कॅल्शियम फॉस्फरस, पोटॅशियम,आयोडीन , थोड्या प्रमाणात असावेत व्हिटामिन मध्ये A ,B ,C D ,E,हे जास्त महत्वाचे जीवनसत्त्व होत , कमतरतेमुळे वेगवेगळे रोग होतात ,

संतुलित आहार खरं तर फार मोठा विषय आहे आणि प्रत्येक खाद्य घटकातून तो तो घटक चेक करून मग त्या सर्वांची बेरीज केली जाते मग स्टॅंडर्ड शी तुलना करुन ठरवलं जातं की दिलेल्या नमुन्यात किती प्रोटीन्स , कार्बोहाइड्रेट, फायबर वगैरे आहेत.

आपण जिव्हेच्या लाडामुळे आवडतं ते जास्त खातो आणि तब्येत खराब करून घेतो , व्यायाम वगैरे काही करत नाही त्यामुळे अपचन होते

सकस आहाराचे फायदे असे आहेत की शरीराची वाढ निकोप होते ,थकवा येत नाही ,स्टॅमिना वाढतो ,उंची ,वजन ,इ एकदम योग्यतेनुसार वाढते ,मूल आजारी पडत नाही अभ्यासात बुद्धी चालते उच्च दर्जाचे गुण मिळतात शेवटी प्रजाही उत्तम निघते
उत्तर लिहिले · 8/12/2022
कर्म · 5490

Related Questions

आहाराचे प्रमुख घटक कोणते?
बालका´या आहारातील अडचणी व उपाय संि©Ãत मÁयेसांगा?
मी डायबेटिक पेशंट आहे तसेच नुकतीच CABG X4 Bypass surgery झालेली आहे. कृपया मला तिन्ही वेळचा योग्य आहार सुचविणे.?
संतुलित व सकस आहार म्हणजे काय आहाराचे फायदे लिहा?
शालेय पोषण आहार योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
अति आहार हे .... चे प्रमुख कारण आहे?
मासे खाताना घशात काटा अडकल्यास उपाय कोणता करावा?