1 उत्तर
1
answers
गुगलने स्वत:कडे एवढी विविध विषयावरील माहिती कशी जमवली?
7
Answer link
यासाठी गुगल कंपनीचा उगम कसा झाला हे समजून घेणे महत्वाचे ठरेल.
विसाव्या शतकाच्या अखेरीस लोक कंप्युटरवर इंटरनेट वापरायला लागले. इंटरनेट वापरून गोष्टी शोधायला लागले. यातूनच शोध यंत्र म्हणजेच सर्च इंजिन वेबसाइट्सचा उगम झाला. जसे की गुगल, याहू, बिंग, इत्यादी. हे सर्च इंजिन सगळ्या वेबसाईटचा मजकूर साठवून ठेवतात आणि जेव्हा तुम्ही काही शोधण्यासाठी शब्द टाईप करता तेव्हा त्याला जुळणाऱ्या वेबसाईट तुम्हाला दाखवतात.
सर्व विषयावरील माहिती गोळा करण्यासाठी गुगल सतत वेगवेगळ्या वेबसाईट्सला भेट देऊन स्वतःकडे ती माहिती साठवून ठेवते. आणि जेव्हा तुम्ही काही गोष्ट शोधता तेव्हा त्यासंबंधी माहिती तुम्हाला पुरवली जाते.
ही गोष्ट सतत चालू राहते, आणि दररोज यात भर पडत राहते. हजारो वेबसाईट आणि लाखो पेजेस गुगलच्या डेटाबेस मध्ये असतात. ज्यासाठी हजारो टेराबाईट जागा लागते ज्यासाठी जगभर हजारो एकर जागेत गुगलचे डेटा सेंटर आहेत, आणि हजारो इंजिनिअर गुगल मध्ये काम करतात जेणेकरून या अथांग माहितीच्या समुद्रातून नेमकी तुमच्या गरजेची माहिती काही मिलीसेकंदात तुम्हाला दाखवली जाते.