1 उत्तर
1
answers
सायकलचे आत्मकथन कसे सांगाल?
0
Answer link
अरे! मी सायकल बोलतेय! तुझी लाडकी सायकल! आज मी तुला माझे मनोगत सांगणार आहे.
अरे मित्रा! गेले कित्येक महिने झाले तु माझ्याकडे बघितलेस ही नाहीस. आठवतोय का तुला तो दिवस? तुझा वाढदिवस होता.
तुझ्या आईबाबांनी खास तुला मी म्हणजेच सायकल वाढदिवसाची स्पेशल भेट म्हणून दिली होती. किती खुष झाला होतास तु त्या दिवशी! मला अजूनही आठवतोय तो दिवस.
तुझा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झाला होता. तु आणि तुझे मित्र खूप वेळा या नवीन सायकल वर बसून चक्कर मारून आलात.
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तु ठरविले होतेस की आता रोज शाळेत जाताना तु मला तुझ्याबरोबर नेणार. मी ही खूप खुष होते कारण मला ही शाळा बघायाची होती. आणखी वाचा......