भूमिती
8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण किती येईल?
1 उत्तर
1
answers
8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचा कर्ण किती येईल?
3
Answer link
इथे मी तुम्हाला कर्णाचे सूत्र कसे काढतात ते सांगतो पहिले. चौरस म्हणजे चारही बाजू अगदी सारखे असून एकमेकांना काटकोनात छेदतात.
ह्यामुळे कोणताही कर्ण आणि त्याच्या लगतच्या दोन बाजू 45-90-45 अंशाचा त्रिकोण बनवतात.
ह्या त्रिकोणावर आपण पायथागोरसचे प्रमेय सहज वापरू शकतो. काय म्हणतं प्रमेय??
"कर्णाचा वर्ग इतर दोन्ही बाजूचा वर्ग असतो"
कर्ण² = बाजू² + बाजू²
पण इथे चौरस असल्यामुळे दोन्ही बाजू सारख्या आहेत.
कर्ण² = 2 x बाजू²
वर्गमूळ घ्या..
कर्ण = √२ x बाजू
हे झालं कर्णाची लांबी मोजण्याचे सूत्र.. 😌😋
आता प्रश्नात विचारलेली बाजूची लांबी इथे ठेवा.
कर्ण = √२ x ८
कर्ण = 11.31 सेंटीमीटर
उत्तर आहे: ८ सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण ११.३१ सेंटीमीटर असेल. 😊