मानवी विकास
मानवी गरजांची वैशिष्टे कशी स्पष्ट कराल?
1 उत्तर
1
answers
मानवी गरजांची वैशिष्टे कशी स्पष्ट कराल?
1
Answer link
मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- (१) गरजा अमर्यादित असतात : गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज निर्माण होते.
(३) गरजा वयानुसार बदलतात : गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उदा., खेळणी, गोष्टींची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्या गरजा असतात; तर संगणक, संदर्भपुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात..
(४) गरजा लिंगभेदानुसार बदलतातः
स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदा., साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्ज् इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात.
(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.
(६) गरजा हवामानानुसार बदलतात : हवामानानुसार, ऋतूनुसार देखील गरजा बदलत जातात. उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते.
(७) गरजा संस्कृतीनुसार बदलतात : गरजांवर संस्कृतीचाही प्रभाव पडतो. उदा., खाद्यपदार्थ, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात.