Topic icon

मानवी विकास

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

- (१) गरजा अमर्यादित असतात : गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज निर्माण होते.

(३) गरजा वयानुसार बदलतात : गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उदा., खेळणी, गोष्टींची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्या गरजा असतात; तर संगणक, संदर्भपुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात..

(४) गरजा लिंगभेदानुसार बदलतातः

स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदा., साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्ज् इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात.

(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.

(६) गरजा हवामानानुसार बदलतात : हवामानानुसार, ऋतूनुसार देखील गरजा बदलत जातात. उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते.

(७) गरजा संस्कृतीनुसार बदलतात : गरजांवर संस्कृतीचाही प्रभाव पडतो. उदा., खाद्यपदार्थ, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात.
उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 48465
0
समाजातील विविध घटकांच्या परस्पर सहकार्यातून शिस्तव नियमांचा आदर करण्याची वृत्ती विकसित करणे. 

• व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज बनतो हे समजून घेणे. 
• भारतात विविध भाषा बोलणारे, विविध धर्मांचे लोक असूनही त्यांच्यात एकता आहे हे ओळखणे. 

• राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्म समभावाची आवश्यकता जाणणे.

 • सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे हे जाणून घेणे.

 • पंचायत समिती पदाधिकारी व प्रशासनाबाबत माहिती मिळवणे.

 • जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन यांची माहिती मिळवणे. 

• स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे समजून घेणे.

• ग्रामसभेत महिलांचा सक्रीय सहभाग असतो हे समजून घेणे.
उत्तर लिहिले · 18/2/2023
कर्म · 9415
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
माणसाला सुरक्षितता आणि स्थिरता हवी असते.

जेव्हा मनुष्याला समजले की त्याला सुरक्षा मिळू

शकते इतरांसोबत एकत्र राहून तो जगू लागलासंघटित जीवन.

समाजाचे व्यवहार सुव्यवस्थित चालण्यासाठी नियमन आवश्यक आहे हे मानवाला जाणवले.

त्यामुळेच विशिष्ट पुत्राच्या सामान्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समाज अस्तित्वात येतो.


मानवी समूह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याचे प्रमूख कारण म्हणजे मानवामधील परस्पर संबंध प्रस्थापित होत असतात. समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न केले जातात आणि संबंधाची व्यवस्था टिकून राहवी म्हणून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते.त्यामुळे मानवी समूह व्यक्तीच्या अस्तित्वासाठी समाजाच्या सातत्य व स्थैर्यासाठी अत्यंत आवष्यक आहे. या संकल्पनेची व्याख्या आणि स्वरूप पाहणे अत्यंत आवष्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/7/2022
कर्म · 48465
0



कलम २: या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री-पुरुषभेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणताही भेदभाव केला जाता कामा नये.


कलम ३: प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.

कलम ४ : कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मना‌ई-करण्यात आली पाहिजे.


कलम ४ : कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे

कलम ५: कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.


कलम ६: प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.

कलम ७: सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे .


कलम ९: कोणालाही अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये.

कलम ११: दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत, तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे.


कलम १३: प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

कलम १५: प्रत्येकांस राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे. कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदतः हिरावून घेतले जाता कामा नये, तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नाकारता कामा नये.


कलम १९: प्रत्येकास मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

कलम २१: प्रत्येकास आपण स्वतः अथवा आपल्या इच्छेनुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.


कलम २३: प्रत्येकास काम मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल शर्तींचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.

कलम २६: प्रत्येकास शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. निदान प्राथमिक व मूलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे.


>> भारतीय संविधानाच्या भाग-३ मध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्क व अधिकार नमूद करण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने प्रदान केलेले मुलभूत अधिकार:

१. समतेचा अधिकार


२. स्वातंत्र्याचा अधिकार

३. शोषणाविरुद्धचा अधिकार


४. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार

५. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार


६. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार

    

उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 48465