देशसेवा
आपल्या देशाला भारतमाता नाव का पडले?
1 उत्तर
1
answers
आपल्या देशाला भारतमाता नाव का पडले?
3
Answer link
"भारतमाता" ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक संकल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्यामागे आहे, त्यामुळे भारत देशाची स्त्री रूपातील देवता म्हणून कल्पना मांडली गेली आणि तिची चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे वा मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्य देवतांप्रमाणे करण्याची परंपरा स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुरू झालेले दिसते.
अवनींद्रनाथ टागोर यांनी काढलेले भारतमातेचे चित्र
बंगाली क्रांतिकारक आणि विचारवंत योगी अरविंद घोष यांनी भारतमाता ही संकल्पना मांडली आहे. भारत हा देश असला तरी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विचारवंत आणि क्रांतिकारक यांनी आपल्या देशाला आई मानले. आपली आई पारतंत्र्यात असल्याने तिच्या सुटकेचा प्रयत्न तिच्या पुत्रांनी चालविला आहे अशी भावना यामागे होती. अभ्यासक, विश्लेषक, क्रांतिकारक हे भारतमातेला वंदन करतात आणि भारतातील सर्व राज्ये ही जणू काही तिची अपत्ये आहेत असेही नोंदवताना दिसतात.
आई ही देवाप्रमाणे मानली जाते कारण ती मनुष्याला जन्म देते. आईविषयीची ही कृतज्ञता पृथ्वीच्या प्रतीही व्यक्त केली जाते. हिंदू जीवनदृष्टीमधे भूमीला माता मानले गेले आहे आणि त्यामुळेच भारत देशाला "भारतमाता" संबोधण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत स्वीकारली गेली आहे. भारतमातेला गुरुस्थानी मानणे ही भारतीय क्रांतिकारी आणि देशभक्तांची प्रेरणा आहे.
|| भारत माता की जय ||
|| वंदे मातरम् ||
धन्यवाद...!!