इतिहास

संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यावर टिप्पणी कशी लिहाल?

2 उत्तरे
2 answers

संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यावर टिप्पणी कशी लिहाल?

0
संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यावरती टिप्पणी लिहा?
भारतातील प्रमुख राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा व त्याच्याशी असहकार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते काहीसे अस्वस्थ झाले होते. तत्कालीन भारतमंत्री लॉड बर्कनहेड यांनी भारतातील राजकीय पक्षांना सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याऐवजी सर्वांना मान्य होईल अशी घटना तयार करण्याचे आव्हान दिले. राष्ट्रीय सभा व अन्य राजकीय पक्षांनी लॉर्ड बर्कनहेड यांचे आव्हान स्वीकारले. मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समितीने १९२८ साली परिश्रमपूर्व घटनेचा एक आराखडा तयार केला.
तो नेहरू रिपोर्ट या नावाने प्रसिद्ध आहे. 'वसाहतीचे स्वराज्य' हे ध्येय मानून नेहरू समितीने आपला आराखडा तयार केला होता. • राष्ट्रीय सभेतील तरुण कार्यकर्त्यांना 'वसाहतीचे स्वराज्य' ही कल्पना मान्य नव्हती. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होते. तथापि एक तडजोड म्हणून सर्व राष्ट्रीय सभाजनांनी नेहरू रिपोर्टचा स्वीकार केला. मात्र ब्रिटिश सरकारला ३१ डिसेंबर १९२९ पूर्वी नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याचे राष्ट्रीय सभेने आवाहन केले. त्याचा काही उपयोग झाला नाही. राष्ट्रीय सभेच्या इशारेवजा आवाहनाला प्रतिसाद न देता सरकारने आपली दडपशाही चालूच ठेवली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सभेला आपले धोरण निश्चित करून काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सभेचे १९२९ सालचे वार्षिक अधिवेशन लाहोर येथे भरले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात लाहोर अधिवेशनाला फार महत्त्व आहे. याच अधिवेशनात राष्ट्रीय सभेने संपूर्ण स्वातंत्र्याचा ऐतिहासिक ठराव संमत केला. राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, ते देशातील चैतन्यशाली युवकांचे लाडके नेते होते. पुरोगामी समाजवादी विचारप्रणालीने ते प्रभावित झाले होते. त्यांनी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आपले पिताजी मोतीलाल नेहरू यांच्याकडून स्वीकारली.
३१ डिसेंबर १९२९ ला लाहोर येथे रावी नदीच्या तीरावर भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव गांभीर्याने व एकमुखाने संमत करण्यात आला.
उत्तर लिहिले · 28/6/2022
कर्म · 1020
0

संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव: एक टिप्पणी

संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव, ज्याला 'पूर्ण स्वराज' ठराव देखील म्हणतात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २९ डिसेंबर १९२९ रोजी लाहोर अधिवेशनात (आताचे पाकिस्तान) पारित केला. या ठरावाचा उद्देश भारतासाठी पूर्ण स्वराज्य (स्व-शासन) प्राप्त करणे हा होता.

ठरावातील काही महत्वाचे मुद्दे:

  • स्वराज्याची मागणी: या ठरावाद्वारे, काँग्रेसने ‘स्वराज्य’ या शब्दाचा अर्थ बदलून ‘पूर्ण स्वराज्य’ असा केला, म्हणजेच ब्रिटिशांकडून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे.
  • असहकार आंदोलनाची घोषणा: जर ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाला (Civil Disobedience Movement) सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • २६ जानेवारीचे महत्त्व: २६ जानेवारी १९३० हा दिवस ‘स्वतंत्रता दिवस’ म्हणून पाळला गेला.

ठरावाचे महत्त्व:

  • जनतेमध्ये उत्साह: या ठरावामुळे भारतीय जनतेमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली.
  • स्वातंत्र्यलढ्याला दिशा: या ठरावामुळे स्वातंत्र्यलढ्याला एक निश्चित दिशा मिळाली.
  • ध्येय निश्चित: भारताला आता केवळ स्वराज्यावर समाधान मानायचे नाही, तर पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे, हे या ठरावाने स्पष्ट केले.

या ठरावामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक नवं वळण आलं. यानंतर, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840

Related Questions

ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे प्रकार किती व कोणते?
इतिहास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
क्रांतीचा शोध कोणी लावला?
जिवा महाले यांची वंशावळ?