2 उत्तरे
2
answers
जिवा महाले यांची वंशावळ?
0
Answer link
जिवा महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर आणि निष्ठावानBodyguard होते. त्यांच्या वंशावळीबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- जन्म आणि कुटुंब: जिवा महाले यांचा जन्म आणि कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ते कोणत्या जातीचे होते ह्याबद्दल देखील ठोस माहिती नाही.
- कारकीर्द: ते शिवाजी महाराजांच्या सैन्यातBodyguard म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये भाग घेतला.
- आग्र्याहून सुटका: १६६६ मध्ये जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीवर गेले होते, तेव्हा तेथे त्यांना अटक करण्यात आली. त्या वेळी जिवा महाले यांनी महाराजांच्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
- शिवा काशीद: जिवा महाले यांच्याबरोबर शिवा काशीद नावाच्या आणखी एका व्यक्तीने महाराजांसाठी आपले प्राण धोक्यात घातले.
- मृत्यू: जिवा महाले यांच्या मृत्यूची तारीख आणि ठिकाण अज्ञात आहे.
अधिक माहितीसाठी काही संदर्भ:
0
Answer link
*♏जिवा महालेची वंशावळ…*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांनी बडा सय्यिद याला ठार मारले हे शिवभारत आणि इतर काही साधनांन मध्ये आले आहे. https://bit.ly/42E2WI1 प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले. ते जातीने न्हावी असून सध्या त्यांनी 'सकपाळ' असे उपनाव धारण केले आहे.

त्यांच्याकडून मिळालेली 3 पत्रे श्री.पटवर्धन यांनी पाचव्या संमेलनात प्रस्तुत केली. यानंतर श्री.द.व.पोतदार यांना निगडे येथील रायरीकर जोशी यांच्याकडे एक पत्र आणि जिवा महालेची वंशावळ मिळाली. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫ती दिन्ही पत्र ऐतिहासीक साहित्य खंड 3 मध्ये प्रकाशित केली. अफजलखान वधाप्रसंगी जिवा महालेचे वय 25 च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो.
👉वंशावळ – जिवा महालेचा मोठा भाऊ हा तान (तानाजी) महाले असावा. जिवा महालेचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी. अशी माहिती त्या वंशावळीत आहे.
हरी आणि सुभानजी हे जिवा महालेचे खापरपणतु.
छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी 15 डिसें 1702 मध्ये लिहील्या एका पत्रात “संताजी माहाला यांनी हुजूर येऊन विदित केले की मौजे जोर व गोळेगाव व गुळुंब, तर्फ मजकूर…” असा उल्लेख आला आहे.
छत्रपती शाहु महाराजांनी 7 डिसें 1709 मध्ये लिहीलेल्या पत्रात “तान महाले आणि जिवा महाले मर्दने हे पुरातन येकनिष्ट , स्वामिसनिध येकनिष्टपणे सेवा केली याकरीता खेडेबारे तरफेतील निगडे हे गाव त्यांना इनाम दिले आहे , ते त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालवावे”असा हुकूम दिला आहे.
1732 मध्ये शाहू महाराजांचे पत्र मल्हारजी बीन सुभानजी व सीताराम बीन जिवा महाले यांना दिलेले इनामपत्र. यात सुभाजी मयण पावला म्हणून इनाम गाव मल्हारजीकडे चालू राहिल असे नमूद केले आहे. .
👉संदर्भ – श्री राजा शिव छत्रपती, श्री गजानन मेहेंदळे, खंड 1 , भाग 2, पुस्तक दुसरे ♏https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24