2 उत्तरे
2
answers
वृत्तपत्रांचा इतिहासलेखनासाठी उपयोग?
1
Answer link
वृत्तपत्रे : (न्यूज पेपर). मुख्यतः वार्ता तसेच मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे 'वृत्तपत्र' (न्यूज पेपर). रोजच्या ताज्या घडामोडींच्या वार्ता देणे, जाहिराती प्रसृत करुन उद्योग व व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे व प्रभावित करणे तसेच लोकमताचे नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी आधुनिक नागर संस्कृतीत विकसित झालेल्या संस्था, असे वृत्तपत्र-माध्यमाचे वर्णन केले जाते. स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरुपाच्या विविध बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू इतर नियतकालिकांपेक्षा त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणारा आहे कारण अन्य नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना असे स्थान नसते. [→नियतकालिके]. वार्ता आणि विचार-प्रसार ह्या दोन अंगांनी मिळून वृत्तपत्रबनते चालू घडामोडींच्या नोंदींचा तो ऐतिहासिक दस्तऐवज असतो, तसेच घडलेल्या घटनेचा योग्य अन्वयार्थ लावून त्यावर भाष्य करणे, संपादकीय दृष्टीकोनातून मतप्रदर्शन करणे, हेही आधुनिक वृत्तपत्राचे महत्त्वाचे अवतारकार्य मानले जाते. वृत्तपत्रास सामान्य माणसाचे विद्यापीठ मानले जाते. माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन व सेवा ही वृत्तपत्राची चार प्रकट कार्ये होत.
विपुल, विस्तृत व विविधांगी स्वरुपाच्या बातम्या देणे, हे वृत्तपत्राचे आद्य कतव्य होय. मात्र वार्ता म्हणजे काय ह्याची काटेकोर, सर्वमान्य व सर्वसमावेशक व्याख्या करणे कठिण आहे. वाचकाला आधी ठाऊक नसलेली हकीकत नव्याने कळवणे, ताज्या घटना घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती शीघ्रतेने व तत्परतेने पुरवणे, हे वार्तेचे स्थूल स्वरुप म्हणता येईल. वार्तेचा ताजेपणा, नावीन्य व घडलेल्या घटनेचे महत्त्व ही प्रमुख वार्तामूल्ये होत. नजीकच्या भविष्यात काय घडू शकेल ह्याचा अंदाज वर्तवणे, हेही वृतपत्रीय वार्ताकथनाच्या कक्षेत येते. वार्तेचा ताजेपणा व नावीन्य यांबरोबरच, स्थलसान्निध्य वा स्थानिकत्व, व्यक्तिमाहात्म्य वा पदमाहात्म्य, एखाद्या घटनेचे संभाव्य दूरगामी परिणाम ही काही अन्य महत्त्वाची वार्तामूल्ये होत. आधुनिक वृत्तपत्रव्यवसायाच्याकेंद्रस्थानी वार्ताहर असतो. दैनिक वृत्तपत्र वेळच्यावेळी नियमितपणे प्रकाशित करण्यासाठी गतिमान कार्यक्षमतेची गरज असते. वार्ताहर, संपादकवर्ग, छायाचित्रकार, चित्रकार आदींना ठरलेली अंतिम मुदत पाळण्याच्या दडपणाखाली सदैव तत्परतेने व शीघ्रगतीने आपापली कामे पार पाडावी लागतात. [→वृत्तपत्रकारिता]. जाहिरात विभाग हेही वृत्तपत्र व्यवसायाचे एक अपरिहार्य अंग आहे. उत्पादकांचा माल आकर्षक जाहिराती छापून व वाचकांना उपयुक्त वस्तूंची माहिती देऊन सेवा पुरवणे, ही उद्दिष्टे वृत्तपत्राद्वारे साधली जातात व त्यातून वृत्तपत्रांना आर्थिक लाभही होतो. समाजातील सर्वच घटकांना या ना त्या स्वरुपाची उपयुक्त व मार्गदर्शक माहिती वृत्तपत्रे पुरवत असतात. त्यामुळेच वृत्तपत्र हा जरी व्यवसाय असला, तरी ते जनसेवेचे उपयुक्त साधनही आहे. त्याप्रमाणे ते प्रभावी व सर्वदूर पोहोचणारे संपर्कमाध्यम आहे.
जगातील बहुतेक वृत्तपत्रे साधारणपणे दोन प्रमाणित आकारांत छापली जातात (१) वृत्तपत्रिकेच्या (टॅब्लॉइड) आकारात म्हणजे सु. २८ X ३८ सेमी. किंवा (२) बृहतपत्रकाच्या (ब्रॉडशीट) आकारात म्हणजे ३८ X ५८ सेमी. वृत्तपत्राच्या छपाईसाठी साधारणपणेस्वस्तातला, वृत्तपत्री कागद (न्यूजप्रिंट) वापरला जातो. वृत्तपत्राचे अन्य नियतकालिकांच्या तुलनेत लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे, त्याची पाने सुटी व घड्या घातलेली असतात जाड अक्षरांतील मोठे ठळक मथळे, चित्र, व्यंगचित्रे, अनेकविध आकर्षक आणि रंगीबेरंगी जाहिराती यांमुळे वृत्तपत्राचे दर्शनी रुप वेधक व आकर्षक बनते. जाहिरातींचे प्रमाण वृत्तपत्राच्या आकारमानाच्या सु. ३५ ते ६० टक्क्यांपर्यंतही असू शकते. वृत्तपत्राचे पाने भारतासारख्या देशात कमीत कमी दोनपासून सोळा पृष्ठांपर्यंत आढळतात. परदेशांत मात्र ते ७५ ते ८० किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
वृत्तपत्रांचे प्रमुख प्रकार म्हणजे – (१) दैनिक, (२) साप्ताहिक, (३) खास आस्थाविषयक (स्पेशल इंटरेस्ट) वार्तापत्रे, (४) वृत्तनियतकालिके,
दैनिक वृत्तपत्रे : दैनिकांतून जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या तसेच स्थानिक ताज्या वार्ता विपुल प्रमाणात व त्यांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार कमी अधिकविस्तृत, तपशीलवार दिल्या जातात. संपादकीय वा अग्रलेख, स्फुटे, स्तंभ, विशेष लेख किंवा वृत्त लेख (फीचर आर्टिकल) ह्यांतून मतप्रदर्शन केले जाते. वाचकांच्या पत्रव्यवहारासारखी सदरे असतात. मोठ्या दैनिक वृत्तपत्रांमध्ये माहितीचे वैविध्य व व्याप्ती खूपच मोठी असते. अनेकविध विषयांतील ताज्या घडामोडींच्या वृत्तकथा (न्यूजस्टोरी) व विशेष लेख दिले जातात. अन्य वृत्तकथांमध्ये गुन्हे, अपघात, आपत्ती तसेच नानाविध आस्थाविषयांचा (उदा., भविष्य, आरोग्य, बालसंगोपन, वेशभूषाप्रकार, इ.) समावेश होतो. भिन्नभिन्न वाचकगटांसाठीही खास सदरे वा पुरवणी - विभाग असतात. उदा., स्त्रीजगत, मुलांसाठी ज्ञान-रंजन पुरवण्या इत्यादी. नवेनवे चित्रपट, नाटके, साहित्यकृती, कलाकृती आदींची परिक्षणे, कलाप्रदर्शनांचे वृतांत, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती इ. पूरक वाचनीय मजकूर दिला जातो. वृत्तपत्रांच्या जास्त पानांच्या रविवार आवृत्त्या वा विशेष पुरवण्याही त्यासाठी काढल्या जातात. रोजच्या घडामोडींवर भाष्य करणारी छोट्या-मोठ्या आकारांची व्यंगचित्रे छापली जातात. अनेक दैनिक वृत्तपत्रे सकाळी लवकर वितरित होणारी (मॉर्निंग न्यूज पेपर्स), काही दुपारची (मिड् डे), तर काही सायंदैनिके असतात.
0
Answer link
वृत्तपत्रांचा इतिहासलेखनासाठी उपयोग:
वृत्तपत्रे ही इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने आहेत. त्यांचा उपयोग इतिहासलेखनासाठी अनेक प्रकारे होतो:
- समकालीन माहिती: वृत्तपत्रे त्या त्या वेळच्या घटना, घडामोडी, आणि सामाजिक स्थितीची माहिती देतात. त्यामुळे इतिहासकारांना भूतकाळातील घटनाक्रम आणि परिस्थिती समजून घेणे सोपे जाते.
- राजकीय आणि सामाजिक विचार: वृत्तपत्रांमधून तत्कालीन राजकीय विचार, सामाजिक मुद्दे आणि लोकांची मते समजतात. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे दृष्टिकोन वृत्तपत्रांमधून लोकांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे त्या वेळच्या समाजाची मानसिकता कळते.
- आर्थिक माहिती: वृत्तपत्रे व्यापार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित बातम्या आणि आकडेवारी देतात. त्या आधारावर आर्थिक इतिहास लिहीला जाऊ शकतो.
- सांस्कृतिक माहिती: वृत्तपत्रे कला, साहित्य, उत्सव आणि लोकांच्या जीवनशैलीबद्दल माहिती देतात.
- जाहिराती: वृत्तपत्रांतील जाहिराती त्यावेळच्या उत्पादनांची, सेवांची आणि लोकांच्या आवडीनिवडींची माहिती देतात.
- संपादकीय लेख: वृत्तपत्रांतील संपादकीय लेख हे त्या वेळच्या महत्त्वाच्या घटनांवर आणि मुद्द्यांवर भाष्य करतात.
उदाहरण:
- भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासासाठी त्या वेळच्या वृत्तपत्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 'केसरी', 'मराठा', 'अमृत बाजार पत्रिका' यांसारख्या वृत्तपत्रांनी जनजागृती केली आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. केसरी वृत्तपत्र (महाराष्ट्र शासन)
त्यामुळे, वृत्तपत्रे इतिहासाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत आणि त्यांचा वापर इतिहासलेखनासाठी उपयुक्त ठरतो.