शब्दाचा अर्थ साहित्य

वाडमय म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

वाडमय म्हणजे काय?

1
वाडमय म्हणजे काय?
आपण भाषेत बोलतो ती वाक्यें बोलतो. वाक्याला वाक्य जोडून सुसंगत व दीर्घ असें महावाक्यही बोलतो. काही महावाक्यें स्मरणीय ठरली आहेत. अशी स्मरणीय महावाक्यें साकल्याने घेतली म्हणजे त्याला वाडमय म्हणावें. वाडमय अनेकविध असतें.

वाङ्मय अपौरुषेय असेल वा पौरुषेय असेल. त्याचप्रमाणे वाडमय शास्त्र, विद्या ह्या स्वरूपाचें म्हणजे ज्ञानदायी असेल वा आपल्याला रचेल अशा रीतीने संस्कार करणारें असेल. अपौरुषेय वाङ्मय हे सगळे शास्त्र, विद्या म्हणून गणले जाते. > (म्हणजे अपौरुषेय शास्त्र, पौरुषेय शास्त्र, आणि पौरुषेय शास्त्रेतर अशा तीन वाङ्मयविधा ठरल्या. ज्या माणसांनी अपौरुषेय वाङ्मयाची रचना केली असें आपण आधुनिक म्हणू त्यांना ती रचना केवळ स्फुरली, त्यांचें कर्तृत्व त्यात नाही असें प्राचीन भारतीय मानीत. )अशोक रा. केळकर

< अपौरुषेय शास्त्रवाङ्मय म्हणजे संहिता, ब्राह्मणे, उपनिषदें, आरण्यकें मिळून झालेले आणि ॠग्वेद, यजुर्वेद, सामवेद ही वेदत्रयी आणि अथर्ववेद ह्यांमधून विभागलेलें वेदवाङमय (म्हणजेच श्रुतिग्रंथ, आगमग्रंथ, निगम). हाच उरलेल्या सर्व म्हणजे पौरुषेय वाडमयाचा आधार आणि स्रोत आहे. >

< पौरुषेय शास्त्रवाडमय तीन प्रकारचें ज्ञान देतें: (१) केवळ बुद्धिगम्य, बोद्ध; (२) शासन घालून देणारें, नियोगभाक् आणि (३) व्यवहारयोग्य असें. (९) तें निरनिराळ्या विषयांतून विभागलेलें असतें. >

< पौरुषेय शास्त्रेवर वाङमय म्हणजे इतिहासग्रंथ ( रामायण, महाभारत), अठरा पुराणे, आणि साहित्य ( म्हणजेच सारस्वत ) किंवा काव्य > ( इतिहास म्हणजे हिस्टरी नव्हे, पुराणे म्हणजे अॅटिक्विटीज नव्हे, तर दोन्ही म्हणजे लेजंडरी को निकल्स पुराणांतून कधीकधी शास्त्रसंकलनही येतें उदाहरणार्थ, विष्णुधर्मोत्तर पुराण अग्निपुराण (अध्याय ३३६-४६) ह्यांमधून आलेली नाटयमीमांसा किवा साहित्य मीमांसा साहित्य म्हणजे 'ललितवाडमय'.)

आता आपण थोडक्यात पौरुषेय शास्त्रवाङ्मयाची विषयवार विभागणी पाहू. < वेदवाङमयाच्या डोळस अभ्यासाला आवश्यक शास्त्रे म्हणजे सहा वेदांगें : शिक्षाशास्त्र (वर्णोच्चारशिक्षा, ऑर्थोएपी), कल्पशास्त्र (धर्मविधि करणे, त्यासाठी उपकरणे बनवणे आणि वापरणें ह्यांचें

शास्त्र),

व्याकरणशास्त्र ( म्हणजेच शब्दशास्त्र ) ( शब्द सिद्ध करून त्यांची वाक्यें बनवणें), निरुक्त (निघण्टमधल्या शब्दांची फोड करून त्यांचा अर्थ लावणे), छंद:शास्त्र (पद्यरचना ), आणि

ज्योतिष (म्हणजेच ज्योतिषिद्या, ज्योतिःशास्त्र) (आकाशस्थ गोलांच्या गतींचे गणित बसवून कालनिर्णय करणे ) >

< निघण्टु म्हणजे वेदांतील शब्दांची यादी, ती तयार झाल्यावर निरुक्त येतें. > < मीमांसाशास्त्र ( म्हणजेच वाक्यशास्त्र, वाक्यें आणि वाक्यबंध ह्यांची फोड करून त्यांचा अर्थ लावणे, हमिन्यूटिक्स) > वेदांगात घालण्याचा प्रघात नाही, पण < याचा उल्लेख वेदागांबरोबर करता येईल. > [१०]

< आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद ह्यांना अनुक्रमे चार वेदांचे उपवेद म्हणून मानतात. > (आयुर्वेद म्हणजे वैद्यक, गांधर्ववेद म्हणजे संगीतशास्त्र, स्थापत्य म्हणजे सिव्हिल अॅड मेकॅनिकल एंजिनियरिंग)

<काही विद्या धर्म, अर्थ, काम, , आणि मोक्ष ह्या चार पुरुषार्थाशी अनुक्रमे जोडलेल्या आहेत: स्मृति किंवा ध मंशारत्र अर्थशास्त्र आणि राजनीति ( तिच्या पोटात दंडनीति); कामशारण; योग आणि वेदांत दर्शनें (हीं मोक्षशास्त्रात पडतील). नास्तिक दर्शने म्हणजे वेदवाडमय अपौरुषेय आहे हे मान्य न करणारी दर्शने त्यांचाप्राचीन भारतीय साहित्य मीमांसा

उल्लेखही योग व वेदांत ह्यांच्याबरोबरच करता येईल. >

( शिवाय इतरही काही विद्या येतात गणित (अंकगणित, बीजगणित, रेखा गणित) [११], प्रमाणशास्त्र (म्हणजेच तर्कशास्त्र, न्यायशास्त्र; प्रमाण म्हणजे एव्हि डन्स, तर्क म्हणजे आर्ग्युमेंट, न्याय म्हणजे रोझनिंग – ह्या सर्वांचें शास्त्र म्हणजे एपिस्टिमॉलजी, डायलेक्टिक्स, आणि लॉजिक मिळून), आन्वीक्षको (फिलसॉफिकल अनॅलिसिस), आणि सांख्य व वैशेषिक दर्शनें (नॅचरल फिलॉसफी) ह्यांचें आवाहन केवळ बुद्धीला आहे. ) [१२]

(आन्यीक्षकी म्हणजे प्रत्यक्ष (परसेप्शन अँड इंट्रोस्पेक्शन) आणि आगम (रेव्हलेटरी टेक्स्ट) ह्या प्राथमिक प्रमाणांवरून अनुमानाच्या साहाय्याने ज्ञान मिळवण्याचा मार्ग; विशेषतः बुद्धिगम्य अशो शास्त्रपद्धति; त्यातूनही विशेषतः ही पद्धति आत्मविद्येला लावलेलो असतांना; त्यातूनही विशेषतः दर्शनांपैकी बुद्धीचा विशेष आदर करणारी न्याय, वैशेषिक, लोकायत, सांख्य, योग अशी दर्शन ) (१३)

< खेरीज साहित्यमीमांसा ( म्हणजेच साहित्यविद्या, काव्यशास्त्र, अलंकार शास्त्र), कृषि-गोरक्ष-वाणिज्य ह्या वृत्तींबद्दलचा विचार म्हणजे वार्ता ह्या इतर विद्या येतात. शास्त्रत्व न पावलेल्या किरकोळ कला येतात ( उदाहरणार्थ अश्व परीक्षाकला ) > [ १४ ]

महत्त्वाच्या विद्यांचें परिगणन करण्याच्या दोन ठळक पद्धति दिसतात. पहिली पद्धति म्हणजे ब्राह्मणाला साजेसा अभ्यासक्रम चार वेद, सहा वेदांगें, मीमांसा, न्याय, पुराणे, आणि धर्मशास्त्र ह्या चौदा विद्यांचा. दुसरी पद्धति म्हणजे राजन्याला ( म्हणजेच क्षतियाला ) साजेसा अभ्यासक्रम अपीस्पेय अशी वेदत्रयी ( वेद, यजुर्वेद, सामवेद), बोद्ध असो आन्वीक्षको, नियोगभाक् अशी राजनीति, आणि व्यव हारयोग्य अशी एखादी वार्ता अशा चार विद्यांचा. त्यांत साहित्यविद्या ही पाचवी विद्या म्हणून गणावी हा राजशेखरासारख्या साहित्यवेत्त्यांचा आग्रह !

पौरुषेय शास्त्रवाङ्मयाचा विषयविस्तार आपण पाहिला. हे पौरुषेय शास्त्र वाङ्मय आणि पौरुषेय शास्त्रेतर वाडमय ह्यामध्ये एक श्रेणिव्यवस्था दिसते. पौरुषेय वाङ्मयापैकी काही वाडमय विशेष स्थानी असणारें म्हणजे अपौरुषेय वाडमयाच्या अधिक जवळ जाणारें, उरलेल्या पौरुषेय वाङ्मयाला आधार देणारें आहे असें दिसतें. जोडीला अपौरुषेय वाङ्मय घेतलें तर तीन श्रेणी मानता येतात : (१) 'ऋषिप्रणीत' अपौरुषेय विद्या, (२) 'पुराणपुरुषप्रणीत' विद्या आणि इतिहासपुराणग्रंथ, आणि (३) 'ऐतिहासिक पुरुषप्रणीत' विद्या आणि साहित्यग्रंथ. आकृति १ मध्ये हो व्यवस्था थोडक्यात दाखवली आहे. ( आकृति पुढील पानावर पहा.)

ह्या तीन श्रेणींचा अधिक विचार साहित्यप्रक्रियेचे स्वरूप ह्या छेदकाच्या सुरवातीला येईल.१०



नाट्यशास्त्र आणि साहित्यशास्त्र ह्यांचें उदाहरण घ्यायचें झालें तर नाट्यशास्त्र आणि साहित्यशास्त्र ह्यांना भरतमुनींच्या नाटयशास्त्राचा आधार आहे, त्याबाहेर

'

आकृति १



ती जात नाहीत. त्या ग्रंथाला नाटयवेद किंवा पंचमवेद म्हटल्याने ही प्रतिष्ठा सुचवली जाते. ब्रह्मसूत्रे, व्याकरणारंभीचीं शिवसूर्वे इत्यादिकांची तीच प्रतिष्ठा आहे. ह्या मधल्या श्रेणीतल्या वाड्मयाचे कर्ते सहसा ऐतिहासिक पुरुष म्हणून दाखवले जात नाहीत, तर त्याचें कर्तृत्व वाल्मिकी, भरतमुनि, मनु, कृष्णद्वैपायन पाराशर व्यास (महाभारत, पुराणे ह्यांचा कर्ता), बादरायण व्यास (ब्रह्मसूत्रांचा कर्ता), जैमिनी ( मीमांसासूत्रांचा कर्ता) अशा दिव्य पुराणपुरुषांकडे दिलें जातें. त्यांनी ही विद्या ब्रह्मदेव, शिव आदींकडून मिळवली असेंही सांगण्यात येतें. (१५)

प्राचीन भारतीयांच्या विचारविश्वात साहित्य आणि साहित्यविद्या ह्यांना किती महत्त्वाचे स्थान आहे हे ह्या रूपरेषेवरून स्पष्ट होईल. रामायणाला काव्य म्हणणें किंवा रामायण, महाभारत ह्यांचा विचार साहित्यविद्येत करणे इथपर्यंत ते जातात. (१६) वेदसंहितेमधल्या उपस्-सूक्तांचा विचार काव्य म्हणून त्यांनी केला होता का ? (आधुनिक तसा करतात, पण ती निराळी गोष्ट आहे.) साहित्य आणि काव्य ह्या त्यांच्या संज्ञांचा अधिक विचार साहित्यव्यापाराचें स्वरूप ह्या नंतरच्या छेदकात येईल.

त्याचप्रमाणे ह्या विचारविश्वात वाग्व्यापाराला ('भाषाव्यापारा'ला ) फार महत्व आहे हेंही उघड आहे. भाषाव्यापाराचा अभ्यास ह्या ना त्या प्रकाराने करणारे ग्रंथ म्हणजे < धातुकोष व अभिधानकोष (म्हणजेच नामकोष) ( कोष म्हणजे ह्या ठिकाणी 'डिक्शनरी नव्हे तर 'थिसॉरस') आणि शिक्षा, व्याकरण, J निरुक्त,वाङ्‌मयेतिहासाच्या संदर्भात सर्वप्रथम 'वाङ्‌मय'म्हणजे फक्त ललित वाङ्‌मय की ललित, तात्त्विक, वैचारिक, वैज्ञानिक, माहितीपर इ. सर्व प्रकारचे वाङ्‌मय हा प्रश्न उद्‌भवतो. वाङ्‌मयेतिहास हा काही विचारांचा इतिहास किंवा समाजोपयोगी ज्ञानव्यूहांचा इतिहास नव्हे, असा मुद्दा उपस्थित करून वैचारिक इ.
उत्तर लिहिले · 15/6/2022
कर्म · 53700
0

वाङ्मय म्हणजे काय?

वाङ्मय (Literature) हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला जातो. 'वाङ्मय' म्हणजे "शब्दांनी बनलेले साहित्य". यात लेख, कविता, कथा, नाटके, समीक्षा, वैचारिक लेखन, आणि ललित साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखन प्रकारांचा समावेश होतो.

वाङ्मयाची काही वैशिष्ट्ये:

  • भाषा: वाङ्मय हे भाषेच्या माध्यमातून व्यक्त होते.
  • सर्जनशीलता: यात लेखक आपल्या कल्पना, भावना आणि विचार आपल्या लिखाणातून मांडतो.
  • सौंदर्य: वाङ्मयात सौंदर्य आणि आनंद देण्याची क्षमता असते.
  • विचार: वाङ्मय आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते.
  • संस्कृती: वाङ्मय त्या त्या वेळच्या समाजाची संस्कृती आणि इतिहास दर्शवते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840

Related Questions

रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?
11 ते 23 च्या दरम्यानच्या सर्व सम संख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?