ऊर्जा

गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय?

0

ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. उदाहरणार्थ, एक लोखंडी गोळा उंचावरून सरळ जमिनीवर खाली पडला, तर जमिनीला इजा पोहचते किंवा तेथे खळगा पडतो म्हणजेच तेथे काही कार्य होते. यावरून असे लक्षात येते की, उंचीवर असताना लोखंडी गोळयात ऊर्जा असते. नुसता गोळा जमिनीवर ठेवला तर ते कार्य करत नाही. म्हणजेच ही ऊर्जा सापेक्ष (स्पष्ट दिसणारी) असते. व पृष्ठभागापासून वस्तूंची उंची वाढल्यास ती वाढत जाते. वस्तुतील स्थितिज ऊर्जा ही आपल्याला तिचे वजन म्हणजेच वस्तुमान (m) व गुरूत्व त्वरण (g) आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची (h) यांच्या गुणाकाराने मिळते. म्हणून पृथ्वीची गुरूत्वीय स्थितीज ऊर्जा mgh म्हणजेच वस्तुमान xगुरूत्व त्वरण x उंची असते. परंतु मुलांनो, जेव्हा h चे मुल्य अधिक असते तेव्हा g चे मुल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू ही पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते आणि अशावेळी वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्व बलही कार्य करीत नाही. त्यामुळे तेथे वस्तूची गुरूत्वीय स्थितीज ऊर्जा शून्य घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात स्थितीज ऊर्जा शून्याहूनही कमी असेल तर ती ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असतांना तिची : गुरुत्वीय ऊर्जा = ( ऋण गुरुत्वीय स्थिरांक (-G)x पृथ्वीचे वस्तुमान(M)x पदार्थाचे वस्तुमान(m))/(पृथ्वीची त्रिज्या(R)+ पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची(h)). म्हणजेच(-GMm)/(R+h)एवढी घेतली जाते. येथे, R = पृथ्वीची त्रिज्या आणिM = पृथ्वीचे वस्तुमान आहे.
iOS App Development Basics
प्रस्तावना
iOS App Development Basics
बल व गती
iOS App Development Basics
वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल
iOS App Development Basics
केप्लरचे नियम
iOS App Development Basics
न्युटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
iOS App Development Basics
एक समान वर्तुळाकार गती / अभिकेंद्री बलाचे परिणाम
iOS App Development Basics
सोडविलेली उदाहरणे
iOS App Development Basics
उदाहरण 2
iOS App Development Basics
माहित आहे का तुम्हाला?
iOS App Development Basics
सोडविलेली उदाहरणे
iOS App Development Basics
जरा डोके चालवा
iOS App Development Basics
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व त्वरणाचे (g) मूल्य
iOS App Development Basics
‘g’ च्या मुल्यात होणारे बदल
iOS App Development Basics
वस्तूमान व वजन
iOS App Development Basics
जरा डोके चालवा
iOS App Development Basics
माहीत आहे का तुम्हांला? गुरूत्वीय लहरी
iOS App Development Basics
मुक्तपतन
iOS App Development Basics
माहीत आहे का तुम्हांला?
iOS App Development Basics
उदाहरण 2
iOS App Development Basics
गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा
iOS App Development Basics
m वस्तुमान असलेल्या वस्तूची ऊर्जा
 
उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 48555

Related Questions

कोणत्या प्रकाशात सर्वात जास्त ऊर्जा असते?
हायड्रोजनचे रूपांतर कोणत्या वायूमध्ये होते, म्हणजे सूर्याची ऊर्जा उत्पन्न होते?
हायड्रोजनचे रूपांतर कशामध्ये होण्याची प्रक्रिया म्हणजेच सूर्याची ऊर्जा उत्पन्न होते?
सौर ऊर्जेचे सगळ्या इंधनाचा स्वस्त ऊर्जास्त्रोत कोणता आहे?
हरित ऊर्जा म्हणजे काय?
तुमच्या सभोवताली आढळणारी ऊर्जा रूपांतरणाची विविध उदाहरणे कशी अभ्यासाल?
जास्त कार्यक्षम उपकरणे वापरून ऊर्जेचा वापर कमी कसा करावा?