ऊर्जा उत्पन्न विज्ञान

हायड्रोजनचे रूपांतर कोणत्या वायूमध्ये होते, म्हणजे सूर्याची ऊर्जा उत्पन्न होते?

1 उत्तर
1 answers

हायड्रोजनचे रूपांतर कोणत्या वायूमध्ये होते, म्हणजे सूर्याची ऊर्जा उत्पन्न होते?

2
सूर्य...:-

सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. सूर्याच्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला ४ दशलक्ष टन वस्तुमान हे सूर्याच्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. ५०० कोटी वर्षांनी सूर्य एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू (White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.

सूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. सूर्याला स्वतःचे प्रखर चुंबकीय क्षेत्र आहे. हे क्षेत्र दर वर्षी बदलते व दर अकरा वर्षांनी त्याची दिशा उलट होते. सूर्याच्या बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर सौरडाग (Sunspots) व सौरज्वाला (Solar flames) तयार होतात तसेच सौरवातामध्ये बदल घडतात. सूर्यावरील ह्या घडामोडींमुळे रेडिओ लहरींचे दळणवळण व विद्युत्‌वहनामध्ये व्यत्यय निर्माण होतात. पृथ्वीच्या वातावरणात मध्यम ते अति उंचीवर घडणारे आणि चुंबकीय ध्रुवांजवळ दिसून येणारे "अरोरा" (Aurora) हेही ह्याच घडामोडींचा परिणाम आहेत. या सौर घडामोडींचा सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीमध्ये फार मोठा वाटा आहे. या घडामोडी पृथ्वीच्या बाह्यवातावरणातही मोठा बदल घडवतात.

पृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा या नात्याने शास्त्रज्ञांनी सूर्याचा खूप खोलवर अभ्यास केला असला तरी बरेच प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. उदा. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० केल्व्हिन आहे तर वातावरणाचे तापमान काही ठिकाणी एक दशलक्ष केल्व्हिनच्या वर पोहोचते. वास्तविकतः हे उलट असण्याची अपेक्षा आहे, पण याचे कोडे अजूनही पूर्णपणे सुटलेले नाही. सौरडागांचे चक्र, सौरवातांची व सौरज्वालांची उत्पत्ती व त्यांची भौतिकी, प्रकाश किरीट व क्रोमोस्फेअर यांच्यामधील चुंबकीय क्रिया-प्रतिक्रिया हे शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे मुख्य विषय आहेत.

सूर्याच्या गाभ्याची त्रिज्या सूर्याच्या एकूण त्रिज्येच्या २०-२५% आहे असे समजले जातं.  गाभ्याची घनता १५० ग्रॅ/सेमी३ (पाण्याच्या १५० पट) आणि तापमान साधारण १.५७ कोटी केल्व्हिन (K) आहे. सोहो (Solar and Heliospheric Observatory/SOHO) ने केलेल्या निरीक्षणांवरून सूर्याचा गाभा त्याबाहेर असणाऱ्या प्रारण विभागापेक्षा अधिक वेगाने फिरत असावा असा अंदाज बांधलेला आहे. सूर्याच्या बहुतांश आयुष्यात सौरऊर्जा अणूमीलनातून nuclear fusion तयार होते. याला p–p (proton–proton) chain असंही नाव आहे. यात हायड्रोजनचे हेलियममधे रूपांतर होते. Through most of the Sun's life, energy is produced by nuclear fusion through a series of steps called the p–p (proton–proton) chain; this process converts hydrogen into helium. सूर्यातली फक्त ०.८% ऊर्जा कार्बन-नायट्रोजन-ऑक्सिजन-चक्रातून मिळते. (CNO cycle).

धन्यवाद...!!

उत्तर लिहिले · 10/8/2022
कर्म · 19610

Related Questions

विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या ? त्या परिपूर्ण आहेत का ? या विषयी थोडक्यात चर्चा करा
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
विज्ञानाच्या अभ्यास पद्धती कोणत्या त्या परिपूर्ण आहेत का याविषयी थोडक्यात चर्चा करा?
विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या त्या परिपूर्ण आहेत का याविषयी थोडक्यात चर्चा करा GKN 101 पेज नो?
विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या त्या परिपूर्ण आहेत का याविषयी थोडक्यात चर्चा करा विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या?
१. विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या? त्या परिपूर्ण आहेत का? याविषयी थोडक्यात चर्चा करा.
विज्ञानाच्या अभ्यासाच्या पध्दती कोणत्या?