ऊर्जा हरितगृह

हरित ऊर्जा म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

हरित ऊर्जा म्हणजे काय?

6
1. जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा असे म्हणतात.

2. यालाच पर्यावरणस्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते.
3. या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते. प्रदूषणमुक्त असते. तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.

4. हरित ऊर्जेची उदाहरणे:

जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती, जैविक इंधन पासून तयार केलेली ऊर्जा.
उत्तर लिहिले · 16/2/2022
कर्म · 121725

Related Questions

हरित लावक कशासी संधीत आहे?
हरीत गृहातील कार्बन वायूचे प्रमाण?