अलंकार
आईचा दागिना कोणता?
1 उत्तर
1
answers
आईचा दागिना कोणता?
1
Answer link
आईचा खरा दागिना जो असतो तो म्हणजे संस्कार
प्रत्येक आई मुलीला पहिला दागिना देत असते तो देताना हि संस्कार सांगत असते आणि प्रत्येक मुलीकडे कितीही दागिने जरी आले तरी आईच्या दागिन्याचा मोल शब्दात करु शकत नाही कारण तोअ दागिना काहीही असु शकतं पैंजण किंवा पाटल्या किंवा गळ्यातील लक्ष्मी हार मग कोणताही दागिना असो नंतर मिळाल्या दागिन्यात महत्त्वाचा आठवणीचा असतो. म्हणून खरचं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीही दागिने आले तरी पहिला दागिना तो पहिलाच असतो. त्यात आईच्या मायेची वीण असते. त्यामुळेच असे दागिने कायमस्वरूपी लक्षात राहातात.
पैंजण वरून हा लेख
दागिना #- आईने दिलेला पहिला दागिना ( माझ्या आठवणीतील पैंजण)
प्रत्येक स्री च्या आयुष्यात जर महत्त्वाचे काही असेल तर ते म्हणजे सर्वप्रथम तिचे " कुटुंब " आणि दुसरे म्हणजे तिचे " दागिने ". त्यात ते दागिने कुणी जवळच्या व्यक्तीने दिले असतील तर त्याची किंमत कितीतरी पटीने वाढते. माझ्या आयुष्यात माझ्या आईकडून मिळालेला पहिला दागिना म्हणजे " पैंजण " आमचे मध्यमवर्गीय कुटुंब. तीन बहिणी आणि एक भाऊ ; आई वडील आणि आजी असा आमचा परिवार. आई वडील शेतीच्या जीवावरच घराची धुरा सांभाळत होते. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण आई वडिलांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. आम्ही पण त्यांना शेतीच्या कामात मदत करायचो. आमच्याकडे लहानपणी एक नियम होता; जर आम्ही भाऊ बहिणीनी मिळून दिलेले एखादे शेतीचे काम पूर्ण केले की आम्हाला काहितरी भेटणार हे ठरलेले असायचे. मग त्यात खाण्यापिण्याच्या वस्तू असायच्या. उदा. भेळ, पेढे आणि गोडी शेव. आमच्या गावापासून साधारणत: ५ किमी अंतरावरील दुसऱ्या गावी नेहमी गुरुवारचा बाजार भरत असे. दर गुरुवारी वडील आम्हाला तेथून भेळ आणि गोडी शेव आणायचे. पेढे आणायचे पण कधीतरी. त्यावेळी त्या गावात एक भेळ खूप प्रसिद्ध होती. " फकिरची भेळ " फकीरभाई नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने भेळीचे दुकान टाकले होते. अल्पावधीतच त्याचा मोठा ग्राहक वर्ग तयार झाला. त्या व्यक्तीला सर्व जण " फकीरमामा" म्हणू लागले. त्यांची भेळ मात्र " फकीरची भेळ" म्हणून प्रसिद्ध झाली.
पंचक्रोशीत त्याचा ग्राहक वर्ग पसरला होता त्यातील माझे वडील एक होते. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही आई वडिलांसोबत शेतीत काम करायचो. एक दिवस आम्ही शेतात वडील नांगरणी करत होते आम्ही त्यांच्या मागे वेचणीचे काम करत होतो. दुपारी जेवणासाठी बसलेलो असताना आम्ही वडिलांना म्हणालो आता आम्हाला या बदल्यात काय मिळणार. भाऊ म्हणाला फकीरची भेळ आणि गोडी शेव. पण मी म्हणाले त्या शिवाय दुसरं काहीच आणत नाहीत तुम्ही. वडील म्हणाले तुम्हाला काय पाहिजे मग??मी उत्तरले पैंजण..... भाऊ म्हणाला काही नका आणू पप्पा. उद्या काहीही मागतील ह्या. आधी काम करून घ्या मग घाला पैंजण. त्याचं एक ठरलेलं वाक्य असायचं. "नाचायला जायचय का पैंजण घालून.?" मी त्यावेळी ४ थी ला असेल. मी सर्वात लहान. त्यामुळे २-२ वर्गाने सगळे माझ्या पुढे होते. वडील म्हणाले घेवू पण सगळं काम उरकलं पाहिजे आजच. मी लहान होते त्यामुळे परिस्थितीचे मला काही एवढे माहिती नव्हते. पण मागितले की वडीलांनी कधी दिलं नाही असं झालं नाही. आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे कोणा एकीला पैंजण घेउन चालणार नव्हते. आणि तिघिंना एकाच वेळी पैंजण करणं शक्य नव्हतं. पण त्या दोघींपेक्षा माझाच जास्त हट्ट होता. कारण शालेत कुणाच्या पायात पैंजण पाहिलं की मलाही वाटायचं माझ्याही पायात असे पैंजण असावे. पैंजणचे मला खूप आकर्षण वाटायचे.
Advertisement
Powered By PLAYSTREAM
वडील तर हो म्हणाले होते पण त्यांना ते लगेच शक्य नव्हतं हे आईला माहित होतं. आणि करायचे तर तिघींना पण करायचे असं आईचं म्हणणं होतं. मग आईने त्यावर एक तोडगा काढला. माझ्या आजीचे जुन्या काळचे ६ गोठ होते. ते आईकडेच होते ठेवायला. ते मोडून आम्हाला पैंजण करायचं ठरवलं. आईने तसे आजीला विचारले. आजीने पण ना नाही केली. मग गुरुवारच्या दिवशी बाजारात जाऊन आईने ते गोठ मोडून आम्हा तिघींना पैंजण केले. आम्ही तिच्या येण्याची वाटच पाहात होतो. पैंजण येणार त्या खुशीत आम्ही दिवसभर न थकता खुप सारी कामे केली. अखेर आई जेव्हा घरी आली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेना. कारण आमच्या आयुष्यातील तो पहिलाच दागिना होता. आईने ते पैंजण आमच्या तिघींच्या पण पायात घातले. नवीन नवीन आम्हाला तर त्या पैंजण ने वेडच लावले होते. कोणाचे पैंजण जास्त वाजतात यासाठी आमची स्पर्धा लागायची. खरचं हा आमच्यासाठी असा एक दागिना होता जो आमच्या आयुष्यभर लक्षात राहाणार होता. आजही त्याच्या आठवणी आम्ही जपून ठेवल्यात.
खरचं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीही दागिने आले तरी पहिला दागिना तो पहिलाच असतो. त्यात आईच्या मायेची वीण असते. त्यामुळेच असे दागिने कायमस्वरूपी लक्षात राहातात.