1 उत्तर
1
answers
नाटक ही कोणती कला आहे?
1
Answer link
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण(१) खूप पात्रे त्यात सहभागी असतात. (२) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते. (३) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो. (४) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
नाटक : नाटक हा एक साहित्यप्रकार आहे असे म्हणण्यापेक्षा तो एक दृक्श्राव्य कलाप्रकार आहे, असे म्हणणे युक्त ठरेल. नाटक या संज्ञेचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे. ‘नट’ हा संस्कृत शब्द मुळात प्राकृतातील असून तो ‘नर्त’ (म्हणजे नाचणारा) या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृतात आला.मूळ अर्थाप्रमाणे पाहता नाटक या शब्दाचा अर्थ नाचणे असाच आहे. नट म्हणजे अभिनय करणारा, सोंग करणारा व नाटक म्हणजे नाट्यरूपाने, सोंगाच्यारूपाने दाखविणे वा सादर करणे असा अर्थ रूढ झाला. इंग्रज्रीतील ‘ड्रामा’ हा शब्द मूळ ग्रीक ‘ड्रॅन’ (Dran) या शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ कृती करणे (टू डू) असा आहे. ‘ड्रॉमेनॉन’ (Dramenon) म्हणजे केलेली कृती व ‘मायथॉस’ (Mythos) म्हणजे सांगितलेली कृती असा फरक प्राचीन ग्रीसमध्ये केला जाई. नाटक या शब्दाची व्याख्या करणे कठीण आहे. मात्र नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्या द्वाराव्यक्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव असे म्हणता येईलकिंवा नाटक म्हणजे माणसाच्या अंतर्बाह्य क्रिया-प्रतिक्रियांचे दर्शन घडविणारा आकृतिबंध होय.नाटक निर्माण करते ती द्वंद्वात्मक जीवनाची जाणीव. नाटकातूनच मानवी अस्तित्वाचे या विश्वरचनेशी काय नाते आहे, ते कळते.नाटकास पंचमवेद म्हणतात. ऋग्वेदातून ‘पाठ्य’, यजुर्वेदातून ‘अभिनय’, सामवेदातून ‘गीत’ व अथर्ववेदातून ‘विविध रस’ असे अंश घेऊन नाट्यवेद निर्माण झाला,असे भरताने म्हटले आहे. याचा अर्थ संवाद, अभिनय, संगीत आणि रस हे नाटकाचे चार घटक ठरतात. नाटकाला ‘क्रीडनीयक’ (खेळ) म्हणून निर्देशितानाते ‘दृश्य’ आणि ‘श्राव्य’ काव्य आहे, असे भरताला सुचवायचे आहे. विविध भावांनी संपन्न आणि विविध प्रसंगांनी युक्त असलेल्या लोकवृत्ताची, जगातील लोकांच्या आचारविचारांची अनुकृती म्हणजे नाटक नाटक म्हणजे भावानुकीर्तन नाटक म्हणजे जीवनाचे दर्शन घडविणारा आरसा, असे भरत म्हणतो.