2 उत्तरे
2
answers
हवा प्रदुषण प्रकल्पाचे निरीक्षणे कशी लिहावीत?
2
Answer link
हवा प्रदुषण प्रकल्प प्रस्तावना, प्रकल्पाची उद्दिष्ट्ये, प्रकल्प विषयाचे महत्व, प्रकल्प कार्यपद्धती, विश्लेषण, निरीक्षणे, निष्कर्ष,
हवा प्रदूषण प्रकल्प प्रस्तावना
आजच्या युगात पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत जाणारी लोकसंख्या, नियंत्रणाबाहेर वाढत चाललेले औद्योगिक क्षेत्र आणी वाढती शहरे आणि नैसर्गिक संसाधनांचा बेजबाबदार पणे वापर यामुळे पर्यावरण दुषित होऊन जाते. प्रदूषणामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. मानवाच्या तीन मुलभूत गरजा म्हणजे जल, जमीन आणि हवा या वेगवेगळ्या मानवी कृतींमुळे प्रदूषित होतात.
हवा प्रदूषणाचा जर आपण इतिहास पहिला तर पूर्वीची हवा ही आत्ताच्या हवेपेक्षा कित्येक पटींनी शुद्ध होती. औद्योगिक क्रांतीची सुरुवात आणि त्यानंतर वाढत जाणारे उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणवर वाढत जाणारी लोकसंख्या या लोकसंख्येला पुरवल्या जाणाऱ्या सोई सुविधा त्यासाठी तयार केली गेलीली उपकरणे यांतून दिवसेंदिवस वाढ होऊन त्यांमधून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या वायूंमुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील हवा ही प्रदूषित होत चालली आहे.
हवा प्रदुषणाची कारणे कोणती आहेत, हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत आणि हवा प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी या केल्या नाही पाहिजेत याबाबत ‘हवा प्रदूषण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सविस्तर माहिती
अनुक्रमणिका
अ.क्र.
घटक
१)
विषयाचे महत्व
२)
प्रकल्पाची उद्दिष्टे
प्रकल्प कार्यपद्धती
३)
वायू प्रदूषण संकल्पना
४)
वायू प्रदूषके
५)
वायू प्रदूषणाचे स्त्रोत आणि वायू प्रदूषण नियंत्रण उपाय
६)
हवा (प्रतिबंध आणि नियंत्रण )कायदा, १८८१
७)
निरीक्षण
८)
विश्लेषण
९)
निष्कर्ष
१०)
संदर्भ
११)
प्रकल्प अहवाल
विषयाचे महत्व
“ हवा, पाणी आणी मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलांमुळे सजीवांच्या जीवनावर घातक परिणाम होतात. किंवा कोणत्याही सजीवाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो,” याला प्रदूषण असे म्हणतात.
आज उद्योगधंद्यांची बेसुमार वाढती संख्या जर आपण पहिली तर त्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या विविध विषारी घटकांचा समावेश असलेल्या वायूमुळे हवा प्रदूषित होऊन जाते आणि याच वायू प्रदूषणामुळे अनेक व्याधी जडत आहेत. सजीवांमध्ये बुध्दीमान प्राणी म्हणून मानव वावरत आहे. त्याच्या वागणुकीतून सजीवसृष्टीच्या विकासापेक्षा स्वहितार्थ त्या सृष्टीच्या विनाशाच वाटेवरच पाऊल पडत आहेत.
औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होत असले तरीही स्वतःची प्रगती करण्याच्या चढाओढीत जलद विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत आहे. पर्यावरणाची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज विकास प्रकल्पातून होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला.
आज मानवाच्या च कृतीमुळे निष्काळजीपणामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर घातक परिणाम होत असेलेल दिसून येत आहे. आज हवा प्रदूषणाबाबत सर्वांनी सविस्तर माहिती जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. म्हणून .हवा प्रदूषण हा विषय आजच्या आधुनिक जगात फार महत्वाचा आहे.
प्रकल्प उदिष्टे
· हवा प्रदूषण म्हणजे काय त्याची संकल्पना जाणून घेणे.
· हवा प्रदुषणाचा पर्यावरणावर कोणता परिणाम होतो याची माहिती मिळवणे.
· हवा प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची माहिती घेणे.
· हवा प्रदूषणाची करणे, आणि हवा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक यांची माहिती मिळवणे.
· हवा प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाय योजना माहिट करून घेणे.
· हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या घातक परिणामांची माहिती इतरांना करून देणे.
वायू प्रदूषण
वायू प्रदूषणात अपायकारक कण, जैविक रेणू किंवा इतर हानिकारक पदार्थांचा पृथ्वीच्या वातावरणात शिरकाव होतो. यामुळे रोग, मानवांचा मृत्यू व इतर सजीवांचे नुकसान होते.
वायू प्रदूषण ( प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १८८१ नुसार वायू प्रदूषणाची व्याख्या :
“वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थांचे अस्तित्व अशा प्रमाणात, की जे मानवाला, सजीवांना, वनस्पतींना हानिकारक ठरू शकते.”
वायू प्रदूषके
· प्रमुख वायू प्रदूषके खालील प्रमाणे आहेत.
Ø अतिसूक्ष्म कण – काजळी , धूर , डांबर किंवा धूळ आणि घरगुती कचरा.
Ø विषारी वायू- कार्बन मोनोऑक्साईड , नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड व संप्लावीत सेंद्रिय संयुगे.
Ø धातू- शिसे , जस्त, लोह आणि क्रोमिअम
Ø औद्योगिक प्रदूषके – बेंझीन, इथर, असीटिक असिड, सायनाइड संयुगे इत्यादी.
Ø कृषि प्रदूषके- किडनासके, तण नाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खते.
Ø फोटोकेमिकल प्रदूषके – ओझोन, नायट्रोजन चे ऑक्साईड, अल्डीहाइड, इथिलीन, फोटोकेमिकल धुके आणि पेरोक्सी असिटील नायट्रेट (PAN)व सल्फर ऑक्साईड (SOx).
Ø किरणोत्सारी प्रदूषके – किरणोत्सारी घटक व अनु चाचणीमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग
v वायू प्रदूषणाचे मुलभूत स्त्रोत नैसर्गिक व मानवनिर्मित आहेत.
नैसर्गिक स्त्रोत:
प्रदूषणाचे नैसर्गिक स्त्रोत, जे नैसर्गिक घटनांमुळे उद्भवतात. उदा. ज्वालामुखी उद्रेक, जंगलातील वणवा, जैविक विघटन, परागकण, दलदल किरणोत्सारी घटक इ.
मानव निर्मित स्त्रोत :
प्रदूषणाचे मानवनिर्मित स्त्रोत हे मानवी क्रियांमुळे होतात. उदा: घरातील हवेतील प्रदूषके, वाहनांचे उत्सर्जन, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, कृषिजन्य क्रिया, औद्योगिक उत्सर्जन, औष्णिक वीज प्रकल्प इत्यादी.
v वायू प्रदूषण नियंत्रण उपाय
वायू प्रदूषण नियंत्रित कण्यासाठी पुढील उपाय सुचविले गेले आहेत.
1. कोळसा, जळाऊ लाकूड आणि कचरा यांना जाळणे टाळा.
2. पुनर्नवीकरणीय उर्जा संसाधनांचा उपयोग करा.
3. प्रदूषण नियंत्रण कायद्याचे काटेकोर पणे पालन करा.
4. भूपृष्ठावरील प्रदूषण कमी करण्यासाठी धुरांच्या धुराड्यांची उंची शक्य तेवढी उंच करा.
5. वातावरण शुद्ध राहण्यासाठी वृक्षारोपण करण्यावर भर द्या. वृक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात व त्यांच्या पानांवर हवेत तरंगणारे कणयुक्त घटक चिकटतात.
6. खाजगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करा.
7. वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची उत्तम पद्धत म्हणजे ‘प्रदूषण प्रतिबंध’, ज्याला स्त्रोत कमी करणे असेही म्हणतात, ही प्रक्रिया स्त्रोत प्रदूषण कमी करते, नाहीसे करते किंवा प्रतिबंधित करते.
8. प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला नियमितपणे पीयूसी (PUC) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जे भारतातील मोटार वाहने उत्सर्जन आणि प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण करणारे प्रमाणपत्र आहे.
हवा (प्रतिबंध आणि नियंत्रण )कायदा, १८८१
हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १८८१
देशातील सभोवतालच्या हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केला गेला आहे. या कायद्याद्वारे उद्योग व कारखान्यांतून उत्सर्जनाचे नियंत्रण केले जाते, ज्यायोगे हे उत्सर्जन हानिकारक पातळी पेक्षा कमी ठेवले जाते. या कायद्यामध्ये अशीही तरतूद आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषण करणारे औद्योगिक उपक्रम करण्यास परवानगी नसलेले काही भाग चिन्हांकित करू शकतात.
हवा प्रदूषण कायद्यातील तरतुदींचे कोणी उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो आणि अशा व्यावसायिकाला किंवा त्या व्यक्तीला हवा प्रदूषित केल्याबद्दल फौजदारी खटल्यांना सामोरे जावे लागते. या कायद्यानुसार परिसरात राहणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारले असेल तेव्हा माहिती धने बंधनकारक आहे.
निरीक्षणे
काही मुख्य प्रदूषके व त्यांचे परिणाम
.
सल्फर ऑक्साईड
श्वसनाचे विकार , हदय व फुफ्फुसाच्या व्याधी कमजोर दृष्टी
क्लोरोसिस, वनस्पतीच्या ऊती मृत पावणे .
नायट्रोजन ऑक्साईड
परोक्सी असिटील नायट्रेट (PAN) तयार करते, श्वसनाचे विकार, जास्त प्रमाणत असल्यास विषारी.
पिकांची उत्पादकता कमी होते.
धूळ, धूर व धुके
फुफ्फुसांच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळे.
प्रकाश परिवर्तीत करून हवामानावर परिणाम करते.
कण पदार्थ
श्वसनसंस्थेचे विकार , दमा , फुप्फुसाचा दाह , फुप्फुसांची कार्यक्षमता मंदावणे , दयविकाराचा झटका , हाडाचे विकार , कर्करोग , जड धातूंमुळे होणारे विषारिकरण.
जैव विविधतेवर विपरीत परिणाम उदा. पानांवर कला थर अथवा काजळी जमा होणे.
कार्बन मोनोऑक्साईड
रक्ताची ऑक्सिजन वहनक्षमता कमी होते, हृदय व रक्ताभिसरण संस्थेचे विकार, नवजात बालके, गरोदर स्त्रया व वृद्ध यांना जास्त धोका असतो.
जागतिक तापमानवाढ
ओझोन
तपांबरातील ओझोनमुळे श्वसनसंस्थेचे विकार होतात. जसे घशाचे त्रास, दमा, फुफ्फुसांचे विकार, छातीत दुखणे.
वनस्पतींवर विपरीत परिणाम होतात. परोक्सी असीटील नायट्रेट तयार करण्यास मदत करते. हरितगृह वायूप्रमाणे कार्यरत.
शिसे
रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवर परिणाम.
वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते.
अमोनिया
डोळ्यांची जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग व डोळे जळजळणे, दीर्घकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा, मृत्यू.
जलचरांवर परिणाम
विश्लेषण
v हवेचा गुणवत्ता निर्देशांक
v
हा गुणवत्ता विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासनातर्फे या निर्देशांकाचा उपयोग केला जातो. जसा हा निर्देशांक वाढतो, तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका वाढत जातो.
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक मूल्य
आरोग्याच्या दृष्टीकोनातून
०-५०
चांगले
५१-१००
समाधानकारक
१०१-२००
मध्यम प्रदूषित
२०१-३००
खराब
३०१-४००
अगदी खराब
४०१-५००
तीव्र प्रदूषित
निष्कर्ष
· हवा प्रदूषण म्हणजे काय त्याची संकल्पना काय आहे याबाबत माहिती मिळवली.
· हवा प्रदुषणाचा पर्यावरणावर कोणता परिणाम होतो याबाबत माहिती मिळवून तिचे संकलन केले.
· हवा प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय-योजनांची अधिक माहिती घेणे शक्य झाले.
· हवा प्रदूषणाची करणे, आणि हवा प्रदूषण होण्यास कारणीभूत ठरणारे घटक याबबत सविस्तर माहितीचे संकलन केले.
·