नैसर्गिक ऊर्जा नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक साधन संपत्तीची वैशिष्ट्ये कोणती?

4 उत्तरे
4 answers

नैसर्गिक साधन संपत्तीची वैशिष्ट्ये कोणती?

1
: मानवाला उपयुक्त अशा निसर्गातील द्रव्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. जमीन, महासागर व वातावरण यांतील कोणतेही द्रव्य आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते व परिणामी ते साधनसंपत्ती होते. एखादे द्रव्य साधनसंपत्ती होण्याच्या दृष्टीने पुरेसे उपयुक्त असावे लागतेच शिवाय त्यासाठी पुढील तीन बाबींची अनुकूलता असावी लागते.नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनःपुन्हा उत्पन्न होऊ शकणारी (उदा., वनस्पती, पाणी, वायू) आणि पुन्हा उत्पन्न न होऊ शकणारी (उदा., खनिजे) असेही प्रकार होऊ शकतात. पुन्हा उत्पन्न न होणारी साधनसंपत्ती ही संचयित असून ती वापराने संपून जाते. उदा., दगडी कोळसा, खनिज तेल इत्यादी. पुष्कळ धातू अशा तऱ्हेने पूर्णपणे संपून जात नाहीत.
[

१.२.२ साधनसंपत्ती भूगोलाची संकल्पना व वैशिष्ट्ये

मनुष्य आपल्या गरजा भागविण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या, तसेच स्वयंनिर्मित साहित्याचा उपयोग करतो, उदा. पिण्यासाठी वीजनिर्मिती, कारखाने इत्यादीसाठी पाण्याचा, खाण्यासाठी फळे, खाद्याने, दूध, मांस इत्यादी पदार्थाचा, वस्त्रांसाठी कापूस, रेशीम, कातडी इत्यादींचा, तर निवान्यासाठी पाने, गवत, लाकूड, माती, दगड, सिमेंट, खडी, वाळू, लोखंड, काच इत्यादी साहित्याचा उपयोग करतो, याशिवाय निसर्गातील हवा, सूर्यप्रकाश, नद्या, धबधबे, वनस्पती, प्राणी, ऊर्जा व खनिज साधने यांचा तो वापर करतो. रस्ते व लोहमार्ग यांचा वाहतुकीसाठी धरणे व कालवे यांचा जलसिंचन व वीजनिर्मितीसाठी उपयोग करतो. याशिवाय शैक्षणिक संस्था, प्रशासन, आरोग्य, ज्ञान, कला, कौशल्य ह्या गोष्टीही मानवास उपयुक्त आहेत. या सर्व गोष्टींचा वैयक्तिक व सामाजिक गरजा भागविण्यासाठी उपयोग होतो. यामुळे या सर्व वस्तूंना महत्त्व आहे. म्हणून साधनसंपत्ती म्हणजे काय तसेच साधनसंपत्तीची संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे.

मानवाने स्वतःच्या बौध्दिक क्षमतेचा व कौशल्याचा वापर करून साधनसंपत्तीचा विकास केला आहे. ज्ञान हीच साधनसंपत्तीची जननी आहे. सर्व प्राणिमात्रांत मानव सर्वात बुद्धिमान प्राणी असल्यानेच

३त्याने निसर्गावर नियंत्रण ठेवून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता केली आहे. निसर्गाचा मानवी कल्याणासाठी वापर केला आहे.

साधनसंपत्ती भूगोलाची वैशिष्ट्ये :

नैसर्गिक साधनसंपत्तीची काही वैशिष्ट्ये आहेत.

९. नैसर्गिक साधनसंपत्ती ही स्वतंत्र असते व ती मानवाच्या आधी पृथ्वीवर निर्माण झालेली साधनसंपत्ती आहे.

२. नैसर्गिक साधनसंपत्तीचे पृथ्वीतलावरील वितरण हे विषम स्वरूपाचे असून साधनसंपत्तीच्या वितरणावर भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आहे.

३. सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती मूलत: सुप्त अवस्थेत असतात. तिचे गुणधर्म व तिचा उपयोग करण्याचे ज्ञान मानवाजवळ असले पाहिजे. वाऱ्याचा उपयोग करण्यासाठी पवनचक्की बसवून त्यापासून विज मिळविता येते. वनस्पतींच्या मऊ लाकडापासून कागद निर्माण होतो. ऊसाच्या रसापासून साखर बनते. तसेच त्याचे अनेक उपपदार्थ निर्माण होतात. खनिज तेल शक्तिसाधन म्हणून उपयोगी पडते. अशा प्रकारे निसर्गातील सुप्त घटकांचा मानवी जीवनात उपयोग करून घेता येतो.

१.२.३ साधनसंपत्ती भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती

१. वर्णनात्मक स्वरूप :

पूर्वीच्या काळात साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास वर्णनात्मक पध्दतीने होत असे. उदा. प्राणी. वनस्पती, पाणी, खनिजे इ. घटकांचा साधनसंपत्ती भूगोलाशी संबंधित वर्णनात्मक पध्दतीने अभ्यास केला जात असे. मानव आपल्या ज्ञानाचा वापर करत तो आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी निसर्गातील उपलब्ध गोष्टींचा वापर करतो. निसर्गात सापडणारी खनिज तेल, दगडी कोळसा, प्राणी, वनस्पती, पाणी व नैसर्गिक घटकांचा अभ्यास साधनसंपत्ती भूगोलात केला जातो.

२. वितरणात्मक स्वरूप :

साधनसंपत्ती भूगोलात पृथ्वीवरील साधनसंपत्तीचे वितरण दाखविणे म्हणजे वितरणात्मक स्वरूप अभ्यासणे होय. वितरणात्मक स्वरूप हे जागतिक, राष्ट्रीय राज्य किंवा प्रदेशानुसार दर्शविता येते. साधनसंपत्तीच्या वितरणावर भौगोलिक घटकांचा भूरचना, हवामान, वनस्पती इ.चा परिणाम दिसून येतो. •साधनसंपत्तीच्या वितरणाच्या माध्यमातून भौगोलिक भिन्नता दिसून येते.३. तुलनात्मक स्वरूप :

साधनसंपत्तीची उपलब्धता ही त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते.. प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती भिन्न असल्याने त्या ठिकाणी असलेल्या उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये विविधता आढळून येते. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे चंद्रपूर येथे आढळून येतात. जलविद्युत केंद्र हे कोकण विभागात दिसून येतात. अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास करता येतो, यामुळे या विषयाला तौलनिक स्वरूप प्राप्त होते आणि भविष्यकालीन साधनसंपत्तीच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात.

४. परिवर्तनशील स्वरूप :

पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी साधनसंपत्ती, भूगर्भात असणारा खनिजसाठा, साधनसंपत्तीचा बापर यामध्ये बदल होत असतो. मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे इ. साधनसंपत्तीचा वापर दिवसेंदिवस बाढत आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण इत्यादीमुळे साधनसंपत्तीचा वापर वाढला असून • गतिशीलता निर्माण झाली आहे. लोहखनिज, खनिज तेल, दगडी कोळसा या संपत्तीचा वापर प्रचंड होत असल्याने त्यांचे साठे मर्यादित आहेत. त्याला पर्याय म्हणून अपारंपारिक ऊर्जा साधने, शक्तिसाधने, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा इत्यादींचा वापर केला जातो. म्हणजेच हे बदल परिवर्तनीय आहेत. म्हणून याला परिवर्तनशील स्वरूप म्हणता येते. लोकसंख्या वाढल्यामुळे मानवाकडून साधनसंपत्तीचा वापर वाढला, यामुळे पर्यावरणाचा न्हास होत आहे. जी साधन संपत्ती आहे तिचा योग्य व नियोजनपूर्वक वापर करून ● भविष्यकाळासाठी ती टिकवून ठेवली पाहिजे. तिचे संधारण व संवर्धन केले पाहिजे हे सर्व साधनसंपत्तीविषयी झालेले बदल गतिशील आणि परिवर्तनशील आहेत.

५.

क्रियात्मक स्वरूप :

साधनसंपत्ती ही आर्थिक क्रियाशी निगडीत असल्याने मानवी आर्थिक क्रिया व साधनसंपत्ती यांचा अभ्यास एकत्रितपणे करणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये निसर्गनिर्मित व मानव निर्मित साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. साधनसंपत्तीचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. उदा. दगडी कोळसा व खनिज तेल यांच्या निर्मितीमागची कारणे शोधणे, त्यांच्या वितरणावर कोणत्या भौगोलिक घटकांचा परिणाम होतो, त्यांच्या वितरणाची असमानता का दिसून येते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या क्रियात्मक स्वरूपात केला जातो.

६. सांख्यिकीय व तांत्रिक स्वरूप :

साधनसंपत्ती भूगोल सध्याच्या काळात उपयोजित शास्त्राकडे झुकलेला दिसून येतो. साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास फक्त वर्णनात्मक किंवा तुलनात्मक पद्धतीने होत नसून यात विज्ञान व तंत्रज्ञानाची

५भर पडून सांख्यिकी पध्दतींचा वापर होत आहे. अशा प्रकारे साधनसंपत्तीचा विकास, साधनसंपत्तीच्या वापराचे नियोजन तसेच साधनसंपत्तीविषयी निर्माण झालेल्या समस्या व उपाय इत्यादी विविध विषयांचा अभ्यास सांख्यिकी व तांत्रिक पद्धतीने करता येतो.

साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती :

मानवाच्या दीर्घ अस्तित्वासाठी साधनसंपत्तीची गरज आहे. आधुनिक काळात साधनसंपत्तीची कल्पना बदलली असून त्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश केला जातो. साधनसंपत्ती भूगोल ही आर्थिक भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. महाराष्ट्राच्या साधनसंपत्ती भूगोलाचा अभ्यास करत असताना त्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. यामध्ये भौगोलिक भिन्नतेचा अभ्यास करून साधनसंपत्तीचा शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. खालील विषयांच्या आधारे सर्वसमावेशक व्याप्ती अभ्यासता येते.

१. साधनसंपत्ती मूलभूत संकल्पना :

कोणत्याही देशाचा राज्यांचा विकास हा त्या देशाच्या राज्याच्या साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. पूर्वी फक्त प्राकृतिक घटकांचा साधनसंपत्ती म्हणून अभ्यासले जात असे. कारण अतिशय कमी प्रमाणात साधनसंपत्तीचा वापर होत असे. जसजसा मानवी विकास होत गेला त्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर वाढत गेला.

पृथ्वीवरील सर्व साधनांचा मानव स्वतःच्या आर्थिक विकासासाठी वापरत असलेल्या गोष्टींना साधनसंपत्ती संबोधले जाते. या सर्व साधनसंपत्तीचा वापर कसा करायचा, भविष्यकालीन पिढीसाठी टिकवून ठेवणे, पर्यावरणाच्या समस्या दूर करून समतोल राखणे, साधनसंपत्तीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.

२. साधनसंपत्तीची निर्मिती व विकास :

मानवी जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर आपले जीवनामधील गरजा भागविल्या जातात. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता निसर्गातून होत असे. पण आज आधुनिक काळात मानवाच्या गरजाही वाढल्या आहेत. साधनसंपत्ती ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नैसर्गिक पर्यावरणातील घटकांच्या विविध वस्तू निर्माण केल्या. ती मानवनिर्मित संपत्ती व मानव स्वतःच साधनसंपत्ती आहे. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहखनिज यांसारख्या पारंपारिक साधनांऐवजी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा इ. विविध अपारंपारिक साधनांचा वापर विकसित केला आणि आज पुनर्वापर योग्य नियोजनबध्द वापर करून मानव साधनसंपत्तीचा विकास करत आहे.३. साधनसंपत्तीचे प्रकार :

पृथ्वीच्या भूपृष्ठावर सर्वत्र साधनसंपत्ती सारख्या स्वरूपाची नाही. विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारची साधनसंपत्ती आढळते. साधनसंपत्तीच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे म्हणजेच साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती अभ्यासणे होय. साधनसंपत्तीच्या प्रकारात मानवी साधनसंपत्ती व नैसर्गिक साधनसंपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहेत. म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्व संपत्तीचा समावेश नैसर्गिक संपत्ती व मानवाने निर्मित केलेल्या वस्तू या मानवी साधनसंपत्तीमध्ये अभ्यासल्या जातात. साधनसंपत्तीच्या उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार क्षय व अक्षय संपत्तीचे अध्ययन केले जाते. सुप्त व व्यक्त स्वरूपाची साधनसंपत्ती ही वापर करण्यावर अवलंबून आहे. सुप्त साधनसंपत्ती ही सध्या वापरात नसून भविष्यकाळात तिचा वापर करता येतो. अशा प्रकारे साधनसंपत्तीचे प्रकार निर्माण झाले आहेत.

४. साधनसंपत्तीचा वापर व समस्या :

पृथ्वीतलावरील सर्व साधनसंपत्तीचा मानव आपल्या ज्ञानाच्या जोरावर उपयोग करून घेत आहे. पूर्वी मानवी गरजा फक्त अन्न, वस्त्र, निवारा इतक्याच मर्यादित होत्या, पण आज मानवाच्या गरजा अमर्यादित वाढल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर साधनसंपत्तीचा वापरही प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

साधनसंपत्तीच्या वापराबरोबर मानवाचा पर्यावरणातील हस्तक्षेप वाढला असून पर्यावरणीय समस्या

निर्माण होत आहेत. साधनसंपत्तीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर, पुनर्वापर, पर्यायी साधनसंपत्ती शोधणे

इ. विविध गोष्टींचा अवलंब करून पर्यावरणीय समस्या सोडविता येतात.

१.२.४ महाराष्ट्रातील साधनसंपत्तीचे वर्गीकरण १.२.४.१ महाराष्ट्रातील खनिज साधन संपत्ती :

महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. राज्यातील बरीचशी खनिजसंपत्ती बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात आढळते.

१. मँगनीज :

• भारतात मँगनीजचा साठा सुमारे १६१ दशलक्ष टन असून यापैकी जवळपास ४०१६ साठा महाराष्ट्रात आहे. मॅगनीजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.

२. लोहखनिज :

भारतात लोहखनिजांचा अंदाजे साठा १३४६ कोटी टन आहे. यापैकी जवळपास २०%लोहखनिज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात लोहखनिजाचे महत्त्वाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत.

४.

बॉक्साइट -

जांभा खडकात बॉक्साईटचे साठे असतात. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वेकरून अॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २११% बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते.

५. चुनखडी :

चुन्याचा मूलभूत घटक म्हणजे चुनखडके, महाराष्ट्रात भारताच्या चुनखडकाचा साठा ९% आहे. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात.

६. डोलोमाईट :

डोलोमाईटच्या एकूण उत्पादनापैकी १०% उत्पादन लोह पोलादनिर्मितीसाठी वापरले जाते. याचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत.

महाराष्ट्रात पूर्व भागात खनिज संपत्तीचे केंद्रीकरण झालेले आहे. दगडी कोळसा, मँगनीज,

लोहखनिज व चुनखडक हे प्रामुख्याने आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात खनिज संपत्ती

आहे.

१.२.४.२ महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती :

महाराष्ट्रामध्ये पुढील ऊर्जा साधन संपत्तीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते.

१. दगडी कोळसा :

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आढळते. राज्यात कोळशाचे अंदाजे साठे ५००० दशलक्ष टन आहेत. भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यांपैकी सुमारे ४१% कोळसा साठा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर (चंद्रपूर जिल्हा) येथे आहेत.

२. जलविद्युत :

कोयना जलविद्युत केंद्रास 'महाराष्ट्राची भाग्यरेषा' असे म्हटले जाते. कोयना जलविद्युत केंद्र हे हेळवाकजवळील 'देशमुखवाडी' येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण विद्युतनिर्मिती क्षमता १९२० मेगावॅट आहे.१.२.५ साधनसंपत्तीचा शाश्वत विकास

मानव आपले जीवन जगत असताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे हे नैसर्गिक बदल म्हणजे हवामान, जमीन, जल वनस्पती व खनिजे यांचा वापर होय. या नैसर्गिक बदलांनाच साधनसंपत्ती असे म्हटले जाते. नैसर्गिक साधनसंपत्ती जसे आहेत, तशाच काही मानव निर्मित साधनसंपत्ती आहेत.. जलविद्युत प्रकल्प, अणुभट्टी, सौर ऊर्जा प्रकल्प इ. मानव निर्मित साधनसंपत्ती आहेत. साधनसंपत्तीला आर्थिक जीवनाचा पाया समजला जातो. आर्थिक व सामाजिक विकास साधनसंपत्तीवरच अवलंबून असेल. त्यामुळे साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे नियोजन करून वापर केला पाहिजे. जर आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर केला तर त्यांचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील, त्यामुळे साधन संपत्तीचा शाश्वत विकास करणे गरजेचे आहे.

साधनसंपत्तीचा डोळसपणे व योग्य धोरणाने उपयोग करणे, यालाच साधनसंपपत्तीचे शाश्वत विकास म्हणतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून त्यांची वाढ व विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी साधनसंपत्तीचे नियोजन व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उपलब्ध साधनसंपत्तीचा वर्तमानकाळात उपभोग घेत असताना भविष्यकाळाचीदेखील काळजी घेतली पाहिजे. वर्तमानकाळातील उपभोगाबरोबरच भविष्यकाळासाठी त्यांचे जतन करून त्या दोहोंचा समतोल साधणे आवश्यक आहे.

पृथ्वीवर उपलब्ध असलेले नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत, त्यांचा वापर ज्या वेगाने होत आहे, तो पाहता पुढील काही दशकात अनेक संसाधने संपुष्टात येऊ शकतात, त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. तसेच प्रदूषण, जैवविविधतेचा -हास, नूतनीक्षम संसाधनांचा उपलब्धतेत घट इत्यादी. परिणाम दिसून येतात. नैसर्गिक संसाधनांचा वापर उचित झाला तरच पर्यावरणाचा समतोल कायम राहिल. ज्या संसाधनाच्या निर्मितीचा वेग अतिशय मंद आहे. तसेच नैसर्गिकरित्या ज्या संसाधनांची निर्मिती होत नाही अशा (उदा. जीवाश्म इंधन) संसाधनांचा वापर जपून योग्य प्रकारे केला पाहिजे. तसेच नैसर्गिकरित्या ज्या संसाधनांची पुननिर्मिती होऊ शकते, जसे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व संसाधने मुबलक प्रमाणात आणि निरंतर उपलब्ध असतात त्यामुळे अशा नैसर्गिक व अपारंपारिक साधनसंपत्तीचा वापर जास्त केल्यास प्रदूषणही निर्माण होत नाही आणि इतर जीवाश्म इंधनामध्येपण बचत होईल.

भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांबरोबरच आज सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, तरंग ऊर्जा, गोबर गॅस इत्यादी अपारंपारिक ऊर्जा स्रोत विकसित केले आहेत. पूर्वी पाणी हे पिण्यासाठी, शेतीला जलवाहतुकीसाठी वापर केला जात होता. आज पाण्यापासून जलविद्युत प्रकल्प निर्माण केले आहेत. भारतात १९०२ साली कर्नाटकातील कावेरी शिवसमुद्रम' हा देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प उभारल्या. तसेच महाराष्ट्रात कोयना नदीवर कोयना धरण बांधण्यात आले. या धरणातील पाण्याचा उपयोग जलसिंचन व जलविद्युतसाठी उपयोग केला जातो. आजअणूचासुद्धा वापर वीज निर्माण करण्यासाठी केला जातो. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. १६० मेगावॅट क्षमतेच्या २ अणुभट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरु झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त अपारंपारिक ऊर्जा संसाधनांचा वापर करून साधनसंपत्तीचा शाश्वत विकास साधता येऊ शकतो. पर्यायाने मानवाचा आर्थिक व सामाजिक विकास आणि निसर्गाचे संवर्धन साधता येईल.

१.३ सारांश

साधनसंपत्तीचा अभ्यास करत असताना साधनसंपत्तीचे दोन भाग निर्माण होतात. ते नैसर्गिक साधनसंपत्ती व मानवी साधनसंपत्ती होय. मानवी जीवनात नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. मानवाच्या गरजा भागविण्यास उपयोगी असलेल्या वस्तूंना साधनसंपत्ती म्हटले जाते. पण नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित प्रमाणात आहे. नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर भौगोलिक घटकांचा प्रभाव पडलेला आहे. राज्यातील बरीचशी खनिज संपत्ती बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात आढळते. महाराष्ट्रात पूर्व भागात सर्वात जास्त खनिज संपत्तीचे केंद्रीकरण झालेले आहे. तसेच महाराष्ट्रात जलविद्युत व पवन ऊर्जाची निर्मिती सर्वांत जास्त सातारा जिल्ह्यामध्ये होते. तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू हे बॉम्बे हाय क्षेत्रात उपलब्ध आहे. भारतातील खनिज तेलाजे ५०% पेक्षा जास्त उत्पादन बॉम्बे हाय तेल क्षेत्रामधून मिळते. अशा महाराष्ट्रात नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण झालेले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे साठे मर्यादित असल्याने त्यांचा गरजेपुरताच व काळजीपूर्वक वापर करून साधनसंपत्तीचा शाश्वत विकास करणे ही काळाची गरज आहे.

१.४ पारिभाषिक शब्द, शब्दार्थ

१. साधसंपत्ती अशी कोणतीही वस्तू जी मानवी जीवनात उपयोगात येते.

२. पवन ऊर्जा वान्यापासून निर्माण केलेली ऊर्जा.

३. पर्यावरण मानवी सभोवताली असणारे घटक. :

४. जलविद्युत पाण्यापासून निर्माण केलेली ऊर्जा,

५. कौशल्य कमीतकमी श्रमात कार्य करणे. :

७. वर्णनात्मक सोप्या शब्दात मांडणी करणे. :

८. परिवर्तनशील वेळेनुसार बदलत जाणे.


उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 121725
1
जपाणी पुष्प रचनेतील सर्वात उंच फादी होय??

उत्तर लिहिले · 3/2/2022
कर्म · 25
0
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वैशिष्ट्य सपष्ट करा
उत्तर लिहिले · 11/6/2022
कर्म · -10

Related Questions

3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्या कोणत्या आहे?
नैसर्गिक संसाधने कोणती आहेत त्यांची चित्रे कशी काढाल?
नैसर्गिक प्रदेशात सर्वात जास्त विविधता कोणत्या खंडात आहे?
भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळे कोणती आहेत?
नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार तीव्र मानसिक आजाराचे थोडक्यात विवेचन कसे कराल?
नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रकार सांगून नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती आहेत?
नैसर्गिक विज्ञान, सामाजिक विज्ञानाने व मानव विज्ञान यांचा भेद कोणता?