दिनविशेष दिनदर्शिका

जानेवारी महिन्यात लेक शिकवा दिन सर्वत्र साजरा कसा करावा?

2 उत्तरे
2 answers

जानेवारी महिन्यात लेक शिकवा दिन सर्वत्र साजरा कसा करावा?

2
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येत आहे. ...


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक शिकवा” 
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबतची माहिती देणारा लेख…

“विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापासी, आहे तो खरा धनवान” अशा शब्दात शिक्षणाचे महत्व सांगून स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अज्ञान, अनिष्ट रुढी व परंपरांच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रियांकडे तुच्छ म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची वक्रदृष्टी स्वीकारुन स्त्रियांना चूल आणि मूल यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला.

सावित्रीबाई यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान” राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अभियान 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद करण्याची जबाबदारी राज्य शासनास सोपविली आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थतीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी होणे यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फले लेक शिकवा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात येत आहे.

उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121765
0

जानेवारी महिन्यात लेक शिकवा दिन (Lek Shikva Din) सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यासाठी खालील गोष्टी करता येतील:

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम:
  • भाषणे आणि चर्चासत्रे: मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व यावर तज्ञांची भाषणे आयोजित करा.
  • निबंध आणि कला स्पर्धा: मुलींच्या शिक्षणावरील निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करा.
  • सांस्कृतिक कार्यक्रम: नाटके, गाणी, नृत्य यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा, ज्यात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व दर्शवले जाईल.
जागरूकता मोहीम:
  • प्रभातफेरी: गावात किंवा शहरात प्रभातफेरी काढून 'लेक शिकवा, देश वाचवा' असे नारे द्या.
  • पथनाट्ये: गावांमध्ये पथनाट्ये आयोजित करा, ज्यात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात असलेला मुलींविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन यावर प्रकाश टाका.
  • घोषणा: " मुलगी शिकली, प्रगती झाली " अशा घोषणा तयार करा.
कार्यशाळा आणि प्रशिक्षण:
  • शिक्षकांसाठी कार्यशाळा: मुलींना अधिक प्रभावीपणे कसे शिकवावे यासाठी शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करा.
  • पालकांसाठी मार्गदर्शन: मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून सांगा आणि त्यांना प्रोत्साहित करा.
सरकारी योजनांचा प्रचार:
  • योजनांची माहिती: मुलींसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती लोकांना द्या. उदा. सुकन्या समृद्धी योजना ( https://www.paisabazaar.com/saving-schemes/sukanya-samriddhi-yojana/ ).
  • अर्ज प्रक्रिया: योजनांसाठी अर्ज कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करा.
सामुदायिक कार्यक्रम:
  • ग्रामसभा: ग्रामसभेत मुलींच्या शिक्षणावर चर्चा करा आणि ठराव घ्या.
  • पुरस्कार: शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करा.

या उपायांमुळे 'लेक शिकवा' हा संदेश समाजात पोहोचेल आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 740

Related Questions

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा पहिला महिना कोणता येतो?
आयन दिन म्हणजे काय?
जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो?
लोकसंख्या दिन केव्हा असतो?
या वर्षी प्रगट दिन किती तारखेला आहे?
महाराष्ट्र स्थापना दिनाबरोबर आणखी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस असतो?
हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो?