ज्योतिष
आपला सर्वात मोठा शत्रू कोणता ज्यामुळे आपण ईश्वरापासुन खुप दुरावतो?
1 उत्तर
1
answers
आपला सर्वात मोठा शत्रू कोणता ज्यामुळे आपण ईश्वरापासुन खुप दुरावतो?
2
Answer link
मी ( गर्व ) हा शब्द आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्यामुळे आपल्याला आपल्या एखाद्या यशस्वी कामावर, मोठ्या खरेदीवर गर्व होतो व स्वतःचा मी जागा होतो आणि ईश्वराला नमस्कार करायला ही विसरतो व नकळत त्याच्यापासून दूर जातो,
माणसाला स्वतःचा गर्व खाली आणतो हे कळतं असून ही माणूस त्याचं चुका वारंवार करतो, आणि गर्वाचे घर खाली हा प्रत्यय येतो, म्हणून माणसाने इतकं ही मोठं होऊ नये की गरीबाला तुच्छ समजून त्याच्या दा्रीद्र्याची लक्तरे उघड्यावर फाडू नये किंवा कुणाचे संसार उघड्यावर काढू नये, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नशीबाने मिळते फरक इतकाच की कुणाला आज आत्ता तर कुणाला थोड्या काळाने, मगज्याला आज मिळतं आहे त्याने गर्व करू नये आणि स्वतःला फार बुद्धी वान ताकतवान, हुशार समजून त्या ईश्वर सेवेला विसरू नये कारण मनुष्य निर्मिती करण्याचं मोठं कामं मानवावर सोपवून बुद्धी मात्र स्वतः देतो तो फक्त ईश्वर असतो त्यास कदापि विसरू नये व त्याचे असतीत्व नाकारू नये,
जन्म माणसाच्या हातात तर शेवट त्याच्या मर्जीने होतो तरी लोक त्याला मानण्यास नकार देतात त्यास देव असे म्हणतात आणि हे पटतं असूनही लोक त्या ईश्वराला दूर कोठे तरी सोडतात म्हणजे दुर्लक्षित करतात, निववळ पैसा हमपणा नुसता लोणच्या सारखा मुरतं ठेवल्याने हा प्रकार घडतो ,
तेव्हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू स्व निर्मित गर्व आहे आणि तो माणसाच्या डोक्यात रहातो व मनाची दरवाजे बंद झालेली असते त्यामुळे ती जेव्हा उघडतात तेव्हा सर्व जीवन पूर्णपणे गाडी च्या चाका सारखे खाली जमिनीवर बसलेले असते 🙏🏼