2 उत्तरे
2
answers
ज्योतिष शास्त्र किती खरे आहे, त्यावर किती श्रद्धा ठेवणे योग्य आहे?
3
Answer link
जोतीष शास्त्र हे देखील एक शास्त्र आहे, व हा तुमच्या श्रद्धेचा एक भाग आहे.
जसे एक उदाहरण:
आपण गाडी चालवतांना रस्त्यावर बोर्ड लावले असतात, "सावधान अपघाती वळण वाहने सावकाश चालवा" तेव्हा प्रत्येकाचा अपघात होतो असे नाही ना पण कोणाचाच होणार नाही असे पण नाही. तसेच जोतीष शास्त्राच आहे. एखाद्याचे भविष्य खरे होते एखाद्याचे नाही पण तुमचे खरे होणार नाही हे ही नाही व खरे होईल असेही नाही. तेव्हा श्रद्धा महत्त्वाची. नमस्कार!
जसे एक उदाहरण:
आपण गाडी चालवतांना रस्त्यावर बोर्ड लावले असतात, "सावधान अपघाती वळण वाहने सावकाश चालवा" तेव्हा प्रत्येकाचा अपघात होतो असे नाही ना पण कोणाचाच होणार नाही असे पण नाही. तसेच जोतीष शास्त्राच आहे. एखाद्याचे भविष्य खरे होते एखाद्याचे नाही पण तुमचे खरे होणार नाही हे ही नाही व खरे होईल असेही नाही. तेव्हा श्रद्धा महत्त्वाची. नमस्कार!
2
Answer link
मी दहा वर्षा पूर्वी एक ज्योतिषी होतो आणि नंतर त्याचा टीकाकार झालो. हा बदल एकाच गोष्टीने झाला - ते म्हणजे मी केलेले संशोधन आणि ज्योतिष विद्येचे Empirical Testing. जस जसा मी प्रयोग करत गेलो तसंतसे माझ्या लक्षात आले कि हे सर्व नियम वगैरे खूप inconsistent आहेत. मग मी या साठी माझी पुढील दहा वर्षे दिली आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने प्रयोग केले.
याचा सर्व तपशील YouTube च्या माझ्या या video वर
किंवा AstrologyYesOrNo च्या मराठी website वर दिला आहे, पण थोडक्यात सांगतो.
सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद लोकांच्या आणि ३३८ पत्रिका हुशार (Intelligent ) व्यक्तींच्या. या दोन्ही संचाना, ज्योतिष शास्त्रात मतिमंदत्व असण्यासाठी सांगितलेले नियम लावले आणि ते किती लागू पडतात याची तुलना केली. ज्योतिष शास्त्र आणि ते नियम खरे असेल तर मतिमंद संचाला ते नियम जास्तीत जास्त लागू पडतील आणि Intelligent संचाला अगदी कमी , बरोबर? बघा समजायला इतका सोपा असा हा प्रयोग आहे. यालाच एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात.
सगळे मिळून आम्ही ज्योतिष शास्त्राची 22 most fundamental अशी तत्वे तपासली (नीच ग्रहाची शनी मंगळाशी युती / प्रतियोग, ग्रह क्रूर नक्षत्रात, स्थानात पापग्रह वगैरे), पण empirical टेस्टिंग नुसार ती सर्व तत्वे अवैध आढळून आली. वेगवेगळे १३६ मापदंड तपासले. आम्हाला दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून हजारो वर्षांची विद्या खोटी कशी ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच निष्कर्ष मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक, असे अनेक प्रयोग केले. पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच निष्कर्ष मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.
जी प्रमुख तत्त्वे अवैध (invalid) म्हणून ठरली ती वापरूनच तर तुमच्या आमच्या पत्रिका बघितल्या जातात. ती वापरूनच तर तुमचे आमचे लग्नाचे, करिअर चे निर्णय सांगितले जातात, आणि साडेसाती विषयी पण सांगितले जाते. आता तुम्हीच ठरवा ज्योतिषाच्या मागे किती जायचे ते.