ज्योतिष
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
उत्तर या प्लॅटफॉर्म चा सर्वात जास्त उपयोग कशासाठी होत असेल तर दुसऱ्याचे अनुभव जाणून तुम्ही स्वतः साठी काही निर्णय घेऊ शकता. खासकरून ज्यात वेळेची किंवा पैशाची मोठी गुंतवणूक करायची आहे तिथे दुसर्यांचा अनुभव मोठी बचत करू शकतो. तुम्ही किंवा ज्योतिष शिकू इच्छिणारे इतर अनेक जण वेळेची मोठी गुंतवणूक करणार आहात म्हणून माझा अनुभव सांगतो.
माझ्या profile वर गेलात तर माझी ओळख दिलेलीच आहे कि एकेकाळी मी पण ज्योतिष होतो पण आता ज्योतिषाचा संशोधक आणि टीकाकार. हा जो माझ्यामधील ज्योतिषाचा ज्योतिष टीकाकार झाला त्याचे कारण म्हणजे मी स्वतः केलेले ज्योतिषाचे परीक्षण (इम्पिरिकेल टेस्टिंग). जेव्हा ज्योतिषी होतो तेव्हा ज्योतिषाच्या बाजूने वाद घालताना जाणवायचे कि ज्याला आपण दूध का दूध पानि का पानि म्हणतो अशा प्रकारचे ज्योतिषाचे प्रूफ कुठेच नाहीये म्हणून मी स्वतः तसे तयार करायचे ठरवले आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने इम्पिरिकल टेस्टिंग चे प्रयोग करायला सुरुवात केली. उदाहणार्थ मतिमंद विरुद्ध हुशार अशा एकमेकांच्या एकदम विरुद्ध गुणधर्माच्या लोकांच्या पत्रिका घेऊन त्याची बुद्धीचे अशुभ फळ देणाऱ्या ज्योतिषी नियमांच्या लागू पडण्याची तुलना केली. त्यांच्या अनेक प्रमुख नियमांना टेस्ट केले. असेच अनेक प्रयोग केले पण सगळ्यांचे अनुमान ज्योतिषी नियम, त्यांची तत्वे , ती विद्या सिद्ध न होण्यामध्ये झाले.
तुम्ही ज्योतिष शिकल्या नंतर प्रॅक्टिस तर करूच शकता, तुम्हाला कोणी भविष्य खरे ठरले नाही तर जाब विचारणार नाही पण जेव्हा आपल्या सांगण्यावरून लोक निर्णय घेणार असतात तेव्हा मी तरी त्या विद्येची २०० % खात्री असल्या शिवाय त्यांना काही न सांगणे हे योग्य समजतो. जेव्हा ज्योतिषी होतो तेव्हा स्वतः प्रयोग न केल्याने अशी खात्री नव्हती आणि त्यामुळे एका प्रकारची guilty feeling यायला लागली आणि म्हणून भविष्य सांगणे थांबवून स्वतः संशोधन करायचे ठरवले. माझ्या ओळखीत माझ्यासारखे असे guilty वाटून ज्योतिष सांगण्याचे थांबवणारे अनेक आहेत (काही इथे पण आहेत). तेव्हा नीट विचार करा. ज्योतिषवाले काहीही म्हणतील पण आजतागायत शास्त्रोक्त प्रयोगाद्वारे निःसंदेह असे ज्योतिष कधीच सिद्ध झालेले नाही हि वस्तुस्थिती आहे. त्याउलट आम्ही केलेल्या प्रयोगाद्वारे आणि जगभर झालेल्या हजारो प्रयोगात ते कायमच invalid ठरले आहे हे ही लक्षात घ्या.
मी तरी माझ्या वेळेची गुंतवणूक अशाच विद्येत करेन जी सिद्ध झालेली आहे आणि वारंवार सिध्द होऊ शकते आणि ज्यामुळे कुणाचे कधीच नुकसान होणार नाही. ज्योतिष शास्त्र आहे का नाही ? या विडिओ मध्ये मी माझ्या १० वर्षाच्या संशोधनाचे सार दिलेले आहे. ज्योतिष शिकण्या अगोदर एकदा खाली लिंक मध्ये दिलेला Youtube विडिओ जरूर बघा आणि किंवा माझ्या website ला भेट द्या. मग पुढचे सारे तुमचे तुम्हीच ठरवा.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही