वैज्ञानिक तत्वज्ञान
पत्रकारिता
बाल वैज्ञानिक परीक्षेत तुमच्या मित्र / मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.?
1 उत्तर
1
answers
बाल वैज्ञानिक परीक्षेत तुमच्या मित्र / मैत्रिणीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा.?
1
Answer link
प्रशांत पाटील,
मु – रायपूर, ता – गंगापूर,
जि – अहमदनगर,
दिनांक – 05.10.2022
प्रिय अनिल,
सप्रेम नमस्कार.
आज सकाळी चोपडे गुरुजी भेटले. त्यांनी तू बाल वैज्ञानिक परीक्षेत तुझा प्रथम क्रमांक आल्याची बातमी सांगितली आणि हे ऐकून आनंदाला पारावार राहिला नाही. त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.
मला माहित आहे की, याअगोदर ही तू आंतरशालेय बाल विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होतास. तेव्हा पासून तुझ्या यशाची कमान चढत गेली. तुला तुझ्या आई – बाबांनी व विज्ञानाच्या जाधव सरांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.
असाच यापुढेही तू यशस्वी हो. मला खात्री आहे की तू भविष्यात नक्की एक खूप यशस्वी होशील. तुझ्या यशाबद्दल तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन.
तुझा प्रिय मित्र
प्रशांत