1 उत्तर
1
answers
मतदान कार्ड(मतदार ओळखपत्र)आधार कार्ड शी लिंक कसे करावे?
5
Answer link
🎯 *मतदान कार्ड - आधारला लिंक होणार ! - केंद्र सरकारचे नवे विधेयक मंजूर*
--------------------
🧐 बोगस मतदान आणि मतदार यादीत डबल नाव येणे रोखण्यासाठी मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठीचे विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे
📃 तसेच यामुळे लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत - याचबरोबर मतदार यादीही आधारशी लिंक करण्यात येणार आहे
📲 मात्र या निर्णयामुळे अनेकांना Voter ID Card आधार कार्डशी लिंक कसे करायचे हे माहिती नाही, तर ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ
💁♂️ *असे करता येईल लिंक*
● सर्वप्रथमhttps://voterportal.eci.gov.in/ अथवा voterportal.eci.gov.in/ ही लिंक ओपन करा, त्यांनतर आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा व्होटर आयडी कार्ड नंबर टाका - नंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा
● यांनतर आपले नाव, पत्ता, वडिलांचे नाव, राज्य, जिल्हा ही माहिती भरा , सर्च बटनवर क्लिक करा - त्यांनतर Feed Aadhaar No या ऑप्शनवर क्लिक करा
● आता एक पॉप-अप पेज समोर येईल तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाका - नंतर Submit बटनवर क्लिक करा
● त्यानंतर अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज आपल्याला येईल
👉 *SMS द्वारे* - मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी < व्होटर आयडी कार्ड नंबर >< आधार कार्ड नंबर > या फॉर्मेटमध्ये 166 किंवा 51969 या नंबरवर SMS करून देखील आधार लिंक करता येईल
😇 *लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक* - प्रत्येक नागरीकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा