समुद्र
बाल्टिक या समुद्राची क्षारता कमी आढळते?
2 उत्तरे
2
answers
बाल्टिक या समुद्राची क्षारता कमी आढळते?
1
Answer link
नद्या आणि पाऊस यांमुळे या समुद्राला जितके पाणी मिळते, त्यापेक्षा कमी पाण्याची वाफ होते. भरपूर पाणीपुरवठा व मर्यादित बाष्पीभवन यांमुळे सामान्यपणे तेथील पाण्याची क्षारता कमी आहे. पश्चिम बाल्टिकमध्ये क्षारता सर्वांत जास्त (जलपृष्ठावर १०%० व तळाशी १५%०) असून बॉथनिया आखाताच्या शिरोभागी ती बरीच कमी (५%०) झालेली आढळते.
बाल्टिक समुद्र हा भूवेष्टित समुद्र आहे.
तसे पहिले तर भूवेष्टित समुद्राची क्षारता खुल्या सागरजलाच्या तुलनेत जास्त असते, कारण अशा ठिकाणी पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो आणि गोड्या पाण्याचा पुरवठा खुल्या सागरांच्या तुलनेत कमी असतो.
परंतु बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आहे
कारण
१) हा प्रदेश विषुववृत्तापासून दूर असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी आहे.
२) तसेच बाल्टिक समुद्राला मोठ्या प्रमाणावर नद्यांमार्फत गोड्या पाण्याचा पुरवठा केला जातो.