अध्यात्म
शिवलिंगाचा खरा अर्थ काय आहे?
2 उत्तरे
2
answers
शिवलिंगाचा खरा अर्थ काय आहे?
3
Answer link
शिवलिंग किंवा महादेवाची पिंड म्हणजे 'पुरुष आणि स्त्री जननेंद्रियांचे प्रतीक' अशी फारच चुकीची धारणा स्वतः हिंदूंमध्येच अस्तित्वात आहे.
'लिंग' ह्या शब्दाचा मूळ संस्कृत अर्थ 'चिन्ह' किंवा 'संकेत' किंवा 'प्रतीक' होय. पुरुषाच्या जननेंद्रियासाठी ह्या शब्दाचा वापर नंतरचा आहे.
शिव महापुराणात लिंगोद्भवाची, म्हणजेच शिवलिंगाच्या उत्पत्तीची आख्यायिका आहे ती अशी:
एकदा ब्रह्मदेव आणि विष्णूदेव ह्यांच्यात आपापले थोरपण सिद्ध करण्यासाठी वाद झाला. काही केल्या वाद शांत होत नसल्याचे पाहून सर्व देवतांनी मिळून महादेवाकडे प्रार्थना केली. तेव्हा महादेव एका प्रचंड मोठ्या अग्निस्तंभरूपात (ज्वाळेच्या रूपात) दोघांसमोर प्रगट झाले. जो ह्या ज्वाळेचे शीर्ष किंवा मूळ शोधेल तोच थोर असे दोन्ही देवांनी परस्पर ठरवले. ब्रह्मदेवाने त्वरित हंसरूप होऊन आकाशाकडे झेप घेतली तर विष्णूदेवाने वराहरूप होऊन पाताळात. बराच काळ लोटला पण दोघांनाही यश नाही आले. शेवटी विष्णूदेवाने पराभव स्वीकारला, पण ब्रह्मदेवाने खोटे बोलून मला शीर्ष सापडले आहे असे सांगितले. तेव्हा महादेवाने ब्रह्मदेवास पृथ्वीवर कोठेही न पुजले जाण्याचा शाप दिला.
ह्याच संकल्पनेतून ज्योतिर्लिंग हा शब्द आला. आणि महादेवाची पिंड म्हणजे त्याच प्रचंड, आदि-अंतविरहित परमेश्वराचे प्रतीक होय.

लिंगोद्भवाचे शिल्प, १०वे शतक (ऐरावतेश्वर देवालय, धारासुरम, तामिळनाडू)

छायाचित्र : Lingodbhava Shiva | Cultural Samvaad

छायाचित्र : Pinterest
***
धन्यवाद
0
Answer link
शिवलिंगाचा खरा अर्थ
शिवलिंग हा हिंदू धर्मातील एक पवित्र प्रतीक आहे. हे भगवान शिव आणि शक्ती (देवी पार्वती) यांच्या एकत्रित रूपाचे प्रतिनिधित्व करते.
शिवलिंगाचे दोन भाग असतात:
- पिंड: हा खालचा भाग आहे, जो देवी शक्तीचे प्रतीक आहे.
- लिंग: हा वरचा भाग आहे, जो भगवान शिवाचे प्रतीक आहे.
शिवलिंग हे निर्मिती आणि विनाशाचे प्रतीक आहे. हे दर्शवते की भगवान शिव हे जगाचे निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि विनाशक आहेत.
शिवलिंगाचे विविध अर्थ:
- अध्यात्मिक अर्थ: शिवलिंग हे मानवी आत्मा आणि ब्रह्म यांचे मिलन दर्शवते.
- वैज्ञानिक अर्थ: शिवलिंग हे ऊर्जा आणि पदार्थाचे प्रतीक आहे.
- सामाजिक अर्थ: शिवलिंग हे पुरुष आणि स्त्री यांच्यातील समानतेचे प्रतीक आहे.
शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे भगवान शिव आणि शक्ती दोघांचीही पूजा करणे होय.
टीप:
या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, विविध स्त्रोतांचा वापर केला गेला आहे.