म्हणी
जे पेराल तेच उगवेल! ही म्हण खरोखरच लागू होते का?
1 उत्तर
1
answers
जे पेराल तेच उगवेल! ही म्हण खरोखरच लागू होते का?
2
Answer link
स्वतःच्या व्यथित मनाची भाबडी समजूत काढण्यासाठी किंवा लहान मुलांवर पारंपारिक संस्कार करण्याखेरीज व्यावहारिक जगात याचा काही उपयोग आहे असे मला तरी वाटत नाही.
आज वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि भकास चेहऱ्यांनी तिथे फिरणारे वृद्ध बघितले तर प्रेम आणि वात्सल्य पेरले तर प्रेम आणि वात्सल्यच उगवते यावर माझा तरी विश्वास नाही … काय तिथे आणून सोडलेल्या सर्व वृद्ध लोकांनी त्यांच्या मुलाला अनाथाश्रमात वाढवलेले असते का?
वडिलांच्या पश्चात एखादा मोठा भाऊ त्याग करून आपल्या लहान भावाला मोठा करतो … स्वतः शिकत नाही पण लहान भावाला शिक्षण देऊन मोठा करतो आणि तोच लहान भाऊ स्वतः स्थिरस्थावर झाल्यावर त्याला कमी शिकलेल्या मोठ्या भावाची लाज वाटायला लागते आणि मोठ्या भावाला घराबाहेर काढतो किंवा त्याची बाहेर (वेगळी) सोय करतो … या घटना अगदीच दुर्मिळ नाहीत.
देशाच्या बाबतीत ही हेच लागू होते … या जगातील सर्वात मोठा आतंकवादी देश म्हणजे अमेरिका. आंतरराष्ट्रीय राजकारणावर थोडेफार जरी वाचन असेल तरीही अमेरिकेने अनेक देशांवर विनाकारण युद्ध लादून त्यांची राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घडी विसकटून टाकली आहे … निदान आज पर्यत तरी अमेरिकेचे फारसे कोणी वाकडे करू शकलेले नाही. आज जगाला जे अमेरिकेबाबत प्रेम वाटते ते केवळ तेथील पैसा बघून. ९/११ च्या घटनेत अमेरिकेचे जेमतेम नख तुटले असेल पण अफगाणिस्तानचे काय झाले?
आता जे आज पेरले तर जर युगांत समीप आल्यावर उगवणार असेल तर ते कोणी पाहिलं आहे? पण मनाची समजूत म्हणून ठीक आहे.