स्त्री
एक स्त्री पुरुषाला घडवू शकते आणि बिघडवू पण शकते हे सत्य आहे का?
3 उत्तरे
3
answers
एक स्त्री पुरुषाला घडवू शकते आणि बिघडवू पण शकते हे सत्य आहे का?
3
Answer link
एक स्त्री पुरुषाला घडवू शकते आणि बिघडवू पण शकते हे सत्य आहे स्त्री हि शक्ती आहे
आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे; परंतु, स्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर या स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे.
आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी व मैत्रिण अशा निरनिराळ्या रूपात आपण स्त्रीला ओळखतो खरे; परंतु, स्रीचे रूप एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर या स्त्रीत्वाची व्याख्या याहीपेक्षा अधिक मोठी आहे. परंतु, पुरुषप्रदान संस्कृतीच्या प्रभावामुळे ती कदाचित आपल्यापैकी अनेक पुरुष आणि खुद्द स्त्रीयांनाही माहिती नसण्याची शक्यता आहे. तिच्या रूपाचा ठाव लावणे खरेच इतके सोपे नाही. अशा स्त्रीत्वाबाबत आज मी आपल्याशी बोलणार आहे. हे केवळ भावना प्रकट करणे नसून या माध्यमातून आपल्या पुरुषप्रधान समाजाला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. या मध्ये मला माझ्या मैत्रिणींचीही साथ मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण माझ्या भावना व माझ्या प्रश्नांशी त्या नक्कीच सहमत असतील असा विश्वास मला वाटतो.
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठे कुणाची सत्ता आणि कुणाला किती जागा?, जाणून घ्या एका क्लिकवर
या समाजात, अशा खूप मुली व स्त्रिया असतील ज्यांच्या मनात हाच प्रश्न आला असेल की, स्त्री म्हणजे नेमके काय? तिचे अस्तित्व काय? ती जन्मदात्री, आई, बहीण, मुलगी, सखी बस इतकीच मर्यादित आहे का, तर मुळीच नाही! तर त्याहीपेक्षा अधिक तिची महती आहे. त्यामुळेच तर ‘स्त्री हे खरं अस्तित्व जगाच्या आरशाचे,’ अशी उपमा अनेक कवी व लेखक तिला देतात, ते तिची त्याग व समर्पणाची भावना जाणतात. पण, आजही स्त्रिला अबला नारि समजले जाते, अशक्त व गौण मानले जाते, त्यांचा वापर करू पाहतात, याच समाजात आई जगदंबेला आदि माया, शक्ती देवी म्हणून पूज ले जाते आणि दुसरीकडे त्याच देवीचे रूप असलेल्या स्त्रीला मात्र, भोग्यवस्तू व फक्त वापरण्याची वस्तू म्हणून समजले जाते. आपल्याला अशा प्रवृत्तींना हे पटवून द्यायचे आहे की स्त्री, ही जर प्रेम आणि मायेपोटी सर्वस्व त्यागू शकते तर स्वतःच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी ती दुर्गेचा अवतारही धारण करू शकते. त्यामुळे आपल्याला या समाजातील लोकांची स्त्रीबद्दलची मते बदलण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्त्रीचा आदर सन्मान करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे. स्त्री ही कायम कर्तव्याचं ओझं घेऊनच जगत आली आहे. मग हीच कर्तव्य पुरुषानेही पार पाडावीत. स्त्री ही भावनेत वाहून अत्याचार सहन करणारी अबला नारी नसून, पुरुषांना जीवनात लढा देत पुढे कसे जायचे हे शिकविणारी जीवनदर्शिका आहे. तिच प्रत्येक परिस्थितीत पुरुषांची साथ देते, त्याग करते, मग तीच्या या त्यागाचा सन्मान करण्याऐवजी तिचा अनादर का होतो? ती जननी जगाचा आधारस्तंभ आहे. मग त्या स्तंभालाच पाडण्याचा प्रयत्न का केला जातो?
एक दिवस असा यायला नको की या समाजात स्त्रीचं अस्तित्वच नाहीसं होण्यास सुरुवात होईल आणि मग या पुरुषप्रधान समाजाच्या हाती केवळ पश्चाताप उरेल.
जर पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर ''एक पाऊल, पुढे टाकावेच लागेल. लोकांच्या मनातले स्त्री बद्दलचे गैरसमज खोडून काढावेच लागतील. यासाठी कुणी एकीने नव्हे तर प्रत्येक स्त्रीला लढा द्यावा लागेल. कुणावरही अन्याय करणं पाप आहे तर अन्याय सहन करणं हे तेवढेच मोठे पाप आहे. म्हणून बोला आणि पुढे या आणि स्त्रीला समाजात जे तिचे स्थान आहे ते मिळवून द्या. आपण स्त्री आहोत याचा आपल्या माता-भगिनींना अभिमान हवा. एकदा पाऊल उचलले की ते थांबायला नको. तेव्हाच समाजाला स्त्री या शब्दाची महानता पटेल.
स्त्री ही समाजाचा पाया आहे. पायदळी तुडवली जाणारी वस्तू नाही. झाशीची राणीही एक स्त्रीच ना, परंतु, तिने गाजवलेले शौर्य पुरुषांपेक्षा कमी नाही. इतिहासातील तिचे कार्य स्त्री जातीसाठी नवीन दिशा व प्रेरणा आहे.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹