स्त्री
महर्षी कर्वे यांचे स्त्री बाबत काय मत होते?
1 उत्तर
1
answers
महर्षी कर्वे यांचे स्त्री बाबत काय मत होते?
1
Answer link
महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार :
(१) स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
(२) आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले
पाहिजे.
(३) स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे.
(४) शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.