कॉलेज अनुभव
फर्ग्युसन कॉलेजची पुर्ण माहिती मिळेल का.?
1 उत्तर
1
answers
फर्ग्युसन कॉलेजची पुर्ण माहिती मिळेल का.?
4
Answer link
फर्ग्युसन कॉलेजची स्थापना १८८४ साली पुण्यात झाली.
वामन शिवराम आपटे, बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी या काँलेजची स्थापना केली आहे.
महाविद्यालयाला मुंबईचे तत्कालीन राज्यपाल सर जेम्स फर्ग्युसन यांचे नाव देण्यात आले. त्यांचे धोरण खासगी शिक्षणाप्रती सहानुभूतीचे होते.
. महाविद्यालयाचे उद्घाटन दोन जानेवारी १८८५ रोजी झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य विल्ल्यम वर्ड्सवर्थ यांच्या हस्ते ते करण्यात आले.
हे वर्ड्सवर्थ सुप्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ यांचे पणतू होते. खुद्द फर्ग्युसन यांनीच त्यांचे नाव सुचवले होते.
वामन शिवराम आपटे महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. ते डीईएसचे पहिले सचिव आणि न्यू इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापकही होते.
समाजसुधारक, पत्रकार, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर दुसरे प्राचार्य झाले. ऑगस्ट १८९२ पासून जून १८९५ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.
पाली भाषेतील अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे फर्ग्युसन हे पहिले महाविद्यालय ठरले
. विद्वान धर्मानंद कोसंबी हा अभ्यासक्रम शिकवत असत.
जर्मन ही द्वितीय भाषा म्हणून शिकविणारेही हे पहिले महाविद्यालय ठरले.
सुधारक महर्षी कर्वे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या थोर लोकांनी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवण्याचे काम केले.
हे दोघे गणित शिकवत; तर गोखले यांनी काही काळासाठी इंग्रजी, इतिहास आणि अर्थशास्त्रही शिकवले. त्यांनी महाविद्यालयात जवळपास २० वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यांनी १९०२ मध्ये निवृती घेतली.