1 उत्तर
1
answers
नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका म्हणजे काय? या तिन्हीमध्ये नेमका काय फरक आहे?
2
Answer link
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, छावनीपरिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्था दोन भागात विभागले गेले आहेत.
ग्रामीण भाग
१. जिल्हा परिषद,
कोणत्याही जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कार्यभार जिल्हा परिषद सांभाळत असते. जिल्हा परिषद जिल्ह्यातील मुख्य स्थानिक स्वराज्य संस्था असते.
२. पंचायत समिती,
पंचायत समिती ही तालुका स्तरावर ग्रामीण भागातील कार्यभार सांभाळत असते.
३. ग्रामपंचायत
गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत असते.
शहरी भाग
१. महानगरपालिका
मोठ्या शहरातील स्थानिक कारभार महानगरपालिका पाहत असतात. महाराष्ट्र राज्यात आता २७ शहरात महानगरपालिका अस्तित्वात आहेत.
२. नगरपालिका
मध्यम आकाराच्या शहरी भागात नगरपालिकेच्या माध्यमातून कामकाज सुरू असते.
३. नगरपरिषद
छोट्या शहरातील कारभार हा नगरपरिषद पाहत असते.
४. छावनीपरिषद
छावनीपरिषद हे सैनिकी वास्तव्य असलेल्या प्रदेशाचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी असतात.