1 उत्तर
1
answers
मुक्तिवेग म्हणजे काय?
2
Answer link
एखाद्या वस्तूला आपल्या ( म्हणजे ज्या ग्रहावर ती वस्तू आहे त्या ) ग्रहाच्या गुरूत्विय क्षेत्राच्या बाहेर पडण्यासाठी लागणारा वेग म्हणजेच मुक्तिवेग. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की मुक्तिवेग वस्तुच्या आणि ग्रहाच्या या दोघांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो.
जर वस्तूने ग्रहावरून वेग घेऊन बहेर पडण्याचा प्रयत्न केला पण वेग मुक्तिवेगापेक्षा थोडा कमी असेल तर ती वस्तू ( लगेच ) परत ग्रहावर न आदळता कक्षेत फिरत राहाते. या तत्वाचा वापर उपग्रह प्रक्षेपणासाठी केला जातो. अर्थात उपग्रह कक्षेत स्थिर ठेवण्या साठी प्रचंड आकडेमोड करावी लागते.