2 उत्तरे
2
answers
गावाकडे करता येण्यासारखे व्यवसाय कोणते?
5
Answer link
गावात करता येईल असे व्यवसाय कोणते ? हा तुमचा प्रश्न. बघा. व्यवसाय सुरू करण्याअगोदर market चा अभ्यास आपल्याला करावा लागतो. गावातील लोकसंख्या तसेच गावाच्या आजूबाजूला असणारी गावे यांची माहिती. Market ला कशाची गरज आहे. असा व्यवसाय निवडावा ज्याची गरज Market ला असून तुमच्या स्पर्धेत उभा राहणारा एकही व्यवसाय नाही. Market ला तुमची गरज राहणार असा व्यवसाय तुम्ही निवडावा. भरपूर व्यवसाय आहेत. असे नाही फक्त गावातल्या होईल असे व्यवसाय न करता तुम्ही दळणवळण करून आपला व्यवसाय इतर गावांत तसेच जिल्हांत पोहचवू शकता. कच्च्या मालापासून एखादी नवीन वस्तू तयार करणे हा व्यवसाय नाही तर काय आहे. या व्यवसायांच निर्यात गावातचं नाही तर इतर जिल्ह्यांत तुम्ही करू शकता. व्यवसाय निवडण्यासाठी तुम्ही category नुसार व्यवसाय निवडा.
उदा. Construction संबंधित व्यवसाय: paver block, विट, hardware मध्ये असणारे अवजारे यांची factory, interior of furniture.
Agriculture संबंधित व्यवसाय: दुध डेअरी, कृषी दुकान, खत, पशुपालन, कुक्कुटपालन व्यवसाय. इत्यादी
तसेच, चक्की संयंत्र दुकान, तेलाची घान, होटेल,
होटेल मध्ये मटन भाकरी, तसेच इडली ढोकळा डोसा पनीर टिक्का मसाला भात अशा वस्तू तुम्ही विकत असाल तर लोकांची मांग जास्त वाढणार, Online Form cyber cafe, इत्यादी.
जोपर्यंत तुम्ही Market ला समजाऊन घेत नाही तोपर्यंत तुम्ही तर्क लावू शकणार नाही.