प्रजाती
आर्य आणि द्रविड प्रजातीची माहिती लिहा?
1 उत्तर
1
answers
आर्य आणि द्रविड प्रजातीची माहिती लिहा?
2
Answer link
आर्य (Arya) ही संज्ञा सप्तसिंधु किंवा सप्तमुखी सिंधू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागात राहणाऱ्या ऋग्वेदकालीन अतिप्राचीन लोकांसाठी वापरली जाते. आर्यांनी वैदिक संस्कृती विकसीत केली होती. सप्तसिंधु हा सात महान नद्यांचा प्रदेश होता. यामध्ये लुप्त झालेली सरस्वती नदी तसेच सतलज (शतुद्री), बियास (विपाशा), रावी (परुष्णी), चिनाब (असिक्नी), झेलम (वितस्ता) आणि सिंधू या नद्यांचा समावेश होतो. ऋग्वेदामध्ये या सर्व नद्यांचा उल्लेख आढळतो. आजकाल भारतात हे मुलाचे नाव म्हणून वापरले जाते.उदाहरणार्थ कोठावळे आर्य प्रशांत.
आर्यांच्या वसाहती
आशिया मायनरमधील बोगाझकोई या ठिकाणी इ.स. पूर्व १४०० च्या सुमारास एक शिलालेख सापडला. या शिलालेखामध्ये आर्यांच्या ऋग्वेदातील इंद्र, मित्र, वरूण या देवतांचा उल्लेख आला आहे. त्यामुळे आजमितीस बोगाझकोईच्या शिलालेखावरून आशिया मायनर हे आर्यांचे मूळ निवासस्थान असावे असे ग्राह्य धरले आहे.
आर्यांची राज्यव्यवस्था
सुरवातीच्या काळात टोळ्या-टोळ्यांनी राहणाऱ्या आर्यांनी सप्तसिंधू व गंगा-यमुनाच्या खोऱ्यातील सुपीक जमीन, मुबलक पाणी, शेती व पशुपालनास पूरक साधन संपत्तीमुळे भटके जीवन सोडून स्थिर जीवनास सुरवात केली. स्थिर जीवनाच्या प्रारंभी आर्यांचा अनार्यांशी संघर्ष झाला तसाच तो आपसापातील टोळ्या-टोळ्यांमध्येही झाला. पशुधन व प्रदेशप्राप्तीसाठी आर्यांच्या टोळ्या संघर्ष करत असत.
आर्यांच्या कुटुंबसंस्थेतून राजसत्ता उदयास आली. अनेक कुटुंबे मिळून ग्राम म्हणजे खेडे होत असे. अनेक खेडी मिळून 'विश' बनत असे. तर अनेक विश मिळून 'जन' किंवा 'राष्ट्र' निर्माण होई. जन प्रमुखास राजन किंवा राजा म्हटले जाई. लोक आपल्या टोळीच्या रक्षणासाठी बलशाली व मुत्सद्दी व्यक्तीची राजा म्हणून निवड करत असत. राजाला राजधर्म पालनाची शपथ घ्यावी लागे. शत्रु टोळीपासून प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे प्रथम कर्तव्य होते. राजधर्म न पाळणाऱ्या राजाला ठार अथवा पदभ्रष्ट करण्यात येई. राजसत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सभा' आणि 'समिती' या दोन संस्था वैदिक काळांमध्ये कार्यरत होत्या. उत्तर वैदिक काळात त्यांचे महत्त्व कमी हेत गेले व राजपद वंशपरंपरागत बनत गेले.
आर्यांचे आर्थिक जीवन
आर्य सप्तसिंधूच्या सुपीक परिसरात राहात होते. तेव्हा सुरवातीच्या काळात पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तोच त्यांच्या आर्थिक जीवनाचा पाया होता. आर्य गंगा-यमुनाच्या खोर्यात पोहोचले तेव्हा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला. गहू, सातू, जव, ऊस, कापूस, मोहरी, फळभाज्या यांचे उत्पादन आर्य घेत असत. शेतीबरोबरच पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जाई. गायींचा वापर विनीमयाचे साधन म्हणून केला जाई. विनिमयाच्या साधनात 'निष्क' या नाण्याचा वापरही केला जाई. त्याकाळी गायींच्या संख्येवरून कुटुंबाची आर्थिक स्थिती ठरवली जाई. शेतकरी आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाला कर म्हणून देत असत.
आर्यांचे सामाजिक जीवन
आर्यकालीन समाज खेड्यामध्ये विभागला होता. त्यांची घरं साध्या पद्धतीची असून घरांसाठी लाकडाचा वापर केला जाई. घराचे छत गवताने शाकारले जाई. आर्यांच्या आहारामध्ये अन्नधान्याबरोबर दूध, दही, लोणी, तूप, फळे, भाजीपाला व मास ( डाळ ) यांचा समावेश असे. समाजाच्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जात असे. गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई.आर्यांची कुटुंबव्यवस्था पितृसत्ताक होती. जेष्ठ पुरुष कुटुंबप्रमुख असे. त्यास 'गृहपती' असे म्हटले जाई. समाज पितृसत्ताक असला तरी मुलींना पती निवडीबाबत मोकळीक होती. विश्ववरा, घोषाला या सारख्या स्त्रियां ऋग्वेद काळात होऊन गेल्या. विद्वान स्त्रिला ;ब्रम्हवादिनी; असे म्हटले जाई. ऋग्वेद काळात वर्णव्यवस्था लवचीक असून ती व्यवसायावर आधारलेली होती.
उत्तर वेदकालीन समाज जीवनात अनेक बदल घडून आले. वर्णव्यवस्थेत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यानंतर शूद्र हा चवथा वर्ण निर्माण झाला. वर्णव्यवस्था पुढे जातिव्यवस्थेत रूपांतरित झाली.
द्रविड (द्राविड) संस्कृति : भारतातील एक संस्कृती. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत द्रविडांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीची संमिश्र वाढ मुख्यत्वेकरून आर्य आणि द्रविड यांमधील संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमुळे झाली, हे आता सर्वमान्य झाले आहे.
द्रविड संस्कृतीचे अभ्यासक, द्रविड हे कोण होते आणि त्यांचा भारताशी संबंध कसा आला, ह्याचा प्रथम विचार करतात. द्रविडांचे मूलस्थान, त्यांचा वांशिक एकजिनसीपणा आणि त्यांचे भारतात झालेले आगमन ह्यांबद्दल विविध मते मांडली जातात. सध्याची भारतातील लोकवस्ती पाहता द्रविड वंशाचे व संस्कृतीचे लोक दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने सापडतात. असे असेल, तरी ते तेथे कसे आले व कोठून आले यांबद्दल मात्र निर्णायक मत कोणीच देऊ शकत नाही, काही भाषाशास्त्रज्ञ तर द्रविड हा भाषासमूह आहे. मानववंश नाही, असे मत मांडतात. द्रविड वंश हा भारतातील सर्वांत सुसंस्कृत प्राचीन मानववंश आहे, असे एक मत मांडले जाते. काहींच्या मते द्रविड हे एकसंघ नसून त्यांच्या दोन शाखा होत्या. तमिळ बोलणारे आणि मुंडारीसारख्या भाषा बोलणारे कोलेरियन ह्या द्रविड वंशाच्या दोन शाखा पूर्वी मानल्या जात परंतु आता हे मत ग्राह्य धरण्यात येत नाही. काहींच्या मते द्रविड वंशाचे लोक ऑस्ट्रेलियातील आदिवासींशी संलग्न असले पाहिजेत, तर काहींच्या मते वर उल्लेखिल्याप्रमाणे ते मूळचेच भारतीय असावेत. सर्वसाधारणपणे द्रविड वंशीय लोक कमी उंचीचे, काळ्या वर्णाचे, काळ्या डोळ्याचे, लांबट डोक्याचे, रुंद नाकाचे, जाड ओठांचे, कुरळ्या केसांचे असे मानले जातात. परंतु शतकानुशतके चाललेल्या वंशसंमिश्रणाच्या प्रक्रियेत द्रविडांची अथवा आर्यांची शारीर, वांशिक अथवा सांस्कृतिक वैशिष्ट्ये अबाधित व अविकृत राहिली असतील, असे मानणे योग्य ठरणार नाही.
काहींच्या मते दक्षिण भारतामध्ये जे नवाश्मयुगीन संस्कृतीचे लोक होते, त्यांचे वंशज म्हणजे द्रविड होत. द्रविड लोक भारताबाहेरून येऊन भारतात स्थायिक झाले सिंधू संस्कृतीचे लोक द्रविड असावेत द्रविड भूमघ्य समुद्राच्या पूर्वेकडील भागातून अथवा पश्चिम आशियातून येऊन दक्षिण भारतात स्थायिक झाले महाश्मयुगीन संस्कृतीशी त्यांचा संबंध होता, अशी विविध मते नमूद केलेली आढळतात. इतर काही द्रविड हे आर्यपूर्व भारताचे मूळचे रहिवासी असल्याचे मत मांडतात. याचा पुरावा म्हणून वैदिक संस्कृतीवरही द्रविड भाषांचा परिणाम झाल्याची उदाहरणे दाखवतात. कॉल्डवेलच्या मते द्रविड हे तुरानियन वंशाचे असून ते दुसरीकडून भारतात आले. या सर्व मतांतून कोणतेही एक मत निर्णायक म्हणून ग्राह्य धरणे सोपे नाही. द्रविड संस्कृतीची प्राचीनता, द्रविड भाषांची वैशिष्ट्ये आणि द्रविडांची वांशिक वैशिष्ट्ये ह्यांबद्दल आता फारसे दुमत नाही. काही वर्षांपूर्वी द्रविड संस्कृतीचे मूल्यमापन यथार्थपणे झालेले नव्हते. भारतीय संस्कृतीत जे जे उत्कृष्ट, ते ते सर्व आर्य संस्कृतीचे असे मानण्याकडे कल होता. आता हे मत ऐतिहासिक दृष्ट्या, भाषाशास्त्रीय दृष्ट्या, तद्वतच वंशशुद्धतेच्या दृष्टीने अग्राह्य ठरले आहे.