1 उत्तर
1
answers
मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे काय ?
3
Answer link
मोबाइल ॲंप हे एक सॉफ्टवेअर आहे की जे स्मार्ट फोन आणि टॅब्लेट संगणकावर योग्य त्या आकाराची जुळवणी करून उपयोग करता येतों. अनेक नमुन्यातील तयार करुन विक्री केलेले ॲंप म्हणजेच वेब ब्राऊजर, इमेल क्लाईंट, कॅलेंडर, मापपिंग कार्यक्रम. खरेदलेले संगीत, इतर माध्यमे, आणि कितीतरी ॲंप मुळातः संग्रह करून वापरता येतात. मोबाइल किंवा इतरात साठविलेले ॲंप खूप झाले तर ते त्यातून रद्द करण्याचीही अतिशय साधी सरळं व्यवस्था त्यात आहे.
काही ॲंप मोबाइल उपकरणात बसविलेले नसतात ते ॲंप ॲंपगॅलरीत उपलब्ध असतात. ही सुविधा सन २००८ मध्ये चालू झाली ती म्हणजे ॲपल ॲंप संग्रहालय, गूगल प्ले, विंडोज फोन स्टोर, आणि ब्लॅक बेरी ॲंप वर्ल्ड. काही ॲंप मोफत मिळतात पण बाकी खरेदीच करावे लागतात. सामान्यतः ते मोबाइल उपकरणात इच्छित ठिकाणी डाउनलोड करावे लागतात, पण काही वेळा लॅपटॉपवर आणि मेजवरील संगणकात ते डाउनलोड झालेले असतात. ॲंपचे किमतीचा विचार केला तर २०-३०% किंमत वितरकाकडे राहते आणि बाकी ॲंपचे उत्पादकाकडे जाते.[१] त्यामुळे त्याची किंमत मोबाइल विक्रेत्यावर अवलंबून राहते.
ॲंप हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा सॉर्ट फॉर्म आहे. हा शब्द अतिशय प्रसिद्द आहे. सन २०१० मध्ये अमेरिकन डियलेक्ट सोसायटीने वर्ड ऑफ द इयर असे शब्दाचे वर्णन करून त्यांनी त्यांचे यादीत नोंद केली.[२] तंत्रज्ञान स्तंभ लेखक डेविड पोगुए हे त्यांचे लिखाणात म्हणाले की या नवीन स्मार्ट फोनचे आधुनिक काळातील स्पर्धात्मक स्थितीत वेगळेपण राहावे म्हणून याचे निकनेम ॲंप फोन असावे.
मोबाइल फोन मधून साधारणपने ईमेल, कॅलेंडर, संपर्क, स्टॉक मार्केट, हवामान अंदाज, याची माहिती मिळते. तरीसुद्दा इतर विभागात म्हणजेच टेबलावर संगणकावरील कामकाज करणार्या वर्गात सॉफ्टवेअरची फार मोठी मागणी येऊन विकासात्मक बाबीत फार मोठी क्रांती झाली. ॲंपच्या संशोधक आव्हानांच्या भडक्यामुळे ब्लॉग,मासिके,आणि ऑनलाइन समर्पित ॲंप संशोधित सेवाना उधाण आलेले आहे. सन २०१४ मध्ये सरकारने मेडिकल क्षेत्रात नियमनतेसाठी ॲंपचा वापर करण्याचे धोरण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.[३] काही कंपनी ॲंपचा वापर व्यावसायिक समाधान मिळविण्यासाठी पोहचवितात.
सर्व मोबाइल फोन वापर करणार्यामध्ये मोबाइल ॲंपची प्रचिती, प्रशिद्दी, वाढलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे मे २०१२ मध्ये या संबंधाने एक गणना केली त्यात तेव्हा लक्षात आले की मोबाइल धारक त्यांचे मोबाईलवर ॲंपचा वापर वेब ब्रौस ४९.८% तर ॲंप वापर ५१.१% करत आहेत.