1 उत्तर
1
answers
मोबाईल मध्ये लपलेले पासवर्ड कसे शोधावे?
2
Answer link
इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस्चा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु, या वापरामध्ये सर्वात महत्त्वाची आणि तितकीच अवघड गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पासवर्ड लक्षात ठेवणे. काही काही लोक इतके विसरभोळे असतात की त्यांना स्वत:ची जन्मतारीखही लक्षात राहत नाही. परंतु, अलीकडे अनेक उपकरणांमध्ये पासवर्ड मॅनजेर्सची सुविधा उपलब्ध असते. हा पासवर्ड मॅनेजर्स तुमच्या सर्व पासवर्डना ट्रॅक करतो. त्यामुळे आपणाला अनेकदा थेट साईन इन करता येते. जर तुमच्याकडे अँड्राईड मोबाईल असेल आणि तो तुमच्या गुगल अकाऊंटला लिंक असेल तर याचा स्वत:चा पासवर्ड मॅनेजर आहे, जो गुगल क्रोम अॅपमध्ये वापरण्यात येणार्या तुमच्या सर्व पासवर्डला ट्रॅक करतो; पण तुमच्या अँड्राईड फोनमध्ये कोण कोणते पासवर्ड दडलेले आहेत, ते कसे पाहायचे आणि आवश्यकता वाटल्यास कसे डिलिट करायचे ते बघुया. अँड्रॉईड फोनवर गुगल क्रोम ब्राऊजर सुरू करा. त्याच्या उजव्या बाजूला सर्वात वरील बाजूस असणार्या उभ्या तीन डॉटवर (काही फोनमध्ये हे तीन डॉटस् बॉटम कॉर्ननवर सुद्धा असू शकतात) क्लिक करा.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,त्यानंतर पॉप अप मेन्यू सेटिंग्जला टॅप करा. आता तुम्हाला नेक्ट मेन्यूमध्ये पासवर्डवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फिंगर टच स्कॅन करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटची एक यादी दिसेल. त्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड सेव्ह असतील. ज्या साईटचा पासवर्ड तुम्हाला बघायचा आहे, त्याच्यावर टॅप करा आणि डोळ्याच्या चित्रावर टॅप करा. तुम्हाला तुमचा पासवर्ड तत्काळ दिसेल. हा पासवर्ड तुम्ही कॉपी करू शकता, अथवा डिलिटही करू शकता. डिलिट करण्यासाठी ट्रॅश आयकॉनचा वापर करावा.
हे पासवर्ड तुम्ही नक्की शोधून काढाल.
_____________________________
*_🦚 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 🦚_*
*✆ 9890875498*
_____________________________
*🏛 घरीच रहा, सुरक्षित रहा ....*
-----------------------------------------------