2 उत्तरे
2 answers

MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?

3
MPSC
नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास) 
पेपर- २ (गुण २०० - कालावधी २ तास) 
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदललाय. हा पॅटर्न ब‍-याच अंशी यूपीएससीसारखा आहे. 

नवा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप :
नव्या पॅटर्ननुसार प्रीलियमसाठी प्रत्येकी २०० गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतील. दोन तास वेळ असेल. या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजीत असतील. 

पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास) 
- राज्य , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. 
- भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ 
- महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक. 

महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय धोरणं , हक्कविषयक घडामोडी आदी

आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.पर्यावरणीय परिस्थिती , जैव विविधता , हवामान बदल यामधील सर्वसामान्य मुद्दे , सामान्य विज्ञान

1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.

2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न  
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.

3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न 
नुसताच नियम वा कायदा माहीती असणं महत्त्वाचं नाही तर त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे.

4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल अभ्यासा. रोजचा पेपर वाचा. इतिहास , भूगोल , राज्य शास्त्र , विज्ञान यांच्या मूलभूत अभ्यासासाठी आठवी ते बारावीची पुस्तकं वाचा. 

पेपर- २ (गुण २०० - कालावधी २ तास) 
आकलन (कॉम्प्रिहेन्शन) 
इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)
तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)
निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)
सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)
बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)
इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)

कॉम्प्रिहेन्शन :
यात आकलन क्षमतेची परीक्षा घेतली जाते. उता‍ऱ्यावर प्रश्न , पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं , वाक्यरचना ओळखणं , योग्य शब्दाची निवड करणं , समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात. 

लॉजिकल रिझनिंग आणि अॅनॅलॅटिकल अॅबिलिटी
यामध्ये एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता जोखली जाते. दोन विधानांचा परस्परसंबंध , त्यावरचं अनुमान काढावं लागंत. 

डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग :
प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सतत विविध प्रश्नांना- समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी समस्येचा सर्वांगीण विचार करून योग्य , अधिकाधिक जनतेला उपयोगी ठरेल , असा निर्णय घ्यावा लागतो. प्रीलियमचे काही प्रश्न हे या क्षमतेची चाचपणी करणारे असतील. 

जनरल मेंटल एबिलिटी :
आत्तापर्यंत सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये या घटकाचा समावेश असे. आता नवीन पेपर (पेपर दोन) मध्ये याचा समावेश आहे. यामध्ये काळ , काम , वेग , गुणोत्तर , कोडिंग , डिकोडिंग , प्रोबॅबिलिटी , घड्याळ , कॅलेंडर , दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात. 

बेसिक न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन :
यात आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं , लसावि/ मसाविवर आधारित प्रश्न , सरासरी , वयांचे गुणोत्तर नफा-तोटा , क्षेत्रफळ , आकारमान , प्रोबॅबिलिटी आदींवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आकृती , ग्राफ , टेबल्स याचं आकलन करणं अपेक्षित असतं. कॉम्प्रिहेन्शन तसंच न्यूमरसीचे प्रश्न हे दहावीस्तराचे असणार आहेत , असंही जाहीर केलं गेलंय. त्यामुळे त्याचा नियमित सराव हमखास यश देऊ शकेल. 

इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह) :
सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करत असताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी आदींशी नियमित संपर्क येत असतो. त्यावेळी तुमची इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स कामाला येतात.
 


उत्तर लिहिले · 27/12/2020
कर्म · 14895
0

MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे:

पेपर १ - सामान्य अध्ययन (General Studies)
  • इतिहास:
    • महाराष्ट्राचा इतिहास (विशेष संदर्भ)
    • भारताचा इतिहास
  • भूगोल:
    • महाराष्ट्राचा भूगोल (विशेष संदर्भ)
    • भारताचा भूगोल
    • जागतिक भूगोल
  • अर्थशास्त्र:
    • भारतीय अर्थव्यवस्था
    • महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
  • राज्यशास्त्र:
    • भारतीय संविधान
    • राजकीय प्रणाली
    • पंचायत राज
  • सामान्य विज्ञान:
    • भौतिकशास्त्र
    • रसायनशास्त्र
    • जीवशास्त्र
    • पर्यावरण
  • चालू घडामोडी:
    • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी
पेपर २ - नागरिकशास्त्र (Civil Services Aptitude Test - CSAT)
  • आकलन क्षमता (Comprehension)
  • तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical Reasoning and Analytical Ability)
  • निर्णय क्षमता आणि समस्या निवारण (Decision-making and Problem-solving)
  • सामान्य मानसिक क्षमता (General Mental Ability)
  • आंकडेवारी (Data Interpretation)
  • गणित आणि आकडेमोड (Basic Numeracy)
  • मराठी आणि इंग्रजी भाषेतील आकलन क्षमता (Marathi and English Language Comprehension Skills) (इयत्ता दहावी/बारावी स्तर)

अधिक माहितीसाठी, MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

MPSC Official Website
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 210

Related Questions

मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय, पण मला माझ्या आसपासच्या वातावरणात खूप वाईट वाटते, त्यामुळे माझ्या मनात नेहमी नकारात्मक विचार येतात. काय करू, काही समजत नाहीये?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर याविषयी माहिती मिळेल का, उत्तरे आणि पेपर?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर याविषयी माहिती मिळेल का?
स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धेमध्ये अल्पकाळात प्रयत्न कशाप्रकारे समतोल साध्य करतात?
अशी कोणती स्पर्धा परीक्षा आहे ज्यात घोटाळे होत नाहीत? हुशार मुलांना मागे ठेवून पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा दिली जाते? मग मी कुठल्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे? माझं Diploma in Civil झाले आहे, आता Engineering करत आहे?
स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व गरज काय आहे, ते कसे लिहावे?