1 उत्तर
1
answers
वारीतील मानाच्या सात पालख्या कोणत्या?
4
Answer link
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव सोहळा म्हणून पंढरीची वारी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टाळ मृदूंगाच्या तालावर संतांच्या पालख्यांसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला पायी जातात. यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पंढरीची ही पायी वारी होणार नाही आहे. सरकारने कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी पायी ज्या संतांच्या पादुका पालखीतून नेल्या जातात. त्या यावर्षी वाहनातून नेल्या जाणार आहेत. वारीमध्ये जवळपास १५० संतांच्या पालख्या असतात. त्यात सात पालख्या या मानाच्या मानल्या जातात.
1️⃣श्री संत ज्ञानेश्वर माउली ही पालखी आळंदीवरून निघते.
2️⃣श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याजवळील देहूवरुन निघते.
3️⃣श्री संत एकनाथ महाराज ही पालखी पैठण वरून निघते.
4️⃣श्री संत निवृत्ती महाराज यांची पालखी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते.
5️⃣श्री संत मुक्ताई यांची पालखी जळगाव जवळील मेहूण या गावावरून निघते.
6️⃣श्री संत सोपानदेव यांची पालखी पुण्याजवळील सासवड या गावातून निघते.
7️⃣तर श्री संत नामदेव यांची पालखी ही पंढरपूर येथूनच निघते. कार्तिकी वारीला ही पालखी आळंदीला जाते. आषाढी वारीला इतर पालख्यांच्या स्वागताला ती पंढरपूरच्या सीमेवर येते. तर या महाराष्ट्रातील मानाच्या सात पालख्या मानल्या जातात.
👉वारीतही संतांची वारी आणि देवाची वारी असे प्रकार आहेत. संत देवाला भेटायला ती ती देवाची वारी आणि संत संतांना भेटायला जातात ती संतांची वारी म्हंटले जाते. आषाढी वारी ही देवाची वारी मानली जाते. कारण महाराष्ट्रभरातून सर्व संत विठुरायाच्या भेटीला येतात. तर कार्तिकी वारी संतांची वारी मानली जाते कारण संत आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला जातात.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy