मुधोळ संस्थानाबद्दल माहिती सांगा?
संस्थानांत मुधोळ व महालिंगपूर हीं दोनच गांवें महत्त्वाचीं होती.
घटप्रभेच्या डाव्या कांठावर आहे. गांवाभोंवती पडका तट व त्याबाहेर पेठ आहे. बाजार शुक्रवारचा, गावांजवळ तिळीं व गांवांत हौद आहेत, संस्थानिकाचा वाडा पहाण्यासारखा आहे. येथील म्युनिसिपालिटी १८७५ सालीं स्थापन झाली.
मुधोळ जहागिरीची स्थापना इ.स. १४६५ या वर्षी झाली. त्याचे जहागीरदार घोरपडे घराणे होते. इ.स. १६७० मध्ये मुधोळ जहागिरीचे रूपांतर घोरपडे संस्थानिक असलेल्या मुधोळ संस्थानात झाले.
साधारणत: १३०० साली चितोडच्या राणाचे वंशज मुधोळ येथे स्थलांतरित झाले. त्यांच्यापकी राणा भरवजी ऊर्फ बोसाजी यास मुधोळची जहागिरी मिळाली. त्याचा वंशज उग्रसेन याने भोसले हे उपनाव घेतले. सातारा, कोल्हापूर, नागपूर, तंजावर येथील राज्यकत्रे आणि मुधोळचे भोसले एकाच वंशाचे. पुढे राजे भीमसिंग यांना इ.स. १४७० मध्ये घोरपडे हा खिताब मिळाल्यावर पुढील पिढय़ांनी घोरपडे हेच उपनाव लावले.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
चोलराज घोरपडे (१५६५-१५७८) याला विजयनगरची सात हजारी मनसबदारी आणि २६ गावे इनामात मिळाली. बाजी घोरपडे हा आदिलशहाकडे नोकरीस असताना शहाजी भोसले यांना पकडण्याची कामगिरी बाजीने मुस्तफाच्या मदतीने पार पाडली. इथपावेतो जहागीर म्हणून अस्तित्व असलेले मुधोळ मालोजीराव घोरपडे (कारकीर्द १६६६ ते १७००) यांच्या काळात एक स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले. मालोजीराव घोरपडे विजापूरच्या आदिलशहाकडे प्रमुख सेनानी म्हणून नोकरीत होते. मिर्झाराजे जयसिंहाने विजापूरवर हल्ला केला तेव्हा मालोजीरावांनी केलेल्या कामगिरीबद्दल आदिलशहाने त्यांना पाच महालांचे राजेपद आणि सात हजारी पायदळाची मनसबदारी दिली. मालोजीरावांचा पणतू मालोजीराव घोरपडे द्वितीय यांचा पेशव्यांशी स्नेह होता. त्यांनी त्याची जहागिरी आणि मुधोळच्या राज्यास मान्यता दिली. पुढे त्यांचा मुलगा व्यंकटराव यानी १८१९ मध्ये कंपनी सरकारचे आधिपत्य स्वीकारल्यामुळे मुधोळ हे ब्रिटिशअंकित संस्थान बनले.
राजे भरवसिंह घोरपडे द्वितीय हे मुधोळ संस्थानाचे अखेरचे राजे. त्यांनी मुधोळ संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले.

मुधोळ संस्थान हे ब्रिटिश भारतातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक मराठा संस्थान होते. ह्या संस्थानाची राजधानी मुधोळ शहर होती, जे सध्याच्या कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात आहे.
मुधोळ संस्थानाची स्थापना 15 व्या दशकात घोरपडे घराण्याने केली. घोरपडे हे मराठा साम्राज्यातील शूर आणि पराक्रमी घराण्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक युद्धात भाग घेऊन शौर्य गाजवले. या घराण्यातील मालोजीराजे घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक महत्त्वाचे सरदार होते.
मुधोळ संस्थानावर घोरपडे घराण्यातील राजांनी राज्य केले. त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी अनेक लढाया जिंकल्या.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, मुधोळ संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.
मुधोळ संस्थान हे शिक्षण आणि कला यासाठी ओळखले जाते. येथील राजांनी शिक्षण आणि कला या क्षेत्रांना प्रोत्साहन दिले. मुधोळची शिकारी कुत्री (Mudhol Hound) प्रसिद्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: