दूरचित्रवाणी मालिका

दुरदर्शनच्या गाजलेल्या मालिका कोणत्या?

2 उत्तरे
2 answers

दुरदर्शनच्या गाजलेल्या मालिका कोणत्या?

2

फक्त 'मोगली'च नव्हे तर 90 च्या दशकात याही मालिका होत्या लोकप्रिय

*अलिफ लैला*
> रामानंद सागर प्रस्तृत 'अलिफ लैला' या हिंदी मालिकेचा पहिला भाग वर्ष 1993 मध्ये प्रसारित झाला होता.
> 1997 मध्ये या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
> 'अलिफ लैला' हा अरबी शब्द असून, अरेबीयन नाइट कथासंग्रहाचा हा हिंदी अनुवाद होता.
> अरबीमध्ये 'अल्फ' म्हणजे 'हजार' तर 'लैला' म्हणजे 'रात्र' होते.
> अलिफलैला म्हणजे एक हजार रात्री असा याचा अर्थ आहे.
> ही मालिका भारतात 'डीडी वन'वर तर बांगलादेशात तेथील सरकारी वाहिनीवर दिसत होती.
> उर्दू, हिंदी आणि बंगाली अशा तीन भाषेतून तिचे प्रसारण होत होते.
> भारतात या मालिकेचे एकूण 260 भाग प्रसारित झाले.
> 'सिंदबाद' हे मालिकेतील प्रमुख पात्र होते.

*चंद्रकांता की कहानी*
> देवकीनंदन खत्री यांच्या 'चंद्रकांता' या लोकप्रिय कादंबरीवर आधारित ही मालिका होती.
> सन 1888 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती.
> 90 च्या दशकातील ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका होती.
> या मालिकेतील क्रूरसिंग, जादुई अय्यार, पंडित जगन्नाथ आदी पात्र आजही आठवणीत आहेत.
> दर रविवारी सकाळी 9 वाजता या मालिकेचे प्रसारण व्हायचे.
> केवळ लहान मुलंच नाहीत तर मोठी माणसंही ही मालिका पाहण्यासाठी रविवारची आतुरतेने वाट पाहत असत.
> 4 मार्च 1994 रोजी तिचा पहिला भाग प्रसारित झाला.
> एप्रिल 1996 रोजी तिचा अखेरचा भाग प्रसारित झाला.

*रामायण*
> ही मालिकाही खूप लोकप्रिय होती.
> रामानंद सागर यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.
> 25 जानेवारी 1986 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता.
> 31 जुलै 1988 रोजी तिचा अखेरचा भाग प्रसारित झाला.
> या मालिकेत अरुण गोविल (राम), दीपिका (सीता), दारासिंह (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण), ललिता पवार (मंथरा), अरविंद त्रिवेदी (रावण) आदी कालाकारांनी अभिनय केला होता.
*शक्तिमान*
> क्रिश, रा-वन, रोबोट या सुपरहीरोच्या पूर्वी 'शक्तिमान' मालिकेतून अस्सल देशी सूपरहीरो भेटीला आला होता.
> 27 सप्टेंबर 1997 रोजी तिचा पहिला भाग प्रसारित झाला.
> 27 मार्च 2005 मध्ये तिचा अखेरचा भाग प्रसारित झाला.
> या मालिकेचे एकूण 400 भाग प्रसारित झाले.
*महाभारत*
> 'रामायण' मालिका बंद पडल्यानंतर 'महाभारत' मालिका सुरू झाली होती.
> 1988 मध्ये तिचा पहिला भाग प्रसारित झाला.
> ही मालिका केवळ दोन वर्षे चालली.
> 1990 मध्ये तिचे प्रसारण बंद पडले.
> 'मैं समय हूं' हा या मालिकेतील महत्त्वाचा भाग होता.
*जंगल बुक - मोगली*
> 'जंगल बुक एक अॅनिमेटिड सीरियल होती.
> केवळ लहान मुलांसाठी तिची निर्मिती करण्यात आली होती.
*चित्रहार*
> हा केवळ गाण्याचा कार्यक्रम होता.
> दर बुधवारी सायंकाळी त्याचे प्रसारण केले जात असे.
> त्या काळात कुठली गाणी लोकप्रिय आहेत हे या कार्यक्रमातून कळत असे.
> आज ऐकायला नवल वाटेल, परंतु चित्रहार पाहण्यासाठी घरातील सर्व सदस्य टीव्ही समोर बसत.
> गृहिणी या कार्यक्रमापूर्वी स्वयंपाक करून घेत किंवा नंतर.
> ज्यांच्याकडे टीव्ही नव्हता तेही शेजाऱ्यांकडे केवळ चित्रहार पाहण्यासाठी जात असत.
*शांती*
> सोमवार ते शुक्रवार या मालिकेचे प्रसारण होत होते.
> मदिरा बेदी या मालिकेत मुख्य भूमिकेमध्ये होती.
> कौंटुंबीक वाद हे मालिकेचे कथानक होते.
*हम लोग*
> ही भारतातील पहिली मालिका होती.
> 1984 मध्ये तिचे प्रसारण झाले.
> कुटुंबातील जिव्हाळा हे मालिकेचे कथानक होते.
> 7 जुलै 1984 रोजी तिचा पहिला भाग प्रसारित झाला होता.
> 17 डिसेंबर 1985 रोजी तिचा अखेरचा भाग दाखवण्यात आला.
> या मालिकेचे एकूण 154 भाग प्रसारित झाले होते.
*डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी*
> दोन वर्षापूर्वी याच नावाने दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित हिंदी चित्रपट आला होता.
> यापूर्वी या नावाची हिंदी मालिका होती.
> रजीत कपूर च्या अभिनयाने ते पात्र अगदीच खरे वाटत होते.
*चाणक्य*
> आजघडीला कलर्स हिंदी वाहिनीवरील 'सम्राट चक्रवती अशोक' ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे.
> पण, या मालिकेपूर्वी याच कथानकावर आधारित 'चाणक्य' ही दूरदर्शनवरील मालिका खूप गाजली होती.
*सुरभी*
> रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक या मालिकेचे निवेदन करत.
> 1993 मध्ये तिचा पहिला भाग तर 2001 मध्ये शेवटचा भाग प्रसारित झाला.
> एकूण 415 भागांचा टप्पा या मालिकेने यशस्वी पार केल
*रंगोली*
> ही मालिका आजही सुरू आहे.
> 1989 मध्ये तिचा पहिला भाग दाखवण्यात आला होता.
> लोकप्रिय हिंदी गाण्यांसाठी ही मालिका प्रसिद्ध आहे.
> हेमा मालिनी यांनी काही काळ या मालिकेसाठी निवेदन केले होते.
Ⓜ नक्कीच जुन्या आठवणी जाग्या  झाल्या ना !

0
महाभारत, रामायण, ये जो है जिंदगी, शक्तिमान, हम लोग, विक्रम और वेताळ, मालगुडी डे,एक खोज, जंगल बुक ह्या दूरदर्शन वरील गाजलेल्या मालिका आजही लोकप्रिय आहेत.
उत्तर लिहिले · 25/4/2020
कर्म · 34195

Related Questions

एका दूरचित्रवाणी संच बनविण्याचा कंपनीत विक्री अधिकारी या पदाच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
दुरदर्शनवरील जाहिरात कशी असावी?
भारतीय चित्रपट सृष्टीचे मुहूर्तमेढ कोणी रोवली?
सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल कसा असतो?
चांद धरती से कितना दूर है?
दूरचित्रवाणी हे....माधयम आहे?
CCTV तून रेकॉर्ड होण्यासाठी इंटरनेट, वायफायची आवश्यकता असते का इंटरनेट शिवाय हि आपण विडिओ रेकॉर्ड करू शकतो ? MI चा CCTV पाहिला मी फ्लिपकार्ट वर ३००० रुपयात