विनोद

विनोदाचे फायदे कोणते ?

1 उत्तर
1 answers

विनोदाचे फायदे कोणते ?

2
विनोदाचे प्रकार
आता मी स्वत:ला विनोदी अस जाहीर करून टाकलंच आहे तर मग हा आगाऊपणा चालू ठेवण्यासाठी विनोद या विषयावर मी आता बोलणार आहे. खर तर तुम्ही हे वाचणार आहात, मी लिहिणार आहे पण तरीही बोलणार आहे अस म्हटलं की वाचणाऱ्याशी जरा जवळीक साधल्यासारख वाटत. लिहिणार आहे अस म्हटलं तर उगीचच पाठ्यपुस्तक आणून उभ केल्यासारख वाटत. असो. शाळेत असताना मराठीला आचार्य अत्रेंचा विनोदवर एक धडा होता त्यावर आधारित हा लेख. सर्वसाधारणपणे लिहिलेल्या मजकुराच्या आधारित चित्रपट वगैरे बनवले जातात. एका लेखाच्या आधारावर दुसरा लेख हे जरा विचित्र वाटू शकेल पण मला जसजसे जाणून घ्याल तशी याची तुम्हाला सवय होईल. खर तर आचार्य अत्रे सोडले तर दुसरे कुठलेही अत्रेच काय पण (क्ष)त्रेही  प्रसिद्ध असल्याच मला आठवत नाही. पण "आचार्य" असं  त्यांना संबोधल्याशिवाय मनाच समाधान होत नाही. उदा. डॉक्टर श्रीराम लागू. त्यांना डॉक्टर का म्हणतात हे आता ते स्वत:ही कदाचित विसरले असतील. त्यांची एकमेव आठवणारी भूमिका ती पिंजऱ्यातली, म्हणजे पिंजरा चित्रपटातली. त्यात त्यांचा पेश मास्तर व तमाशातले साथीदार. ही कामे सिनेमात करून सरकारने त्यांना डॉक्टर अशी पदवी दिली असेल असं वाटत नाही. असो. विषय खूप भरकटत गेला की ऑफिस मधल्या मिटींग्स मध्ये जस "लेट्स टेक धिस ऑफलाईन" म्हणतात तस मी भरकटायला लागलो की "असो" अस म्हणतो. असो.
धोक्याची सूचना - तुमचा अगदी वेळ जात नसेल व जीवनात (माझ्या बोलण्यात कधीही जीवन हा शब्द आला की पुलंच्या सखाराम गटणेची आठवण काढणे,  सखाराम गटणे कोण हे माहित नसेल तर आधी तो लेख वाचून काढणे, माझे विनोद समजण्यासाठी आधी पुलंचं बहुतेक सर्व लिखाण वाचणे आवश्यक आहे, अगदी "प्रीरिक्विझीट") बाकी जे काही वाचायचं होत ते सर्व वाचून काढलं असेल तरच यापुढील मजकूर वाचणे. कारण पुढील लिखाण इतक निरर्थक आहे की ते लिहिताना मी स्वत:च तीन चार वेळा डुलक्या काढल्या आहेत. लोक एखादी न आवडणारी नोकरी जशी केवळ "पोटासाठी" करतात तस माझं हे लिखाण केवळ "पोटात राहत नाही म्हणून" केल गेल आहे. वाचका तुझे भले होवो.
उत्तर लिहिले · 19/2/2020
कर्म · 3860

Related Questions

निखळ विनोद कशाला म्हणतात?
माणूस हास्य विसरला तर?
तुम्ही ऐकलेले सर्वात चांगला विनोद कोणता ?
मराठी विनोद तुमचा शाळेत वाचलेले काही मस्त मराठी सुविचार तुम्ही सांगू शकाल का ?
विनोद निर्मितीची महत्त्वाची कारणे कोणती ?
मानवी जीवनात विनोदाचे महत्व ?
अत्रे यांचे विनोदी किस्से सांगा?