विनोद
निखळ विनोद कशाला म्हणतात?
1 उत्तर
1
answers
निखळ विनोद कशाला म्हणतात?
3
Answer link
विनोद" ही एक मनुष्याला मिळणारी सकारात्मक ऊर्जा आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे मनुष्य हा कितीही नाराज किंवा अतिशय दुःखद प्रसंगातुन जात असला, तरी "विनोद" कानी पडताच शरीरातील ग्रंथीचे प्रसारण होऊन त्राण कमी होतो.
आता "निखळ विनोद" या शब्दाची व्याख्या किंवा व्याप्ती सांगायची तर, बऱ्याच वेळा विनोद करतांना काही स्थळे, व्यक्ती, संस्था यांचा आपण विनोदात हास्यरंग भरण्यासाठी वापर करतो. अशा वेळेस कधी - कधी नाम उल्लेख केल्यामुळे, त्या व्यक्ती, स्थळे, संस्था याची प्रतिमेला धक्का लागल्या सारखे वाटते. परंतु त्या विनोदात तसा कोणताही उद्देश किंवा हेतू नसतो, आणि फक्त आणि फक्त विनोदात हास्यरंग भरण्यासाठी नामोल्लेख असतो. त्यामुळे आपण फक्त विनोदासाठी तो शब्द वापरला, त्याचा उल्लेख केलेल्या कोणाचीही प्रतिमा डागळण्याचा उद्देश नसल्याने त्यालाच "निखळ विनोद" असे संबोधले जाते.