शिक्षण सरकारी योजना शिष्यवृत्ती

मला 10 क्लास मध्ये 88 % होते पण मला राजश्री शुहू महाराज शिष्यवृत्तीच नाही भेटली अजून पण मी फॉर्मपण भरला आहे ऑनलाईन तरी पण नाही भेटली तर मी आता काय करू की सांगू इच्छिता का?

1 उत्तर
1 answers

मला 10 क्लास मध्ये 88 % होते पण मला राजश्री शुहू महाराज शिष्यवृत्तीच नाही भेटली अजून पण मी फॉर्मपण भरला आहे ऑनलाईन तरी पण नाही भेटली तर मी आता काय करू की सांगू इच्छिता का?

1
आपण या कॅटेगरी मध्ये बसता काय ते तपासून पहा,

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज   गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तींची संख्या १०० असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

पदवी अभ्यासक्रम – मंडळनिहाय शिष्यवृत्त्या १०, एकूण संख्या  ८०

पदव्युत्तर पदविका/पदवी – मंडळनिहाय शिष्यवृत्त्या २, एकूण संख्या १६

राज्य स्तरावरील पदविका/पदवी अभ्यासक्रम –  राजस्तरावर १२वीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी ४

एकूण शिष्यवृत्तींची संख्या – १००

आवश्यक पात्रता : 

० विद्यार्थ्यांनी दहावी – बारावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातून उत्तीर्ण केलेली असावी.

० पदवी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी बारावीच्या परीक्षेतील व सीईटीमधील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल व त्या गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. अर्जदार विद्यार्थ्यांनी बारावी व सीईटी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील.

०पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

० अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व नवबुद्धासह अनुसूचित जातीचा असावा.

० अर्जदारांच्या पालकाच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा जास्तीतजास्त ४.५० लाख रुपये असावी.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी विभागीय समाजकल्याण अधिकारी, संबंधित जिल्ह्य़ाचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा  महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
उत्तर लिहिले · 13/8/2019
कर्म · 28530

Related Questions

गुरू पोर्णिमा,वंदना , गुरू आश्रम शिक्षण ,शिष्य परंपरा,गुरू आणि ज्ञान,ईश्वर .. सद् गुरू सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ? गुरविण कोण दाखविल वाट .. याबाबत आपल्या विवेकबुद्धीने विश्लेषण करा ?
आपण जे शिक्षण देतो ते भविष्यवेधी आआहे का?
शिक्षण मंत्री चे कामे?
चौथीनंतरच्या शिक्षणासाठी कुसुमाग्रज कोणत्या गावी गेले?
जर मी माझा नावावर घरासाठी लोन काडल , आणि मला उच्च शिक्षण करायला परदेशात जायचं असेल तर मला काही प्रोब्लेम येतील का?
रयत शिक्षण संस्थेच्या बोधचिन्ह कोणते?
शालेय शिक्षण व व्यावसायिक?