इंटरनेट बँकिंग पेटीएम गुगल

आपण फोन पे आणि पेटीएमवरून कोड स्कॅन करून पेमेंट करतो किंवा रिचार्ज करतो ते आपल्याला कॅश बॅक देतात तर त्यात त्यांचा फायदा कसा होतो?

2 उत्तरे
2 answers

आपण फोन पे आणि पेटीएमवरून कोड स्कॅन करून पेमेंट करतो किंवा रिचार्ज करतो ते आपल्याला कॅश बॅक देतात तर त्यात त्यांचा फायदा कसा होतो?

9
सर्व e- wallet कंपण्या वॉलेट ते बँक ट्रान्सफर साठी काही चार्ज घेतात. त्यात देखील paytm तसेच यांसारख्या ऍपला पैसा मिळतो.

उदाहरणासाठी पेटीएम विषयी थोडक्यात जाणून घेऊ...:-
             Paytm आपल्या वेबसाईट वर वेगवेळ्या सेलर्स ना वस्तू विकू देतो. या साठी त्यांचा कडून वार्षिक शुल्क आकारले जाते. ते आपल्या वेबसाईट वर जाहिरात ही करू देतो त्यातुन देखील त्याला खूप पैसे मिळतात. एवढंच नाही त्यांचा वेबसाईट वरून झालेल्या प्रत्येक वस्तू मागे paytm चे कमिशन ठरलेलं असते.
             पेटीएमचं दुसरं उत्पन्न स्रोत म्हणजे ग्राहक होय. सर्व प्रथम तुम्हाला paytm चा उपयोग करायचं असेल तर तुम्ही त्यात पैसे add करता, ते पैसे तुम्हाला वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट करण्या साठी करता येतो. पण जर तुम्हाला ते परत बँकेत परत हवे असतील तर paytm च्या नियमा नुसार, पैसे add केल्या पासून 7 दिवस तुम्हाला ते परत बँकेत नाही घेता येत. Paytm त्या आपल्या पैशानवर व्याज मिळवतो. याला ऍडव्हान्स पेमेंट मॉडेल असे म्हणतात.

अनेक पार्टनशीप तसेच इन्व्हेस्टमेंट करत असलेल्या कंपन्या पेटीएम/फोनपे यांसारख्या ऍप ना जोडले गेलेले असतात..
         या ऍप द्वारे विविध व्यवहार होतात. त्या व्यवहारानुसार त्याला जोडले गेलेल्या कंपन्या आणि जाहिराती देखील संबंधित असल्याने कॅशबॅक ची सुविधा ग्राहकांस आकर्षित करते. एवढेच नव्हे तर एखाद्या सूट-सुविधा मिळाल्यास ग्राहक जोडले जातात. आपल्या प्लॅटफॉर्म वर ग्राहक बांधले जावे म्हणून अश्या सोयी सुविधा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचा एक व्यावसायिक मंत्र आहे असेच समजणे वावगं ठरणार नाही..!
   
उत्तर लिहिले · 9/8/2019
कर्म · 458480
0
त्यांना त्याच app किती चालते यावर पैसे मिळतात आपण जास्त app वापरावं म्हणून ते cash back
उत्तर लिहिले · 9/8/2019
कर्म · 60

Related Questions

नेट बँकिंग म्हणजे काय?
पी. ओ. एस. वापरण्याचे लाभ काय आहेत ते वापरताना कोणती खबरदारी घ्यावी?
ऑफलाइन गाणी वाजविण्यासाठी कोणते अँप आहे?
इंटरनेटचा वेग कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो?
UPI अँप कोणते वापरू जेणेकरून मला त्याचा जास्त फायदा होईल?
इंटरनेट कोणत्याही रोगाची माहिती खरी असते का?
एखाद्या व्यक्तीस आपल्याकडून GPay ने पेमेंट हवे असेल, तर आपल्याकडे त्याची कोणती माहिती असायला हवी?